हक्कानी नेटवर्क ९/११ च्या पुनरावृत्तीच्या बेतात - माजी अफगाणी गुप्तहेर प्रमुख.
          Date: 20-May-2020

हक्कानी नेटवर्क ९/११ च्या पुनरावृत्तीच्या बेतात - माजी अफगाणी गुप्तहेर प्रमुख. 

 

पाकिस्तान पुरस्कृत हक्कानी नेटवर्क हे अल-कायदा या संघटनेला पाश्चिमात्य देशांवर पुन्हा एकदा ९/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची योजना आखण्यास मदत करत असल्याची चेतावणी अफगाणिस्तानच्या माजी गुप्तहेर प्रमुखांनी दिली.

 

हक्कानी नेटवर्कचा अजूनही अल-कायदाला भक्कम पाठिंबा असल्याचा खुलासा अफगाणिस्तानच्या नॅशनल डिरेक्टरेट ऑफ सिक्युरिटीचे (एनडीएस) माजी डायरेक्टर रहमतुल्ला नबिल यांनी रविवारी ट्विटच्या शृंखलेद्वारे केला आहे. अल कायदा ही इस्लामी दहशतवादी संघटना असून तिच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

 

" जर या प्रदेशातील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद असाच पोसला गेला तर येत्या काळात आपल्याला दुसरा ९/११ बघायला मिळेल. अल कायदाचा अल-जवाहिरी, अबू मुहम्मद अल मसरी आणि सैफ उल अदेल पश्चिमेवर हल्ला करण्याची योजना आखत आहेत. आणि त्यांना पाकिस्तानस्थित हक्कानी नेटवर्कचे खूप मोठे पाठबळ लाभत आहे," असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

 

मौलिवी जलालुद्दीनचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी याचे हक्कानी नेटवर्क हे तालिबानचीच एक शाखा आहे. अमेरिकेच्या नाटो फोर्सेस आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या अफगाण सरकारविरुद्ध हा इस्लामिस्ट दहशतवादी ग्रुप कारवाया करत असतो. १९८० मध्ये याच हक्कानी नेटवर्कला सीआयएने रोनाल्ड रीगन प्रशासनाने अफगाणिस्तानात सोव्हिएत विरूद्ध लढा देण्यासाठी पाठिंबा दर्शविला होता.

 
9/11_1  H x W:

 

जलालाउद्दीन हक्कानी यांने त्याच्या नेटवर्कसाठी अरब नागरिक ओसामा बिन लादेनला नियुक्त केले ज्याने नंतर इस्लामचे सगळीकडे शासन असावे या हेतूने अल कायदाची स्थापना केली. अल कायदा आणि हक्कानी नेटवर्क यांचे अश्याप्रकारे जवळचे संबंध आहेत. इस्लामी शासन स्थापन करणे हाच दोघांचाही मुख्य हेतू आहे.

 

याह्या हक्कानी हे बाकीचे दहशतवादी गट आणि हक्कानी नेटवर्क यांच्यातील दुवा असल्याचे नबील यांनी सांगितले.

 

" हक्कानी नेटवर्कला ईटीआयपी (पूर्व तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट), एक्यूआयएस (भारतीय उपखंडातील अल कायदा), एक्यूसी (अल कायदा सेंट्रल) यांचा खूप मोठ्याप्रमाणात पाठिंबा आहे. ते एकमेकांचे कट्टर समर्थक आहेत. तालिबान चळवळीला या कट्टरपंथीयांचं सहकार्य लाभल्यामुळे आणि हक्कानी नेटवर्कचे यावर नियंत्रण असल्याने तालिबान चळवळीला विरोध करणाऱ्यांना यांची दहशत आहे." असे अफगाण सुरक्षा तज्ञाने सांगितले.

 

अब्दुल रौफ झाकीर हाच करी झाकीर असल्याचे नबील यांनी उघड केले. हक्कानी नेटवर्कच्या सुसाईड ऑपरेशनचा हा प्रमुख होता. याच्यावर ५ मिलियन डॉलर्सचे इनाम होते. कुरम एजन्सीच्या घुझगुरी भागात हमजा बिन लादेन (ओसामाचा मुलगा) याच्यासोबत हासुद्धा मारला गेला होता. सप्टेंबर २०१९ ला हमजाला मारल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले पण त्याला मारलेली जागा मात्र उघड केली नव्हती. त्याच ड्रोन हल्ल्यात हमजा सोबत करी झाकीरही मारला गेल्याची बातमी ट्विट द्वारे त्यांनी दिली.

 

कुनार मधील अबोटाबाद येथे फारुख अल कहतानीला आश्रय दिलेल्या जागी जप्त केलेल्या वस्तूंपासून सर्व गोष्टींची खबर गुप्तचर यंत्रणेला आहे. ज्या ठिकाणी हक्कानी नेटवर्क सक्रिय आहे त्या ठिकाणी एक्यूआयएस आणि एक्यूसी सुद्धा सक्रिय आहेत याचे पुरावे गुप्तचर यंत्रणेकडे आहेत. असे ट्विट नबील यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टॅग करून केले आहे.

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk )

 

Source : Syndicate feed, swarajya

 

Pakistan Based Haqqani Network Backing Plan For Another 9/11-Type Attack: Ex Afghan Spy Chief