जीझस ख्राईस्टच्या मिथकाची सत्यकथा
         Date: 17-Dec-2020

जीझस ख्राईस्टच्या मिथकाची सत्यकथा


dead sea scrolls_1 & 

प्रत्येकाची धार्मिक निष्ठा आणि श्रद्धा हा नेहमीच आदराचा विषय असतो आणि असावा. मात्र जेव्हा आपल्या धार्मिक श्रद्धांना धक्का लागावा आणि धर्माधिष्ठित समाजरचना कोलमडून पडावी यासाठी करोडो रुपये ओतून मुद्दाम प्रयत्न केले जातात तेव्हा ते एकप्रकारे वैचारिक आणि धार्मिक युद्धच असते. आणि अशी युद्धे लढताना अशा धार्मिक भावना किंवा श्रद्धांचा विचार करता येत नाही!


तर... थोडं भूतकाळात..

इसवी सन १९४७-४८

आजच्या इस्त्राएलमधला, मृत समुद्राजवळचा कुमरान नावाचा भाग होता. तिथल्या डोंगराळ भागात काही मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरवायला घेऊन गेले होते. मेंढ्यांना चरायला सोडून तिथल्याच जवळच्या गुहांमधून भटकत असताना त्याना एका गुहेत काही जुनी मडकी आणि त्या मडक्यांमध्ये काही भेंडोळी सापडली. काहीतरी जुनी आणि फारच प्राचीन वस्तू दिसते असा अंदाज आल्यामुळे त्यांनी ती मडकी बेथलेम(जेरुसलेम) मधील एक फ्रेंच कॅथेलिक चर्चच्या स्वाधीन केली. नंतर तेथील आजूबाजूच्या एकूण अकरा गुहांमध्ये शोध घेण्यात आला आणि अशी आणखीही काही, एकूण ९८१, भेंडोळी त्या भागात सापडली. त्यातील भेंडोळ्यांच्या प्राथमिक पहाणीत ती साधारण दीड-दोन हजार वर्षांपूर्वीची असून काही भेंडोळी अरेमाईक भाषेत लिहिली असल्याचा अंदाज तेथील फ्रेंच कॅथोलिकांना आला. अतिशय कोरड्या हवेमुळे अतिशय सुस्थितीत असणारी ती भेंडोळी पाहून त्यात साधारण काय लिहिले असू शकेल याचा अंदाज येऊन तत्काळ ती भेंडोळी दडपून टाकली गेली..

इसवी सन १९८४-८५

एकोल बिब्लिक(Ecol Biblique) जेरुसलेम येथे जवळजवळ गेलं अर्धशतक नुसती पडून असणाऱ्या या भेंडोळ्यांचा सुगावा ऑक्सफर्डमधील रॉबर्ट आयसेनमन नावाच्या एका अमेरिकन अभ्यासकाला लागला. अनेक खटपटी करून त्याने या भेंडोळ्यांचे फोटो मिळवले. शेवटचा फोटो हाती आलाय्वर त्याने या गोष्टीचा उच्चार जाहीरपणे केला, आणि मग ही भेंडोळी अभ्यासासाठी खुली केली गेली. अभ्यासाअंती असे लक्षात आले की ही भेंडोळी म्हणजे एक जुनं गॉस्पेल आहे, जेम्स नावाच्या एका मसीहा किंवा देवदूताचं गॉस्पेल. सध्या प्रचलित असणारे बायबल किंवा न्यू टेस्टामेंट आणि जेम्सचे गॉस्पेल यात बरेच साधर्म्य होते, किंबहुना ते एकच होते.....

इसवी सनाचे पहिले शतक किंवा त्यापूर्वीचा काळ..

