पॅलेस्टाईनने अमेरिका आणि इस्राएलसोबतचे सर्व करार मोडीत काढले. अघटिताचे सावट.
         Date: 24-May-2020

पॅलेस्टाईनने अमेरिका आणि इस्राएलसोबतचे सर्व करार मोडीत काढले. अघटिताचे सावट.

 

वेस्ट बँकेचे इस्राएलमध्ये सामिलीकरण करण्याला अमेरिकेने पाठिंबा दर्शविल्याच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनने अमेरिका आणि इस्राएल सोबतचे सर्व करार रद्द करून टाकले आहेत. यामुळे शांती वार्तेचे सगळे मार्ग खुंटले असल्याचे पॅलेस्टाईनचे म्हणणे आहे.

 

पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि स्टेट ऑफ पॅलेस्टाईन हे अमेरिका आणि इस्राएल सरकारशी केलेल्या सर्व करार आणि अटींतून आज मुक्त झाले आहेत. सुरक्षेविषयक करारातूनही ते मुक्त झाले आहेत. " आपत्कालीन बोलावलेल्या बैठकीत अब्बास यांचे हे उद्गार वफा या पॅलेस्टाईन वृत्तपत्राने छापले आहेत.

 

रामल्ला येथे पॅलेस्टाईनच्या सर्वोच्च नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष अब्बास म्हणाले की, वेस्ट बँकेच्या सामिलीकरणामुळे टू स्टेट सोल्युशन ला धक्का पोचला आहे. पीएलओने २०१८ मध्ये अमेरिका आणि इस्राएलशी संबंध संपुष्टात आणले होते परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी अब्बास यांच्यावर होती.

 

पॅलेस्टाईन सुरक्षेच्या दृष्टीने या घोषणेचा नक्की काय अर्थ आहे हे अद्याप सुस्पष्ट झालेले नाही.

 

अब्बास यांनी सांगितले की पॅलेस्टाईनचा जो भूभाग इस्राएलच्या ताब्यात आहे त्याची सुरक्षा आणि जबाबदारी हे इस्राएलचे कर्तव्य आहे. अमेरिका हा इस्राएल सरकारचा प्राथमिक भागीदार असल्याने पॅलेस्टाईन लोकांच्या अत्याचारासाठी तो सुद्धा तितकाच जबाबदार असेल. अमेरिकेने पॅलेस्टाईन शांतता कराराची घोषणा केल्यानंतर पॅलेस्टाईनने ताबडतोब त्याला नकार दिला होता.

 
two-state solution_1 

 

इस्रायली सामिलीकरण योजना जवळ आल्यामुळे या भागात तणाव वाढत आहे. माजी प्रतिस्पर्धी बेन्नी गॅन्ट्झ यांच्याशी झालेल्या सामायिक कराराअंतर्गत बेन्यानिन नेथन्याहू यांनी आज (२४ मे) रोजी शपथ घेतली. वृत्तानुसार, सरकार जुलै २०२० पासून वेस्ट बँक आणि जॉर्डन व्हॅलीच्या सामिलीकरण योजनांवर चर्चा सुरू करू शकेल.

 

इस्राएलने जर या सामिलीकरणाला मान्यता देऊन पुढे जायचे ठरविले तर खूप मोठ्या संघर्षाला इस्राएलला तोंड द्यावे लागेल असे जॉर्डनचा राजा दुसरा अब्दुल्ला याने धमकावले होते. यासाठी अब्दुल्ला याने इस्राएल-जॉर्डन शांतता करार पणाला लावला.

 

वेस्ट बँकेच्या सामिलीकरणात अडथळा आणण्यासाठी ते रणनीती आखत असल्याच्या वृत्ताला युरोपियन युनियननेही दुजोरा दिला आहे. टू स्टेट सोल्युशनमध्ये युकेचे जे स्थान आहे ते तसंच राहील या गोष्टीची ही त्यांनी पुष्टी दिली. 

 

मिडल ईस्ट शांतता चर्चेच्या अंतर्गत वेस्ट बँक चे सामिलीकरण करण्याला डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा होता. या वादग्रस्त सामिलीकरणामुळे इस्राएल पश्चिम किनाऱ्यावरील एक तृतीयांश भाग आपल्या ताब्यात घेऊ शकते. यामध्ये पॅलेस्टाईनला वाईट परिस्थितून जावे लागेल. तो सगळीकडून इस्राएलने वेढलेला राहील.

 

जुलै येऊन ठेपला तरी अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिले आहेत. सामिलीकरणाचे पडसाद उमटणारच. पॅलेस्टाईन्स किंवा इराण यापैकी कोणीही या प्रदेशात अराजकता आणि अस्थिरता निर्माण करेल. इराण आणि इस्राएल युद्धाची ही नांदी असेल.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source : EurAsian times

 

Palestine Ends All Pacts with US, Israel; Experts Fear Big Turmoil In The Middle-East