चायनीज नववर्षाच्या उत्सवात मुसलमानांना पोर्क (डुकराचे मांस) खाण्याची आणि दारू पिण्याची सक्ती.
         Date: 08-Feb-2019

चायनीज नववर्षाच्या उत्सवात मुसलमानांना पोर्क ( डुकराचे मांस ) खाण्याची आणि दारू पिण्याची सक्ती.

 

कथित कारवाईच्या नावाखाली चीनच्या अधिकाऱ्यांनी झिंजियांग प्रांतातील मुसलमानांवर डुक्कराचे मांस आणि दारू पिण्याची सक्ती केली. ही सक्ती चायनीज चंद्र वर्षाच्या उत्सवादरम्यान केली गेली.

 

इली कझाकच्या स्वतंत्र परफेक्च्युअर मध्ये राहणाऱ्या लोकांना या उत्सवासाठी आमंत्रण होते. जर या उत्सवात ते सहभागी झाले नाहीत तर त्यांना पुन्हा पुनर्शिक्षण केंद्रात डांबण्यात येईल अशी भीती देखील घातली गेली होती असे वृत्त रेडिओ फ्री एशिया (आरएफए) ने दिले आहे.

 

डुक्कराचे मांस खाणे इस्लामला निषिद्ध आहे.

 

 

 

झिंजियांगमधील कझाक लोकांनी कधीही पोर्क(डुकराचे मांस) खाल्ले नाही. गेल्या वर्षीपासून काही लोकांना डुकराचे मांस खाण्यास भाग पाडले गेले आहे जेणेकरून ते हान चायनीजचा उत्सव साजरा करू शकतील.
 

आरएफएच्या अहवालात असे म्हटले आहे की चिनी अधिकाऱ्यांनी मुस्लिम कुटुंबामध्ये थेट डुकराचे मांस पाठवून दिले आहे आणि त्यांच्या घराबाहेर चिनी नववर्षाची पारंपरिक सजावट दिसलीच पाहिजे अशी सक्ती केली आहे.

 

ही काही या वर्षीचीच घटना नाहीये. एका ख्रिश्चन एनजीओनी प्रकाशित केलेल्या फेब्रुवारी २०१८ च्या एका अहवालात सुद्धा असेच म्हटले गेले होते. फक्त थोडासा शाब्दिक खेळ करून ही गोष्ट सांगण्यात आली होती. झिंजियांगमधील मुस्लिमांना नवीन वर्षाच्या उत्सवात भाग घेण्यास भाग पाडण्यात आले होते आणि त्यांना स्वतःच्या हाताने बनविलेले जेवण न जेवता चायनीज अधिकाऱ्यांनी बनविलेले उत्सवातील जेवण जेवण्याची सक्ती केली गेली होती. जेवण बनविण्यासाठी कोणते पदार्थ वापरले गेले आहेत याची जरासुद्धा माहिती या मुस्लिम लोकांना देण्यात आली नाही.

 

गेल्या ऑक्टोबर मध्ये झिंजियांगच्या उरुमकी शहरातील चिनी अधिकाऱ्यांनी मुसलमानांच्या "हलाल" विरुद्ध मोहीम उघडली होती.

 

उयघूर आणि कझाख मुस्लिम लोकसंख्या असलेल्या झिंजियांग मधील मुस्लिम लोकांच्या कट्टरतावादाविरुद्द चिनी अधिकारी जोरदार अभियान चालवीत आहेत. मानवाधिकार संस्था आणि परदेशी सरकार यांनी चीन पद्धतशीरपणे मुस्लिमांचे या प्रदेशातून उच्चाटन करीत असल्याचा आरोप केला आहे. सुमारे दहा लाख लोकांना तथाकथित पुनर्शिक्षण केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहे जिथे त्यांना कम्युनिस्ट पार्टीचे गुणगान गाण्यास सक्तीने भाग पाडले जाते आणि त्यांच्या धर्माच्या शिकवणुकीविरुद्ध वागण्यास भाग पाडले जाते. या पुनर्शिक्षणकेंद्रात राहून आलेल्या लोकांनी असा दावा केला आहे की आत असताना त्यांना पोर्क आणि अल्कोहोल खाण्यास भाग पाडण्यात आले होते.

 

या प्रकल्पा अंतर्गत हान चे चिनी अधिकारी आणि नागरिक यांना सतत मुस्लिम कुटुंबांकडे पाळत ठेवण्याच्या हेतूने राहण्यासाठी पाठविले गेले आहे. या चार वर्षात इस्लाम धर्माला "कलंकित" करण्याचे चीनचे उद्दिष्ट उघडकीस आले आहे.

 

अल्पसंख्यांकांच्या धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि झिंजियांगमध्ये हिंसा पसरविणाऱ्या गटांपासून यांचे रक्षण करण्यासाठी चीन ने "व्यावसायिक शिक्षण केंद्रे " सुरु केली आहेत.

 

ह्यूमन राईट्स वॉच आणि अम्नेस्टी इंटरनॅशनल समवेत इतर गटांनी युनायटेड नेशन्स ह्यूमन राइट्स काउन्सिलला या प्रदेशात कानावर येणाऱ्या या गोष्टीत तथ्य आहे की नाही हे शोधण्यासाठी एक टीम पाठविण्याची विनंती केली आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: INDEPENDENT

China ‘forcing Muslims to eat pork and drink alcohol’ for lunar new year festival.