ज्यूंवर रोमनांची सत्ता होती. तत्कालीन ज्यूंमध्येसुद्धा देवदूताची संकल्पना(Messianic concept) होती. कोणतंही संकट आलं किंवा एखादी रोगाची साथ पसरली तर एखादा देवदूत येईल आणि आपलं रक्षण करेल अशा भावनेतून त्याचं एखादं गॉस्पेल लिहिलं जाई. अशी सुमारे ४५० जुनी गॉस्पेल्स त्याकाळी अस्तित्वात होती. अशाच जेम्स नावाच्या एका देवदूताचं बायबल त्यावेळी त्यांनी त्यांच्या त्यावेळी प्रचलित असणाऱ्या अरेमाईक भाषेत लिहिलं होतं. जेरुसलेम तेव्हा रोमनांच्या ताब्यात होतं. आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी रोमन्स आटोकाट प्रयत्न करत होते. ज्यूंच्या सततच्या बंडांमुळे रोमनांना आपलं राज्य राखणं आणि कठीण जात होतं. त्यावेळी रोमन administrative officer किंवा तत्सम जबाबदारी असणारा पॉल नावाच्या सरदाराने याला सगळ्याला कंटाळून एक वेगळाच उपाय शोधला. आपले राज्य आणि संस्कृती यहुदी स्वीकारत नाहीत म्हटल्यावर त्याने यहुद्यांची संस्कृतीच उचलण्याचे ठरवले. त्याकाळी लिहिले गेलेले जेम्स गॉस्पेल जसेच्या तसे रोमनमध्ये भाषांतरीत करून घेतले. मूळ जेम्सच्या जागी जिझस निर्माण केला गेला. आणि त्याचा जन्म दिवस म्हणून त्याकाळी यहुद्यांमध्ये प्रचलित असणारा सूर्यदेवतेचा जन्मदिवस- २५ डिसेंबर लिहिला गेला! मूळ जेम्सच्या टेस्टामेंटमध्ये जेम्सच्या जन्मदिवसाबद्दलचा कोणताही उल्लेख नाही. किंबहुना जीझस येशू, मदर मेरी किंवा जीझसचे क्रूसीफिकेशन यातला कोणताही उल्लेख मूळ टेस्टामेंटमध्ये नव्हता. मूळचे यहुदी असणारे जेम्सचे गॉस्पेल विविध बदल करून न्यू टेस्टामेंट म्हणून प्रचलित केले गेले. (सध्या देखील हेच टेस्टामेंट प्रचलित आहे.) २५ डिसेंबर या दिवशी सूर्यदेवतेचा उत्सव सोडून जीझसचा जन्मदिवस साजरा करायला सुरुवात केली गेली. अर्थातच प्रजेने स्वीकारावा म्हणून रोमन राज्यकर्त्यांनीसुद्धा, आपली मूळ रोमन संस्कृती सोडून या नव्याच पंथाचा स्वीकार केला, आणि प्रजेलाही तो सक्तीने करायला लावला. ज्यांनी तो नाकारला, त्यांना क्रूरपणे मारले गेले. कित्येक ज्यू या दहशतीने आपला मूळ प्रदेश सोडून जगभर विखुरले. पुढे रोमन सम्राट कॉन्स्टेंटाईन द ग्रेट याने जीझस ख्राईस्टच्या तथाकथित जन्मानंतर अडीचशे वर्षांनी ,त्याकाळी प्रचलित अन्य सर्व ४५० गॉस्पेल्स जाळून नष्ट केली आणि फक्त न्यू टेस्टामेंटचे पालन करण्याचा हुकुम सोडला आणि न्यू टेस्टामेंटच्या आधी नेमकी काय व्यवस्था होती ही समजण्याचे मार्गच बंद झाले. न्यू टेस्टामेंटमधल्या जीझस येशू सकट सगळ्या धादांत खोट्या आणि अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींमागे हा पंथ आणि याचे अनुयायी चालू लागले.. मात्र या संहारातून वाचलेलं चर्च ऑफ जेम्सचं गॉस्पेल अचानक मृत समुद्राजवळच्या त्या गुहांमध्ये सापडलं.. आणि ख्रिश्चन धर्माच्या मुळालाच भयानक मोठा हादरा बसला.

हेच सत्य पुढल्या पिढ्यांसमोर उघड होऊ नये, म्हणून न्यू टेस्टामेंट सोडून अन्य ४५० गॉस्पेल्स आणि त्यांना मानणारी माणसे निर्दयपणे नष्ट केली गेली. हेच सत्य उघड होऊ नये, म्हणून ती भेंडोळी कॅथलिकांनी आजवर दडवून ठेवली. मात्र सत्य दडून रहात नाहीच.

ज्या यहुद्यांची मूळ भाषा अरेमाईक किंवा नंतर हिब्रू होती, त्यांचा धर्मग्रंथ रोमन भाषेत का लिहिला गेला असेल? या प्रश्नाचं उत्तर इथे सापडतं. जेत्यांनी जितांवर वर्चस्व मिळविण्यासाठी अजिबात अस्तित्वात नसलेला एक मसीहा किंवा देवदूत निर्माण केला आणि जगावर त्याचं अस्तित्व मान्य करायला लावण्यासाठी रक्तरंजित संघर्ष मांडला, जो आजही संपलेला नाही.

आर्टीफिशीअल इंटेलिजन्समधील पहिल्या पिढीचे शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ एन.एस.राजारामन यांनी आपल्या ‘dead sea scrolls & crisis of Christianity’ या पुस्तकात यासंदर्भातली अनेक गुपिते उघड केली आहेत. सखोल माहितीसाठी हे पुस्तक जरूर वाचावे असेच आहे.


वेद आणि पुराणांच्या, उपनिषदांच्या सत्यतेवर, हिंदू धर्मातील सणांवर सतत टीका करणारे दोन्ही धर्म- मुसलमान आणि ख्रिश्चन यांचा मूळ पाया किती डगमगलेला आहे याची कल्पना करता येते का? अतिशय समृद्ध तत्वज्ञान, कला, सखोल अभ्यास, अत्यंतिक श्रमातून विकसित केलेली विविध शास्त्रे, असा स्वत:चा वारसा असणारा हिंदू धर्म केवळ धर्मप्रसारासाठी कधीही रक्तरंजित लढाई मांडत नाही हे इतिहास सांगतो. तरीही यासगळ्याकडे डोळेझाक करत, दिवाळीच्या फटाक्यांचे आणि होळीच्या रंगांचे दाखले पुराणात शोधू पहाणारे हाच प्रश्न ख्रिसमसच्या बाबतीत उघडपणे कधी विचारतील?

 
     - मैत्रेयी गणपुले -जोशी