भारतीय लष्कराच्या मदतीशिवाय स्वातंत्र्य मिळविणे शक्यच नव्हते :- बांगलादेशी शिष्टमंडळ.
         Date: 17-Dec-2018

भारतीय लष्कराच्या मदतीशिवाय स्वातंत्र्य मिळविणे शक्यच नव्हते :- बांगलादेशी शिष्टमंडळ.

 

'ज्या तातडीने आम्ही स्वतंत्र झालो ते भारतीय लष्कराच्या मदतीशिवाय शक्यच नसल्याचे' उद्गार भारत भेटीवर आलेल्या बांगलादेशी शिष्टमंडळाच्या सदस्यांनी शनिवारी काढले. 'आम्ही भारतीय लष्कराच्या प्रति कृतज्ञ' असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

बांगलादेशच्या खासदार काझी रोझी यांनी 'बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील भारतीय लष्कराचा वाटा आम्ही विसरलो नसल्याचे' सांगताना भारताचे आभार मानले. त्या म्हणाल्या,"पूर्व पाकिस्तानातील जनता स्वातंत्र्यासाठी झगडत असताना भारतातर्फे आम्हाला सर्वोतोपरी मदत करण्यात आली होती".

 

 
 

"तुमच्याशिवाय (भारतीय लष्कर) आम्हाला इतक्या लवकर स्वातंत्र्य मिळणे अशक्यच होते. व्हिएतनामच्या जनतेने ९ वर्षे लढा दिला आणि आम्ही केवळ ९ महिने. हे केवळ तुमच्या मुळेच शक्य झाले."

 

रोझी या बांगलादेशी शिष्टमंडळाच्या प्रमुख आहेत. १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेला विजय आणि बांगलादेशाला मिळालेले स्वातंत्र्य साजरे करण्यासाठी विजय दिवसाच्या निमित्ताने हे शिष्टमंडळ भारतात आले होते.

 

पूर्व पाकिस्तानातील बंगाली भाषिक बहुसंख्य समाजाने मार्च १९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराविरोधात लढा देण्यास सुरुवात केली.

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्ध, जे ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरु झाले होते; ते दोन आठवड्यात संपले. ईस्ट पाकिस्तान आर्मीचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्ट. जन. एएके नियाझी यांनी समर्पण करारावर सही केल्यानंतर या युद्धाची सांगता करण्यात आली होती.

 

"रोहिंग्या बांगलादेशात आले. आम्ही त्यांना आसरा दिला, अन्न दिले. परंतु आम्ही ज्यावेळी या स्वातंत्र्यासाठी झगडत होतो त्यावेळी तुम्ही आम्हाला त्याहूनही अधिक मोलाचे असे खूप काही दिले आहे. पाकिस्तानच्या आश्रयास गेलेल्या जवळपास २ कोटी रेफ्युजींपैकी कित्येक लाख बंगाली भाषिकांवर अतोनात अत्याचार झाले. लोकांचे खून झाले, स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले. या सर्व लोकांना भारताच्या आश्रयास आल्यानंतर मात्र अन्न, निवारा आणि संरक्षण पुरविण्यात आले. आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही कलकत्त्याच्या रस्त्यांवर फिरून मुक्तिजोधांसाठी (स्वातंत्र्य सैनिक) औषधे आणि सुके अन्न गोळा करीत असू. आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होतो तर कलकत्त्याच्या लोकांनी आम्हाला मोठ्या मनाने आणि मुक्त हस्ते मदत देऊ केली", अत्यंत भावनाविवश अश्या रोझी हे बोलत होत्या.

 

या शिष्टमंडळामध्ये बांगलादेशाच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या जोडीने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले काही मुक्तिजोध्दा' देखील सहभागी झाले होते.

 

भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल शंकर रॉयचौधरी यांनी १९७१ सालच्या युद्धातील आपल्या आठवणींना उजाळा देताना,'परस्परांमधील सुरक्षा प्रश्न आणि संरक्षित भविष्यासाठी' दोन्ही देशांनी एकमेकांचे खास मित्र बनून राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

 

तर ईस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्ट.जन.एम.एम.नरवणे यांनी १९७१ चे युद्ध चालू असताना ते एक युवक असल्याची आठवण काढली.

 

"माझे वडील एअर फोर्स मध्ये होते आणि दिल्ली येथील ऑपरेशन रूममध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. मी दरदिवशी ते घरी येऊन मला युद्धाच्या बातम्या सांगायची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असे. आज बांगलादेशाच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुखातून त्यांचे अनुभव ऐकताना अंगावर काटा येत आहे", लेफ्ट.जन.नरवणे म्हणाले.

 

मुक्तिजोधांकडून मिळालेले सहकार्य आणि त्यांच्या सहभागाशिवाय हा पराक्रम करणे हे भारतीय लष्कराससुद्धा अश्यक्यच असल्याचे उद्गार नरवणे यांनी या प्रसंगी बोलताना काढले.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: ET

Wouldn't have achieved freedom without India: B'desh delegation.