जॉर्ज सोरॉस- आधुनिक कली
         Date: 27-Nov-2018
जॉर्ज सोरॉस- आधुनिक कली 

- सारंग लेले, आगाशी
  
आयन कुर्दी हा तीन साडेतीन वर्षांचा एक छोटा दुर्दैवी मुलगा. सीरियन निर्वासितांची एक बोट समुद्रात उलटल्यावर त्याचा बिचाऱ्याचा जीव गेला. किनाऱ्यावर पडलेल्या त्याच्या देहाचे फोटो आले आणि जगभरात हळहळ व्यक्त झाली.
ह्या घटनेच्या काही दिवसांत एका ऑस्ट्रेलियन सिनेटपटूने ते फोटो मॉर्फ असल्याचा आरोप केला. फोटो मॉर्फ असल्याचं काही सिद्ध झालं नाही मात्र निर्वासितांच्या प्रश्नामागे काहीतरी कट शिजत असल्याची कुजबुज चालू झाली. ह्या कटामागचा मेंदू असणाऱ्या एका आधुनिक कलीबद्दल ही थोडीशी माहिती. थोडी मोठीय, जरूर वाचा.
कठपुतळ्यांचा खेळ किंवा पपेट शो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जत्रेत किंवा इतर कुठेतरी बघितलेला असतो. त्यातल्या कठपुतळ्यांना स्वतः चं अस्तित्व नसतं. पडद्याच्या मागे त्यांच्या दोऱ्या हलवणारा एक पपेट मास्टर असतो. पेपर मास्टर जसं ठरवेल त्यानुसार पुतळ्यांच्या हालचाली होतात. पडद्यावरचं कथानक तो मास्टर त्याला हवं तसं उभं करतो आणि प्रेक्षक पडद्यावरच्या कथेत गुंतायला लागतात.
आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा अश्या अनेक गोष्टी रंगत असतात.
त्यातल्या घटना आपल्यासमोर येतात. आपण त्या पाहून त्यावर प्रतिक्रिया देत असतो. मात्र त्या घटनांच्या मागच्या योजना (strategies), त्यामागचे डावपेच (Plans) हे सर्वसामान्य माणसाच्या सहज लक्षात येत नाहीत. त्या स्ट्रॅटेजी आणि प्लान्स ठरवणारे मास्टरमाईंडस् असलेले पपेट मास्टर्स पडद्यामागे असतात.
'जॉर्ज सोरॉस' नावाचा एक लिबरल बिलेनियर जागतिक राजकारणातला असा एक पपेटमास्टर आहे. त्याच्याकडचा प्रचंड पैसा हा पपेट खेळवणारे धागे आहेत. सर्वसामान्य लोकांना जॉर्जचं नाव, त्याचं काम माहिती असण्याची शक्यता कमी आहे. पण डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमार पुतीन, बेंजामिन नेतान्याहू, व्हिक्टर ओर्बोन ह्यासारखे मातब्बर जगाच्या मेनस्ट्रीम मीडियात ज्याची दखल घेतात, अनेक घटनांसाठी ज्याला जवाबदार धरतात त्याची माहिती आपल्यालाही असायला हवी.
जॉर्जचा जन्म १९३० सालचा हंगेरीतल्या एका ज्यू कुटुंबातला. १९४३ च्या सुमारास नाझी सैन्याने हंगेरीतल्या ज्यूंना ताब्यात घेऊन छळछावणीत पाठवायला सुरवात केली. त्यावेळी जॉर्जच्या वडिलांनी त्यांचं कुटुंब ख्रिश्चन असल्याचा सरकारी दाखला मिळवला आणि जीव वाचवला. आपल्या शेजारपाजारच्या ज्यूंची रवानगी छळछावणीत होत असताना असताना जॉर्ज आणि त्याच्या वडिलांनी नाझिंशी हातमिळवणी केली आणि आपल्याच लोकांच्या प्रॉपर्टी विकून पैसे कमावले. लहान वयात त्याने आपल्या पाताळयंत्री स्वभावाची एक चुणूक दाखवून दिली. तेरा चौदाव्या वर्षी चालू झालेली त्याची कारस्थानं आज अठठ्यांश्याव्या वर्षीही थांबायचं नाव घेत नाहीयेत.
