पाकिस्तानचा पाठिंबा असलेले दहशतवादी गट भारतावर आणि अफगाणिस्तानवर हल्ला करतच राहतील : अमेरिकन गुप्तहेर.
         Date: 31-Jan-2019

पाकिस्तानचा पाठिंबा असलेले दहशतवादी गट भारतावर आणि अफगाणिस्तानवर हल्ला करतच राहतील : अमेरिकन गुप्तहेर.

 

नॅशनल इंटलिजन्सचे संचालक डॅन कोट्स म्हणतात, " दहशतवादाच्या विरोधात सहकार्य करण्यात दाखविलेली अरुची, काही दहशतवादी गटांचा आपल्या फायद्यासाठी पाकिस्तानने केलेला धोरणात्मक वापर आणि तालिबान विरुद्ध न लढता फक्त पाकिस्तानलाच त्रास देणाऱ्या दहशतवादी गटांविरुद्ध लढण्याची पाकिस्तानची इच्छा हेच अमेरिकेला नाऊमेद करीत आहे. पाकिस्तानचा पाठिंबा असलेले दहशतवादी गट पाकिस्तानचा आश्रय घेऊन भारत आणि अफगाणिस्तानवर हल्ला करायचा कट करतात आणि तो यशस्वीरित्या राबवतात ते ही अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता."

 

 

 

कोट्स आणि अमेरिकेतील इतर इंटलिजन्स एजन्सीच्या गटांचे प्रमुख यांची सिनेट सिलेक्ट कमिटी इंटलिजन्स च्या सभेआधी एक बैठक झाली. यामध्ये सीआयए चे संचालक जिना हेस्पेल (जे नुकतेच भारत भेटीतून परतले आहेत), एफबीआय चे संचालक ख्रिस्तोफर रे आणि डिफेन्स इंटलिजन्स एजन्सीचे संचालक रॉबर्ट ऍशली यांचा प्रामुख्याने सहभाग होता. संपूर्ण जगात झपाट्याने पसरणारा दहशतवाद हाच या बैठकीचा विषय होता.
 

साऊथ एशिया संबंधी जे वक्तव्य होते ते अमेरिकेच्या इंटलिजन्स कम्युनिटीने २०१९ मध्ये जगभरातील दहशतवाद मोडून काढण्याच्या अमेरिकेच्या लढाईतील महत्त्वाचा हिस्सा आहे आणि कोट्स यांच्या अध्यक्षतेखालील सिनेट सिलेक्ट कमिटीच्या डॉक्युमेंट मध्ये लिखित स्वरूपात देखील ते आहे.

 

जुलैच्या मध्यात होणारे अफगाणिस्तानमधिल अध्यक्षिय इलेक्शन, तालिबानकडून होणारे मोठे हल्ले, पाकिस्तानचे दहशतवादी गटांशी असणारे हटवादी वर्तन आणि भारतात होणारी निवडणूक या २०१९ मध्ये घडणाऱ्या घडामोडींमुळे साऊथ एशियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांप्रदायिक हिंसा घडून येतील असे मत कोट्स यांनी व्यक्त केले.

 

" इतर देशांकडून असणारे सहकार्य जर आता आहे त्या परिस्थितीच राहिले तर अफगाण सरकार किंवा तालिबान या दोघांनाही अफगाण युद्धात यश मिळणार नाही. त्यांना कसल्याही प्रकारचा रणनैतिक धोरणात्मक फायदा होऊ शकणार नाही, " असे कोट्स यांनी सांगितले.

 

अफगाण सैन्याच्या ताब्यात असलेली काही शहरे आणि सरकार यावर तालिबान्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. आता तर तालिबानने या हल्ल्यात वाढच केली आहे. त्यामुळे सतत संरक्षणासाठी अफगाणला मोठ्या प्रमाणात सैन्य लागत आहे. तसेच बचावात्मक कार्यात अडकल्यामुळे अफगाण सैन्याला आपल्या हातून गेलेला प्रदेश परत मिळविण्यास खूप कष्ट पडत आहेत.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: TOI

Pak-supported terror groups will continue attacks in India, Afghanistan: US spymaster