भारतीय सेनेने नियंत्रण रेषेजवळील नौगाम सेक्टर मध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानच्या बॅटचा प्रयत्न उधळून लावला.
         Date: 02-Jan-2019

भारतीय सेनेने नियंत्रण रेषेजवळील नौगाम सेक्टर मध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानच्या बॅटचा प्रयत्न उधळून लावला.

 

रविवारी जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याच्या पाकिस्तानच्या मनसुब्यावर भारतीय लष्कराने बोळा फिरविला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारतात घुसून मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा पाकिस्तान बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) डाव होता. या घुसखोरांनी भारताच्या नियंत्रण रेषेजवळील जंगलातून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना पाकिस्तानी चौक्यातून मोर्टार आणि रॉकेट लॉन्चर सारख्या शस्त्रांनी कव्हरिंग देण्यात आले होते. परंतु त्यांच्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चांगलेच प्रत्युत्तर दिले. रात्रभर दोन्हीकडून गोळीबार चालू होता.


 
 

 

या घुसखोरांच्या अंगावर पाकिस्तानी सैनिकांच्या पोषाखासारखा पोशाख होता आणि त्यांच्याजवळ जे सामान सापडले त्यावर पाकिस्तानी लष्कराचे चिन्ह होते. त्यातील काही बीएसएफच्या पोशाखात होते तर काही आएच्या. त्यांच्याजवळ सापडलेल्या सामानावरून ते नक्कीच भारतीय सैन्यावर मोठा हल्ला चढविण्याच्या तयारीने आलेले दिसत होते. भारतीय सैनिकांनी घनदाट जंगलात कसून तपासणी केली त्यामध्ये त्यांना दोन बॅटचे घुसखोर गोळीबारात मेलेले आढळून आले.

 

बॅट विषयी अधिक माहिती-

भारतासाठी वीर मरण पत्करलेल्या लान्स नायक हेमराज यांचे शीर कापण्याचा आरोपही याच बॅटच्या टोळीवर आहे. या टोळीमध्ये पाकिस्तानी सैनिकांबरोबरच दहशतवादी देखील सामील असतात. यांना अतिशय कठोर असे प्रशिक्षण दिले जाते. क्रूरतेच्या सर्व सीमा हे लोक पार करू शकतात.

 

या लोकांना स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी) कडून प्रशिक्षित केले जाते. युद्धाचे कोणतेही नियम यांना अडवू शकत नाहीत कारण त्यांना तश्याच प्रकारे तयार केले जाते. यामध्ये जास्त करून दहशतवाद्यांना समाविष्ट केले जाते. म्हणजे पकडले गेल्यावर पाकिस्तानी लष्करावर कोणताही आळ येणार नाही. वरिष्ठ अधिकारी मात्र लष्कराचेच घेतले जातात.

 

भारतात घुसखोरी करायच्या वेळी पाकिस्तानी सैनिकांकडून नियंत्रण रेषेवर मुद्दाम गोळीबार केला जातो. मग युद्धबंदीला ते जुमानत नाहित. या गोळीबाराच्या आडून हे भारतात घुसखोरी करतात.

 

पाकिस्तानकडून मिळणारे कव्हरिंग आणि खराब हवामान असल्याने त्याचा फायदा घेऊन काही घुसखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर गोळीबार थांबल्यानंतर ड्रोनच्या सहाय्याने केलेल्या तपासणीमध्ये दोन बॅटचे दहशतवादी मेलेले आढळून आले. त्यांच्याजवळ आयईडी, काही शस्त्रे आणि विस्फोटक सामुग्री सापडली. यावर पाकिस्तान असे लिहिले होते.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Content Generation)