तैवानला जबरदस्तीने हस्तगत करणे चीनला महागात पडेल.
         Date: 05-May-2020

तैवानला जबरदस्तीने हस्तगत करणे चीनला महागात पडेल.

 

तैवानला जबरदस्तीने परत घेण्याला प्राधान्य न देता चीनने आता राष्ट्राचा उद्धार आणि त्याचा कायापालट याला प्राधान्य दिले पाहिजे. कोरोनाव्हायरसच्या महामारीला तैवानला परत मिळवण्याची संधी म्हणून बीजिंगने अजिबात बघू नये असे चिनी लष्करी रणनीतीज्ञांनी म्हटले आहे.

 

हवाई दलाचे सेवानिवृत्त जनरल किओ लिआंग यांनी चीनमधील लोकांच्यात तैवानला परत मिळवण्यासाठीची राष्ट्रवादी भावना वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केलीय. वॉशिंग्टनच्या चीनवरील टिकेमुळेही काही लोक दुखावले गेले आहेत आणि त्यांच्यात राष्ट्रवादी भावना भडकत असल्याचे त्यांनी म्हटले.

 

" चीन सरकारने देशाचा उद्धार कारण्यालाच प्राधान्य द्यावं. तैवानच्या मागे लागू नये. देशाचा कायापालट तैवान परत घेऊन होणार आहे का? नक्कीच नाही. त्यामुळे तैवानला पहिले प्राधान्य देणे गरजेचे नाही. जर सरकारला तैवान जबरदस्तीने हस्तगत करायचे असेल तर त्यासाठी सगळी संसाधने आणि शक्ती त्या ठिकाणी एकत्रित करावी लागेल. तुम्ही तुमची सर्व अंडी एकाच टोपलीत ठेऊ नयेत. खूप महागात पडेल ते. " किओ म्हणाले.

 
china, us, taiwan_1 

 

" अनिर्बंध युद्ध : अमेरिकेला नष्ट करण्याचा चीनचा मास्टर प्लॅन " या पुस्तकाचे किओ हे सह-लेखक आहेत. त्यांनी चीनमध्ये वाढीस लागलेल्या राष्ट्रवादाबद्दल वेळीच सावध केले आहे. "चीन अमेरिकेसह आर्थिक युद्ध पुकारेल. तंत्रज्ञानात अग्रणी असलेल्या अमेरिकेला हरवण्यासाठी त्यांच्याशी समोरासमोर युद्ध न करता आर्थिक आणि धोरणात्मक गोष्टी आखून त्यांना पराभूत केले जावे." असा त्या पुस्तकाचा सारांश असल्याचे ट्रम्प यांचे माजी राजकीय सल्लागार स्टीव्ह बॅनॉन यांनी म्हटले आहे.

 

स्वतंत्रपणे राज्य करणाऱ्या बेटांना चीन आपल्याच देशाचा भूभाग मानतो. त्यामुळे या भूभागाने आपल्याकडे परत यावे असे त्याला वाटते. आणि तैवान परत घेण्यासाठीचा दबावही वाढत आहे. सद्य परिस्थितीत अमेरिका तैवानचा बचाव करण्यास असमर्थ आहे कारण कोविद-१९ च्या महामारीने इंडो-पॅसिफिकमधील त्यांचे चारही तळ ग्रासले आहेत.

 

" कोविद - १९ ने अमेरिकेचा कणाच मोडला आहे. त्यांची लष्करी ताकद कमी केली आहे. व्हायरसमुळे चीनच्या महत्त्वाकांक्षेला जरा खीळ बसली असली तरी ती तात्पुरती आहे.  कोविद-१९ मुळे अमेरिका पूर्ण रसातळाला जाईपर्यंत चीन या तात्पुरत्या आजाराशी दोन हात करू शकतो " असे किओनी विचॅट वर लिहिले आहे.

 

समजा पीएलएने तैवानला जबरदस्तीने घ्यायचा प्रयत्न केला तर वॉशिंग्टन या एवढ्या कारणासाठी युद्ध पुकारू शकत नाही. त्याऐवजी ते दक्षिण चीन समुद्रातील बीजिंगचे वर्चस्व तोडण्यासाठी तैवानला सागरी आणि हवाई मार्ग वापरण्यासाठी सामील होऊ शकतात. जर इतर पाश्चात्य देशांनी बीजिंगवर निर्बंध लादले तर चीनची अर्थव्यवस्था डळमळीत होईल. परंतु चीनने आता तैवान घेण्याचा विचार मनातून काढून टाकून आपली अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी धोरणात्मक पावले उचलावीत. असे किओ म्हणाले.

 

चीनची अर्थ व्यवस्था अमेरिकेतून आलेल्या डॉलर्सवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तैवान युद्ध चालू राहिले तर चीन मोठ्या आर्थिक संकटात सापडेल. इथलं भांडवल बाहेरच्या देशात जाईल अशी भीती किओनी व्यक्त केली.

 

तैवान प्रश्न हा चीन आणि अमेरिका यांच्यातील कळीचा मुद्दा आहे. म्हणजे हा प्रश्न चीनचा अंतर्गत मामला आहे असे आपण मानत असलो तरी जोपर्यंत चीन आणि अमेरिका यांच्यात शत्रुत्व आहे तोपर्यंत असेच चालत राहणार.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk )

 

Source : scmp.com

 

‘Too costly’: Chinese military strategist warns now is not the time to take back Taiwan by force