मुसलमानी टोळ्यांकडून होणारे शीख महिला व मुलांचे शोषण आणि ब्रिटनची एकांगी भूमिका- एक आढावा
         Date: 14-Mar-2019

मुसलमानी टोळ्यांकडून होणारे शीख महिला व मुलांचे शोषण आणि ब्रिटनची एकांगी भूमिका- एक आढावा

 

डाॅ.आर्या जोशी

(क्लिट क्लारेनबर्ग यांच्या लेखाचा स्वैर भावानुवाद)

ICRR Media Monitoring Desk

 

अनेक वर्षे जगासमोर न आलेली घटना आता जगासमोर आल्याने एक मोठा धक्का सर्व जगालाच बसला आहे. पाकिस्तानी पुरूषांकडून शीख मुलांचा होणारा लैंगिक छळ ही ती घटना. अशा अनेक घटना गेली काही वर्ष घडत असूनही संबंधित अधिकार्‍यांकडून त्या समाजासमोर न येण्याचेच प्रयत्न यापूर्वी झाले आहेत. पण आता हे सत्य उघडकीला आले आहे.

 

मागील काही दशके ब्रिटनमधे शीख मुली विशेषतः पाकिस्तानी पूरुषांच्या टोळ्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. पण राजकीय मर्यादांचे कारण पुढे करून पोलिसांनीही हे प्रकरण दडपून बेपर्वाईच दाखविली आहे.

 

शीख मध्यस्थ आणि पुनर्वसन समितीकडून सादर केल्या गेलेल्या अहवालानुसार इ.स.१९६०पासूनच या घटनांची सुरूवात झाली होती. शीखबहुल शाळा आणि परिसरात अतिशय पद्धतशीरपणे योजनापूर्वक आकर्षक पोशाख घातलेले आणि आकर्षक दुचाकींवर फिरणारे मुसलमान युवक फिरत असत. या युवकांकडे आकर्षिल्या गेलेल्या शीख युवती आणि महिला यांचे शास्रशुद्ध बौद्धिक घेतले जात असे. त्यांचे मनःपरिवर्तन केले जात असे. त्यानंतर तो युवक त्या महिलेला अथवा मुलीला आपल्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांकडे सुपूर्द करत.

 

क्लिट क्लारेनबर्ग पुढे नोंदवतात की शीख महिलांच्या मुलाखती घेतल्यानंथर हे धक्कादायक वास्तव त्याच्याकडून ऐकून मी हतबुद्ध झाले. गेली अनेक दशके ही मुस्कटदाबी सूरु आहे आणि तिचा प्रसार फार वेगाने मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या सुनियोजित फसवणुकीचे मुसलमानांचे सत्र गेली अनेक दशके यशस्वी ठरले आहे. याची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणीही सूत्रांकडून केली गेली आहे.

 

या बातमीमुळे जनक्षोभ वाढला असून ब्रिटीश शीख मंडळींनी याविरोधात आवाज उठविला आहे. दीपा सिंग या पुनर्वसन समिती सदस्येने नोंदवले आहे की काही काळ या मुस्लिम टोळ्यांशी संघर्षकरण्याचा प्रयत्नही स्थानिक शीखांनी करून  झालेला आहे!!!

 

आमच्यासाठी ही एक ऐतिहासिक समस्याच आहे खरं तर!


मुसलमानांकडून होणारे कोवळ्या शीख मुलींचे शोषण हा मुद्दा नाईलाजाने मान्य केला गेला आहे कारण आम्ही अल्पसंख्यांक आहोत. पण असे असूनही १९७०  सालापासून १९९० पर्यंत सातत्याने या गोष्टीबद्दल अधिकृतपणे नोंद करूनही,तक्रार करूनही कागदाचे कपटे अलगद गालिच्याखाली सरकवून टाकावेत तशा आमच्या तक्रारी दृष्टीआड केल्या गेल्या आहेत.

