येमेन मध्ये सौदीच्या मदतीकरिता पाठविलेली लष्करी मदत थांबविण्यासंबंधी मतदान करण्याचा यूएस सिनेट ने घेतला निर्णय.
         Date: 14-Dec-2018

येमेन मध्ये सौदीच्या मदतीकरिता पाठविलेली लष्करी मदत थांबविण्यासंबंधी मतदान करण्याचा यूएस सिनेट ने घेतला निर्णय.

 

यूएस सिनेटने बुधवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सौदी अरेबिया याना एक नोटीस पाठविली आहे ज्यात त्यांनी अमेरिकेने सौदीला येमेन मधील युद्धासाठी मदत करावी अथवा करू नये यासंबंधी मतदान करण्याचा ठराव केला आहे.

 

इस्तंबूल मध्ये सौदी दूतावासात झालेल्या युएसच्या जमाल खाशोगी या वार्ताहराची हत्या आणि येमेन युद्धामध्ये बळी जाणाऱ्या निरपराध लोकांच्या हत्या या दोन गोष्टींमुळे यूएस काँग्रेस मध्ये प्रश्न उठत आहेत. हौथी बंडखोरांविरुद्ध लढण्यासाठी येमेन सरकारला मदत करीत असलेल्या सौदी सरकारला यूएस जे सैनिकी पाठबळ पुरवीत आहे त्याबद्दल युएसची नेमकी भूमिका काय आहे? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

 

 

 

गिना हस्पेल जे सीआयएचे अध्यक्ष आहेत त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावरील वार्ताहराच्या हत्येमध्ये थेट हात असल्याच्या आरोपामुळे जो जनक्षोभ उसळला आहे तो त्याच्या कारकिर्दीला वेगळेच वळण लावू शकतो.
 

सौदी सोबत असलेला अमेरिकेचा व्यापारी आणि लष्करी संबंध या महत्त्वाच्या गोष्टींवर भर न देता ट्रम्पनी जमाल खाशोगी यांच्या हत्येत सौदी राजकुमाराच्या हात असल्याचा मुद्दा अधिक ताणून धरल्याबद्दल ट्रम्पना कचाट्यात पकडले जाऊ शकते.

 

अमेरिकेने सौदीला येमेन युद्धाकरिता दिलेली लष्करी मदत काढून घेण्यासंदर्भात सिनेट मध्ये ठराव मांडून बहुमताने निर्णय घेण्याचे ठरविले. ६० पैकी ३९ मते यूएस ने मदत काढून घ्यावी या ठरावाच्या बाजूने मिळविली. त्यापैकी ११ मते रिपब्लिकन्स ची होती.

 

अंतिम मतदान गुरुवारी होईल अशी आशा आहे. अप्पर हाऊस मध्ये जरी हा ठराव संमत होत असला तरी तो बहुसंख्येने रिपब्लिकन्स असलेल्या लोअर हाऊस च्या नियामक मंडळात सर्वप्रथम चालतो.

 

काँग्रेसने जरी हा ठराव बहुमताने संमत केला तरी अमेरिकन पाठबळावर वाढणाऱ्या सौदी राजसिंहासनावरील वारसदारासाठी ट्रम्प त्यांची विटो पॉवर वापरून तो बदलू शकतात.

 

ट्रम्पशी एकनिष्ठ असलेले रिपब्लिकन सिनेट चे बहुमताने पुढारी झालेले मिश मॅककॉनल यांनी त्यांच्या पक्षाला या ठरावाविरुद्ध मत देण्यास सांगितले होते. खाशोगी यांच्या हत्येला सौदी राजकुमाराला जबाबदार ठरविलेला ठराव यांनीच मागे घेतला होता.

 

तो ठराव बॉब कॉर्कर यांनी तयार केला होता. जे ट्रम्प ना अडचणीत आणू इच्छितात. त्यांना दोन्ही कडून आपली भाकरी भाजून घ्यायची आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: THE ECONOMIC TIMES

Us senate advances vote on ending military suport for saudis in yemen