तालिबान संघटनेत हजारोंच्या संख्येने परदेशी लोक सुद्धा सामील असल्याची तालिबानी कमांडरची कबुली.
         Date: 21-Dec-2018

तालिबान संघटनेत हजारोंच्या संख्येने परदेशी लोक सुद्धा सामील असल्याची तालिबानी कमांडरची कबुली.

 

नुकतेच हजारोंनी परदेशी लढवय्ये आमच्या संघटनेत भरती झाले असल्याची माहिती अफगाण तालिबान मधील एका वरिष्ठ नेत्याने एनबीसी न्यूजला दिली. तालिबानने अल्-कायदा बरोबरचे आपले संबंध कमी केल्यानंतर होणारी ही भरतीची संख्या बुचकळ्यात टाकणारी आहे. अमेरिकेच्या लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेने तालिबानमध्ये कार्यरत असलेल्या अल-कायदाच्या लोकांची संख्या ५० ते १०० अशी वर्तविली होती. परंतु नंतर ती बदलून २०० केली गेली असे वृत्त गेल्या आठ वर्षांपासून अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या एफडीडीच्या लाँग वॉर जर्नलने दिले.

 
 

नाव न सांगण्याच्या अटीवर या तालिबानी नेत्याने एनबीसी न्यूज ला सांगितले की कतार मध्ये युएसशी यासंबंधात तालिबानच्या वाटाघाटी सुरु आहेत. तेथील वृत्त असे-

 

१. आमच्या संघटनेत जवळपास २००० ते ३००० अफगाणी नसलेले असे लोक सामील झाले आहेत. चीन, ताजिकीस्तासन, उझबेकिस्तान, चेचन्या, ट्युनिशिया,येमेन, सौदी अरेबिया आणि इराण येथील लोकांचा यात समावेश आहे.

 

२. कतार मधील खालिलझाद येथे ३ दिवसाच्या चर्चेसाठी आलेल्या या नेत्याने सांगितले," आम्हो मुसलमान आहोत. आणि आमच्या धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे आमच्याकडे आश्रयासाठी म्हणून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही तसेच पाठवू शकत नाही. मग ती स्त्री असो वा पुरुष. तसेच कुठल्याही परदेशी व्यक्तीला आम्ही आमच्या मातीत दुसऱ्या देशावर शस्त्र चालविण्याची परवानगी देत नाही."

 

३. तालिबानचा घटक बनून लढण्यास हजारोनी पाकिस्तानी तयार आहेत.

 

हजारो परदेशी बंडखोर त्यांच्या गटाकडून लढत आहेत हे ठासून आणि परत परत कोणत्या कारणास्तव हा तालिबानी नेता सांगत आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. ( खरेतर हे अल्-कायदाचे बंडखोर आहेत, परंतु हा तालिबानी कमांडर सतत ते "परदेशी बंडखोर" असल्याचे बिंबवत आहे. याची दखल घेणे आवश्यक आहे." कदाचित यूएस सरकारचा तालिबानशी वाटाघाटी करण्यातील निरुत्साह पाहून तो हताश झाला आहे आणि तालिबानचा अल्-कायदाशी संबंध असल्याच्या गोष्टीचा पुनर्विचार अमेरिकेने करावा अशी त्याची अजिबात इच्छा नाही.

 

आठ वर्षाचे एफडीडीचे लाँग वॉर जर्नल संशोधन असे सांगते की कारण काहीही असो पण परदेशी भरती होत आहेच. तसेच या संशोधनात असे दिसून येते की अफगाणिस्तानात अल-कायदाचा पराभव झाला असून तालिबान आणि अल-कायदा एकमेकांपासून वेगळे झाले असल्याच्या सर्व अफवा आहेत. अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या ५० ते १०० बंडखोरांसोबत २०१० ते २०१५ या काळात एलडब्ल्यूजेने अमेरिकेचे लष्कर आणि गुप्तहेरांसोबत लढा दिला. अमेरिकेचे अल्-कायदाविरुद्धचे कारवाईचे वृत्त आणि अल्-कायदाने प्रसिद्ध केलेले वृत्त यांचा ताळमेळ घातला तर असे दिसून येते की अल्-कायदाचे ५० ते १०० दहशतवादी नसून त्या पेक्षा कैक पटीने त्यांची संख्या जास्त आहे. ५० ते १०० हा आकडा गेली सहा वर्षे सांगण्यात येत होता याचा अर्थ अफगाणिस्तानातील अल्- कायदाची यंत्रणा किती बळकट आहे असाच होतो. अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले लक्ष काढून घ्यावे यासाठी त्यांनी फार हुशारीने खेळलेली ही खेळी होती.

 

२०१५ मध्ये जेव्हा यूएस लष्कराने अल्- कायदाच्या कंदहार मधील शोरबाक येथील दोन कॅम्पवर हल्ला केला तेव्हा ५० ते १०० दहशतवादी असल्याचा अंदाज मोडीत निघाला. या हल्ल्यात १५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यूएस लष्कराने ठार मारले होते. हा आकडा पाहिल्यानंतर यूएस लष्कराने त्यांची संख्या २०० असेल असे अनुमान काढले.

 

आता हा तालिबानी नेता सांगतोय की हजारोंच्या संख्येने परदेशी लोक कार्यरत आहेत. आता यूएस लष्कर काय अंदाज वर्तवेल? अमेरिका माघार घेईल की नाही शंकाच आहे आणि ९/११ च्या हल्ल्यानंतर तालिबानच्या बाजूने लढणाऱ्या अल्-कायदाचे दहशतवादी अमेरिकेसोबत तालिबानला वाटाघाटी करण्यास देतील की नाही शंकाच आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: FDD'S LONG WAR JOURNAL

Taliban commander admits thousands of foreign fighters are embedded within group