टोकियो ने हुवेई आणि झेडटीई च्या सरकारी खरेदीवर घातली बंदी.
         Date: 08-Dec-2018

टोकियो ने हुवेई आणि झेडटीई च्या सरकारी खरेदीवर घातली बंदी.

 

योमीरी शिंबून यांनी शुक्रवारी सांगितले की सुरक्षेच्या कारणास्तव जपान चीनच्या दोन सर्वात मोठ्या दूरसंचार कंपन्यांच्या उपकरणांच्या सरकारी खरेदीवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. हुवेई आणि झेडटीई अशी या कंपन्यांची नावे आहेत.

 

खरेदीमधील नियमांमध्ये सोमवारपर्यंत बदल केले जातील. अमेरिकेने ज्या प्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने या कंपन्यांवर बंदी घातली होती तशीच आम्ही पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचे ठरविले आहे. तसेच अमेरिकेने त्यांच्या मित्र राष्ट्रांना सुद्धा तसे करण्याचा आग्रह धरला होता.

 

 

नवीन नियमावलीमध्ये नक्कीच हुवेई आणि झेडटीई च्या उपकरणांवर कायदेशीर बंदी असेल. परंतु या दोन कंपन्यांची नावे मात्र बंदीच्या नियमावलीतून टाळली जातील. बीजिंगचा रोष ओढवून घेणे टाळण्यासाठी या कंपन्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला जाणार नाही. असे जपानच्या एका वृत्तपत्राने म्हटले आहे.

 

चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणाची "गंभीर दखल" घेतली जाईल असे सांगितले. "जपान आम्हाला पारदर्शक आणि नि:पक्ष वर्तणूक देईल असे आम्हाला वाटते. तसेच एकमेकांवरच्या विश्वासाला तडा जाईल अशी कोणतीही कृती जपान करणार नाही अशी आम्ही आशा व्यक्त करतो." असे पत्रकार परिषदेत गेंग यांनी सांगितले.

 

या अहवालामुळे हुवेई कंपनीला अडचणीत आणले आहे. हुवेई कंपनी ५जी मोबाइल नेटवर्क मध्ये जगात आघाडीची कंपनी आहे. कॅनडा मध्ये हुवेईच्या सीएफओला अटक झाल्यानंतर यूकेच्या बीटी ग्रुपने या आठवड्यात जाहीर केले की ते हुवेई नेटवर्क ला आपल्या देशातून हद्दपार करतील आणि ५जी साठी या कंपनीची उपकरणे वापरणार नाहीत.

 

हुवेई ही कंपनी जगातील उत्कृष्ट स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये अग्रेसर कंपनी आहे. परंतु पाश्चात्य देशांमध्ये या कंपनीबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे. तसेच प्रतिबंधित देशांना तंत्रज्ञान निर्यात केल्यामुळेही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 

गेल्या काही वर्षांपासून हुवेईने उत्तर कोरिया आणि इराण या प्रतिबंध लादलेल्या देशांना दूरसंचार उपकरणे पुरविली आहेत. हे देश या उपकरणांचा हेरगिरीसाठी मोठ्या प्रमाणात वापर करू शकतात. हुवेई कंपनीने हे आरोप नाकारले आहेत.

 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ने आधीच हुवेईचे ५जी नेटवर्क वापरणार नसल्याचे जाहीर केले आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: ASIA TIMES

Tokyo will ban government purchases of Huawei, ZTE gear: report