 

लाॅर्ड इंद्रजित सिंग ही ब्रिटीश शीख समितीचे सन्माननीय सदस्य असून नेटवर्क आॅफ सीख आॅर्गनायझेशन चॅरिटी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. अधिकृतपणे शासन दरबारी अशा लेखी तक्रारी बेपर्वाईने नाकारल्या जात असल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले आहे. सांप्रदायिक सलोख्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या आणि शासनाशी संलग्न असणार्‍या समितीपुढेही हा मुद्दा मांडला गेला आहे. या समितीमधील संबंधित मुसलमानी सदस्यही वस्तुस्थिती माहिती असूनही कानांवर हात ठेऊन गप्प राहिले आहेत.

 

शासनाची ही एकांगी खेळी आहे. अशी काही वस्तुस्थिती अस्तित्वातच नाही असे म्हटले की त्याची चौकशी करणे असा काही विषयच उरत नाही!

 

इस्लामचा महिलाविषयक दृष्टीकोन अतिशय नकारात्मक आहे. त्यांची वांशिक जडणघडणही तशीच आहे. पवित्र कुराणही त्यांना महिलाविरोधातच शिक्षण देते. अन्य संप्रदायातील स्रियांकडेही याच दृष्टीने पाहिले गेल्याने त्यांचे शोषण ही मुसलमानांसाठी फार सहज बाब आहे हे नाकारून चालणार नाही.

 

इस्लामच्या अशा टोळ्यांपासून आपल्या कुटुंबाला ,महिलांना वाचविण्यासाठी अनेक शीख पुरुषांनी त्याग केला आहे. त्यांच्या या समाजहिताच्या विचारासाठी मात्र अनेकदा त्यांच्यावर खटले भरले जाऊन त्यांना शिक्षा झाली आहे.

 

पीटर मॅकलाउलीन याने २०१४ साली असे एक सर्वेक्षण केले. पण शीख मुलींचे शोषण करणार्‍या मुसलमानी टोळ्यातील एकाही सदस्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला किंवा त्याला शिक्षा झालेली त्याला आढळून आलेली नाही.

 

१९८८ साली वाॅल्वरहॅम्पटन येथे शीख मुलींना अशा टोळ्यांपासून वाचविण्यासाठी शीखांच्या टोळ्या तयार झाल्या. शेर ए पंजाब ही त्यापैकी एक होती. मुसलमान टोळ्यांविरूद्ध झालेल्या संघर्षात या टोळ्यांमधील शीख तरूणांनी मुसलमानांवर केलेल्या हल्ल्याच्या आरोपावरून त्यांनाच शिक्षा करण्यात आली.

 

या टोळ्यांनी शीखबहुल प्रांतात छापील पत्रेक वाटली. मुसलमान युवकांच्या टोळ्या शीख मुलींना आकर्षित करतात. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना वेश्या व्यवसायासाठी पाठवले जाते. याबाबत सतर्कता पाळा.

 

पोलिसांनी शेर ए पंजाबच्या सदस्यांना अशा फिरणार्‍या मुसलमान टोळ्यातील युवकांची नावे आणि वाहनांचे क्रमांक नोंदवण्यास सांगितले. या युवकांनी काही कृत्य केल्यास त्याआधारे पुढील कारवाई करू असे आश्वासनही देण्यात आले.पण प्रत्यक्षात असे लैंगिक शोषण करणार्‍या युवकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पण त्यामुळे मुसलमान युवकांना अधिक धैर्य मिळाल्याने त्यांच्या हेतूंची यशस्विता वाढतच राहिली. त्यामुळे सामाजिक माध्यमे आणि पोलिसांकडून दुष्कृत्ये करणार्‍यांना संदेशच मिळाला की तुमचे चालले आहे ते चालू दे. आम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष करू. निश्चिंत रहा.

