मॅरियट हॉटेल मधील डेटा हॅकिंग मध्ये चीनचा हात ?
         Date: 15-Dec-2018

मॅरियट हॉटेल मधील डेटा हॅकिंग मध्ये चीनचा हात ?

 

जायन्ट मॅरियट हॉटेल मध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या फोनमधील डेटा चोरी झाली होती त्याच्यामागे चीन असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. चीनने जगभर चालविलेल्या सायबर-चोरीच्या मोहिमेचाच हा प्रकार आहे. ह्या डेटा चोरी प्रकरणामागे चाणाक्ष चीनचाच हात असल्याच्या वृत्ताला माईक पॉम्पीओ यांनी दुजोरा दिला.

 

फॉक्स न्यूज च्या "फॉक्स अँड फ्रेंड्स" या कार्यक्रमामध्ये बोलताना ते म्हणाले," चीनने जगभर सायबर हल्ले केले आहेत. ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत. साऊथ चायना सी मध्ये ते मनमानी करीत आहेत. अमेरिकेमध्ये ते हेरगिरी करीत आहेत. तसेच नसत्या कारवाया करीत आहेत."

 

 

मॅरियट हॉटेलच्या हॅकिंगच्या आरोपामुळे बीजिंग आणि वॉशिंग्टन यांच्यातील जिओपॉलिटिक्स, व्यापार, तंत्रज्ञान, हेरगिरी यामधील चढाओढ स्पष्ट झाली.

 

इराणवर असलेल्या निर्बंधांना न जुमानता त्यांच्याशी व्यवहार केल्याप्रकरणी फसवणुकीचे आरोप लावून गेल्या आठवड्यात कॅनडाने अमेरिकेच्या विनंतीनुसार चीनच्या आघाडीच्या हुवाई टेलिकम्युनिकेशन्स कंपनीच्या कार्यकारी अधिकारी असलेल्या मेंग ला अटक केली होती.

 

चीनने प्रत्युत्तरादाखल कॅनडाचे माजी राजदूत मायकेल कोवरींग याना ताब्यात घेतले. मायकेल सध्या इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुप सिक्युरिटी कन्सल्टन्सीमध्ये चीन विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

 

याशिवाय, या आठवड्यात चायनीज मिलिटरी आणि गुप्तहेरांच्या नवीन कारवायांची माहिती उघड करण्याच्या विचारात वॉशिंग्टन आहे. कारण यूएस सरकारला आणि तेथील कॉर्पोरेट जगताला भविष्यात असलेला बीजिंगचा धोका पाहता त्याला आळा घालणे आवश्यक आहे.

 

अमेरिकेने बनविलेली उपकरणे निर्बंध लादलेल्या इराणला पाठवून अमेरिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चीनची ऊर्जा कंपनी यंतई जेरेह ऑईलफील्ड सर्व्हिसेस ग्रुपला या बुधवारी अमेरिकेने २.८ मिलियन डॉलर्सचा दंडही ठोठावला.

 

५०० मिलियन ग्राहकांचे डेटा चोरी प्रकरण-

 

जगातील सर्वात मोठ्या हॉटेल कंपनीच्या ५०० मिलियन ग्राहकांचा संपूर्ण तपशिलासह डेटा चोरणारे हॅकर्स हे चीनच्या सुरक्षा मंत्रालयासाठी काम करीत असल्याबद्दल कोणतीही शंका नाही.

 

या हॅकर्सनी मुख्यत्वे हेल्थ इन्शुरन्स आणि यूएस सिव्हिल सर्व्हिस एम्प्लॉयमेंट ला लक्ष्य करून त्यांचा डेटा हॅक करून हेरगिरी केल्याचे वॉशिंग्टनच्या निदर्शनास आले.

 

मॅरियटने ३० नोव्हेंबर रोजी जाहीर केले की हे सायबर चोर २०१४ पासून त्यांच्या स्टारवूडच्या सिस्टीम मध्ये होते. सप्टेंबर मध्ये हे उघडकीस आल्यानंतर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या प्रकरणाची तपासणी करीत असल्याचे समजते. ज्या लोकांनी ही सिस्टिम वापरली आहे अशा लोकांना सावध करण्यासाठी त्यांचा डेटा कदाचित चोरीस गेला असण्याची शक्यता असल्याची ई-मेल गेल्या काही आठवड्यांपासून मॅरियटने करायला सुरुवात केली आहे. ६० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांचे पासपोर्ट, पत्ते, त्यांचे प्रवास तपशील आणि त्यांच्या क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती चोरीला गेली आहे.

 

कंपनीने म्हटले आहे की क्रेडिट कार्ड डेटा दोन डिक्रिप्शन घटकांद्वारे (सांकेतिक कोडद्वारे) संरक्षित करण्यात आला आहे. परंतु "या क्षणी, प्रत्येक वेळी केला गेला आहे की नाही याविषयी मॅरियट संभ्रमित आहे."

 

त्या शिवाय, कॉम्प्यूटर सिक्युरिटी कंपनी मॅकॅफीच्या एका नवीन अहवालात त्यांनी म्हटले आहे की आण्विक, संरक्षण, उर्जा आणि वित्तीय कंपन्यांच्या संगणक प्रणालीमध्ये सुद्धा हॅकर्सनी घुसखोरी केली असल्याचे आमच्या संशोधकांनी उघडकीस आणले आहे.

 

प्रथमदर्शनी हे हॅकर्स उत्तर कोरियन असल्याचे दिसून येतेय पण या हॅकर्सचा शोध लावणाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी मुद्दामहून प्यॉन्गयांगचा "खोटा ध्वज" वापरलेला असू शकतो.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: DAWN

US believes Chinese intelligence behind Marriott hack.