१९५०च्या दशकात जॉर्ज इंग्लंडमध्ये शिकायला गेला. शिक्षण संपल्यावर स्वतःची फंड मॅनेजमेंट कंपनी चालू केली आणि क्वांटम ग्रुप हेज फंड नावाची स्कीम बाजारात आणली. ती यशस्वी झाली आणि जॉर्जकडे पैसा यायला लागला.
१६ सप्टेंबर १९९२, बुधवारचा दिवस. एक्सचेंज रेट मेकनिझमच्या झोलमध्ये ब्रिटिश स्टर्लिंग पौंड जबरदस्त अडकला होता. पैश्याच्या मार्केटमध्ये एव्हाना जबरदस्त जम बसलेल्या जॉर्जने आपल्याकडचे पौंडस विकून टाकले. ब्रिटिश इकॉनॉमी इतकी गडगडली की तो बुधवार ब्रिटिशांच्या इतिहासात 'ब्लॅक वेनसडे' ठरला. साडेचार बिलयन पौंड्स इतकं नुकसान बँक ऑफ इंग्लंडला झालं. जॉर्जने मात्र त्या व्यवहारात एका दिवसांत एक बिलियन डॉलर्स कमावले. जॉर्ज सोरॉस काय चीज आहे हे एका दिवसात जगाला कळून चुकलं.
पुढे हीच नीती वापरून त्याने मलेशिया, फिलिपाईन्स, थायलंड ही दक्षिण एशियन चलनं मार्केटस पाडली. रशियन रुबलसुद्धा त्याच्या तावडीतून वाचला नाही.
जॉर्ज सोरॉस डावा लिबरल आहे आणि तो डाव्यांच्या विचारसरणीला धरून वागतो. 'ओपन सोसायटी फाऊंडेशन' नावाची एक संस्था जॉर्ज चालवतो. त्या संस्थेमार्फत ओपन सोसायटी, सीमाविराहित देश वगैरे शब्द वापरून जगभरात उच्छाद (हाच शब्द योग्य आहे) मांडण्याचं काम गेली काही वर्षं तो करतोय. युक्रेन पासून ते यूएसएपर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या मोर्चापासून स्त्रियांच्या #metoo चळवळीपर्यंत जॉर्ज पडद्यामागून गोष्टी हलवत असतो. जगात ठिकठिकाणी अशांतता माजवण्यापासून ते सत्तापालट करण्यापर्यंत त्याने आत्तापर्यंत ओपन सोसायटी फाऊंडेशनमार्फत काही बिलियन डॉलर्स ओतले आहेत. त्याची सर्व कृष्णकृत्य नेटवर उपलब्ध आहेत. डाव्यांच्या इतमामाला तडा जाणार नाही असं तो कधी काहीच वागत नाही.
जगाच्या राजकारणात ढवळाढवळ हा त्याचा आवडीचा उद्योग आहे. रिपब्लिकन जॉर्ज बुश निवडून येऊ नये म्हणून त्याने जंगजंग पछाडले आणि डेमोक्रॅट हिलरी क्लिंटन निवडून याव्या म्हणून त्याने २०१६ च्या निवडणूकीत वारेमाप पैसा ओतला.
त्याच्या मुद्द्यांचा प्रॉपोगंडा जगभरात पसरवण्यासाठी लागणारी मीडिया त्याच्या मागे उभी आहे. कारण? पैसा!! हफिंगटन पोस्टमध्ये जॉर्जची गुंतवणूक आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट, फेसबुक, ट्विटर आणि ऍपलमध्ये जॉर्जचे शेअर्स आहेत. त्यामुळे त्यांच्या धोरणावर जॉर्जचा प्रभाव नसेल असं मानणं बालिश ठरेल.
अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाशी जॉर्जचे फार जुने संबंध. बिल क्लिंटनच्या काळापासून. मागच्या महिन्यात अमेरिकन मध्यवर्ती निवडणुका होत असताना रिपब्लिकन पक्षाच्या विरोधकांच्या घरात पॅकेट बॉम्बस् सापडले होते. त्यातला पहिला बॉम्ब जॉर्जच्या घरात सापडला होता. रिपब्लिकन कसे हिंसक आहेत हे दाखवायचा हा निवडणुकांच्या आधीचा प्रयत्न.