याचीच परिणती म्हणून १९८८साली सीख अवेअरनेस सोसायटीचीस्थापना झाली. मोहन सिंह हे याचे संस्थापक  असून अशा टोळ्यांपासून बचाव करणे आणि अन्य आपत्कालीन मदतीसाठी २४ तास चालू असणारी मदतसेवा सुद्धा या संस्थेने उपलब्ध करून दिली.

 

ब्रिटनमधील रोथरहॅम हे मुलांचे लैंगिक शोषण करणारे महत्वाचे कारस्थान केंद्र होते. शासनाला याविषयी माहिती असूनही त्याबाबत गोपनीयता पाळली गेली.

 

मुलांवर लैंगिक अत्याचार होणे,त्यांचा अनुषंगिक छळ हे सर्व येथे घडत होते. १९८० पासून २०१० सालापर्यंत सुमारे १४०० मुले अत्याचारपीडित होती. या मुलांच्या आई आणि बहिणींनाही लक्ष्य करणे आणि त्यांना वेश्या व्यवसायासाठी दुसर्‍या शहरात विकणे असे प्रकारही येथे सर्रास घडत होते. काही अल्पवयीन पिडीत मुली यामधे गरोदरही राहिल्या.

 

हे प्रकरण जगासमोर बातमी म्हणून आल्यानंतर रोथरहॅममधे चौकशी समिती नेमली गेली. १९९६पासून इस्लामच्या अशा शोषण करणार्‍या टोळ्यांबद्दल माहिती असूनही त्याविषयी मौन पाळले गेले होते.

 

 

त्यानंतर मात्र रोथरहॅम कौन्सिलने ११ ते २५ वयोगटातील मुलींसाठी सुरक्षा यंत्रणा निर्माण केली. जेनी सिनीअर हिने  २०१० मधे एक यंत्रणा निर्माण केली. तिने या टोळ्यांच्या कामासंबंधी गोळा केलेली माहिती संगणकीय सुविधांद्वारे तिने पोलिसांना पाठवण्याची व्यवस्था केली. पण काही काळानंतर तिला लक्षात आलं की तिने पाठवलेली कुठलीही माहिती कुणीही अधिकृत व्यक्तींनी पाहण्याचे कष्टही घेतले गेले नव्हते!

 

२०१३साली प्रा.अॅक्सिस जे यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र चौकशी समिती नेमली गेली. यामध्ये रोथरहॅममध्ये घडणार्‍या छळांची दखल वंश,जात,लिंग यांच्या निकषांवर घेतली गेली. यामधे लक्षात आले की हल्लेखोरांची वांशिक मानसिकता,पीडितांना त्यांच्याकडून मिळणारी तिरस्करणीय वागणूक यामुळे समाजातील आणि प्रदायांमधील तेढ वाढते आहे आणि ती सामाजिक स्वास्थ्य दूषित करते आहे. पण शहराची तथाकथित अस्मिता जपण्यापोटी कामगार वर्गातील पीडितांवर होणारे अत्याचार दाबून टाकले जात आहेत.

 

पीटर ग्रिमले या लेखकाने या टोळ्यांच्या दुष्कृत्याला वाचा फोडण्यासाठी पुस्तकही लिहीले. पण तो नोंदवतो की मी समाजाला जागे करण्यासाठी हे पुस्तक लिहूनही पाच वर्ष झाली. पण परिस्थिती आजही बदललेली नाही.२०२४ सालीही या टोळ्यांची पाठराखण करणे देशाने सोडले नाही तर येणार्‍या परिस्थितीची कल्पना न करणेच बरे.

 

अल्पसंख्यांक शीख महिला आणि मुले यांच्यावर गेली काही दशके सातत्याने मुसलमानी टोळ्याकडून होत असलेल्या  हल्ल्यांचा आणि टोळ्यांचा हा आढावा मन सुन्न करणारा आहे. पण शासनाची यातील भूमिका जर देखते रहो अशीच राहिली तर मग शीखांवर होणार्‍या अन्यायाची कल्पनाही न करणे योग्य ठरेल काय?