इस्रायलच्या कंपनीबरोबर संरक्षण मंत्रालयाचा नवा करार. मानवरहित पाणसुरूंग विरोधक व्हेसल पुरविणार.
         Date: 23-Nov-2018

इस्रायलच्या कंपनीबरोबर संरक्षण मंत्रालयाचा नवा करार. मानवरहित पाणसुरूंग विरोधक व्हेसल पुरविणार.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: The Economic Times.

 

USVs can be interim solution for Navy's minesweeper shortage.

 

भारताच्या संरक्षण विभागाचे पीएसयू 'गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स' (GRSE) ने इस्रायलच्या 'एल्बीट सिस्टम' या कंपनीबरोबर भारतीय नौदलासाठी पाण्याखालील सुरुंग शोधून ते नष्ट करणाऱ्या मल्टिरोल अनमॅन्ड सरफेस व्हेसल (USV) च्या निर्मितीसाठी एमओयू वर सह्या केल्या आहेत. गुरुवारी पत्रकारांसमोर बोलताना GRSE चे मॅनेजिंग डिरेक्टर रिअर ऍडमिरल व्ही.के.सक्सेना यांनी ही माहिती दिली. या USV भारतीय नौदलाला असलेली पाणसुरूंग विरोधक उपकरणांची कमतरता नक्कीच भरून काढतील असे त्यांनी येथे बोलताना सांगितले. पाण्याखाली शत्रूने पेरून ठेवलेल्या सुरुंगांचा शोध घेऊन ते नष्ट करण्याची क्षमता या USV मध्ये असेल. भारतीय नौदलाला सध्या माईनस्वीपर्सची कमतरता भासत आहेच अश्यावेळी ही व्हेसल्स तातडीची उपाययोजना नक्कीच समजता येईल.



भारतीय नौदलास सध्या १२ माईनस्वीपर्सची आवश्यकता आहे. नौदलाचे तळ, बंदरे आणि समुद्री मार्गांची सुरक्षितता जपण्यासाठी त्यांचा वापर होतो. परंतु सध्या केवळ दोनच माईनस्वीपर्स भारतीय नौदलात तैनात आहेत आणि संपूर्ण पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा विचार करता ही संख्या अपुरी आहे.

 

माईनस्वीपर्सच्या तुलनेत USV चा निर्मिती खर्च देखील कमीच आहे. एका माईनस्वीपर्सचा उत्पादन खर्च २५०० कोटी रुपयांच्या घरात जातो तसेच त्यांच्या निर्मितीसाठीही खूप जास्त वेळ अपेक्षित आहे.

 

सक्सेना म्हणाले,"साधारण १२ ते १४ महिन्यात USV चा पहिला लॉट तयार होण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि तदनंतरच्या लॉट्स साठी कमी वेळ लागेल. भारतीय नौदलाने GRSE ला या USV बद्दल 'रिक्वेस्ट फॉर इन्फर्मेशन' पाठविलेली असून त्याला त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळालेला आहे."

 

तर GRSE संरक्षण मंत्रालयाकडून 'रिक्वेस्ट फॉर प्रपोजल' ची प्रतीक्षा करीत असल्याची माहिती GRSE च्या साम्ड नी दिली.

 

मल्टीरोल अँटी सबमरीन वॉरफेअर बोटींची लांबी १२ मीटर असून त्या मुख्य नौकेवरून वाहून नेता येऊ शकतात व त्यावरूनच कार्यान्वित केल्या जाऊ शकतात. पाणसुरूंग प्रतिरोधक मोहीम तसेच इलेक्ट्रॉनिक शस्त्रांच्या साहाय्याने लढल्या जाणाऱ्या युद्धांच्या वेळी या USV चा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो. या USV चा पल्ला ५० किलोमीटर एवढा असेल तर त्या ४ दिवसांपर्यंत तग धरू शकतील. विशेष म्हणजे या व्हेसल्सच्या निर्मिती प्रक्रियेत ६० टक्क्यांपर्यंत स्थानिक पातळीवर उत्पादित केलेले सुटे भाग वापरण्यात येणार आहेत.

 

यावर्षी एप्रिल महिन्यात भरलेल्या डिफेन्स एक्स्पो मध्ये इस्रायलची कंपनी 'एल्बीट सिस्टम' बरोबर हे मेमोरँडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग करण्यात आलेले होते.