२०१६ मध्ये सीरियन निर्वासितांनी त्यांच्या मध्यपूर्वेतल्या धर्मबांधवांना न निवडता नवीन निवाऱ्यासाठी युरोपकडे धाव घेतली. युरोपात अँजेला मर्केलपासून बऱ्याच लोकांना माणुसकीचा पुळका आला आणि त्यांनी निर्वासितांचं स्वागत केलं. मात्र युरोपात वेगवेगळ्या देशात सेटल झाल्यावर निर्वासितांनी आपले रंग दाखवायला सुरवात केली. जर्मनीपासून सर्वत्र स्त्रियांवर अत्याचारापासून ते लुटालुटीपर्यंत गुन्हेगारीच्या घटना वाढल्या. निर्वासित त्रासदायक व्हायला लागलेत ह्याची जाणीव युरोपीयनांना झाली.
२०१६ सालच्या अमरिकेच्या मध्यवर्ती निवडणुका व्हायच्या होत्या. सिरीया उद्ध्वस्त करायची जवाबदारी घेतलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना तिथून युरोपात जाणाऱ्या निर्वासितांचा भयंकर उमाळा आला. त्यांनी त्यांच्या मदतीसाठी आवाहन केलं आणि मदतीसाठी पहिला हात जॉर्ज सोरॉसने पुढे केला. निर्वासित ही युरोपची जवाबदारी असल्याचा कांगावा त्याने चालू केला. निर्वासितांच्या गुन्हेगारीला त्रासलेल्या युरोपाच्या डोक्यावर त्यांनाच वसवण्याचा वसा जॉर्जने घेतला आणि निर्वासितांच्या मदतीसाठी ५०० मिलियन डॉलर्सची भरभक्कम मदत जाहीर केली. त्याची री ओढून गूगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट ह्यासारख्या ५१ कंपन्यांनी एकत्रित ६५० मिलियन डॉलर्स ओतायचे ठरवले.
जॉर्जचं उपद्रवमूल्य युरोपात आता कळून आलं. अँटी मायग्रंट कायदे आणि तरतुदी युरोपात जोर धरायला लागल्या. राष्ट्रावादी, उजवे विचार असलेली सरकारं आणि पक्षांच्या मागे लोकं उभी राहू लागली. निर्वासितांचा स्वस्त मजूर म्हणून उपयोग घ्यायचा आणि त्या बदल्यात युरोपात अशांतता माजवून कायदा सुव्यवस्था वगैरे धुळीला मिळवायची, हा पाताळयंत्री जॉर्जचा कट लोकांना समजू लागला. जॉर्जच्या सर्व संस्थांना बंदी आणणारा थेट 'स्टॉप सोरॉस' नावाचा कायदाच हंगेरीत काही महिन्यांपूर्वी आणला गेला.
सिरिया आणि युद्धग्रस्त मध्यआखातातून आजच्या मितीला रोज हजारो निर्वासित सध्या युरोपात शिरताहेत. पश्चिम युरोप आणि जर्मनी ह्या प्रदेशात मिळणाऱ्या सवलतींमुळे त्या भागात वसण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र संपूर्ण युरोपच्या सीमा ह्या निर्वासितांसाठी खुल्या कराव्यात, अशी मागणी जॉर्जने मागच्या महिन्यात केलीय.
सुस्थितीत नांदणारऱ्या युरोपाची पुरती वाट लावायची, हे टारगेट जॉर्ज सोरॉसचं सध्या असावं.
'बाबा वांगा' ही एक इटालियन महिला युरोपात भविष्यवेत्ती म्हणून प्रसिद्ध होती. लगतच्याच काळात वृद्धापकाळाने तिचं निधन झालं. तिला आधुनिक नोस्त्रदामस असंही म्हंटलं जातं. २०३० युरोपखंडावर इस्लामचं राज्य असेल, असं भविष्य तिने काही वर्षांपूर्वी वर्तवलं होतं. खरोखर असं झालं तर त्याचे परिणाम काय असतील हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र जॉर्ज सोरॉसच्या अंमलाखाली असणाऱ्या युरोपियन राज्यकर्त्यांनी युरोपला त्याच प्रवासाला लावलं आहे, हे मात्र नक्की.