इराणचे तालिबानसोबत असलेले संबंध शांतता प्रस्तावानंतर उघड.
         Date: 12-Jan-2019

इराणचे तालिबानसोबत असलेले संबंध शांतता प्रस्तावानंतर उघड.

 

सर्वात मोठे ऐतिहासिक युद्ध थांबविण्याच्या हेतूने अमेरिकेने अफगाणिस्तानातून त्यांचे सैन्य मागे घेण्याचा विचार केला आहे. हे पाहता इराणने तालिबानसोबत असलेले आपले संबंध अधिक दृढ करण्याकरीता राजनैतिक मोहीम राबवायला सुरुवात केली आहे.

 

जेव्हा इराणची शिया जमात अफगाणिस्तानच्या कट्टरपंथी सुन्नी तालिबानच्या विरोधात एकत्रित झाल्यानंतर आणि दोन दशके चाललेल्या या भरपूर उलथापालथीनंतर आता या दोन जमाती आपापले समर्थक स्थानिक पातळीवर जमविण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात शांतता नांदण्यासाठी तेहरानने काबुलशी संपर्क साधला आहे.

 

 

 

परंतु इराणच्या राजनैतिक घडामोडींमुळे अनवधनाने त्यांचे तालिबानशी असलेले दृढ संबंध दिसून आले. अलीकडील काही वर्षात इराणचा मोठा शत्रू असलेल्या अल्ट्रा-रॅडिकल इस्लामिक स्टेट (आयएस) दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सहकार्य करण्याच्या बोलीवर तेहरानने तालिबानला लष्करी पाठिंबा दिल्यामुळे पश्चिमी आणि अफगाणिस्तान अधिकाऱ्यांनी इराण आणि तालिबान यांचे गुप्त संबंध असल्याचा आरोप केला आहे.
 

तेहरानला भेट देणारे कतारमधील एखाद्या चळवळीचे साधेसुधे कार्यकर्ते नसून तालिबानचे वरिष्ठ नेते होते. यावरूनच सर्व काही लक्षात येते असे अफगाणी पत्रकार सामी युसुफझाई म्हणाले.

 

तेहरानला भेट देणाऱ्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पाकिस्तानशी जवळीक असलेल्या कट्टरपंथीय लष्करी गटाचे नेते असलेले माजी तालिबानी मंत्री अमीर खान मुट्टाकी आणि हक्कानी नेटवर्कमधील वरिष्ठ असलेले कारी याह्या या दोन तालिबानी व्यक्तींचा समावेश होता.

 

"याचाच अर्थ या दोहोंमधील संबंध उच्च पातळीवर येऊन पोचले आहेत. पूर्वी, इराणने तालिबान विरोधी गटांवर आपले लक्ष्य केंद्रित केले होते परंतु १९९० च्या दशकात जेव्हा तालिबानचे वर्चस्व वाढले तेव्हा त्यांना विनाशास सामोरे जावे लागले."

 

युसूफझाई म्हणाले की, २००१ मध्ये तालिबानच्या अस्तानंतर तेहरानच्या विद्रोह्यांशी असलेल्या संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तालिबानचा प्रमुख मुल्ला अख्तर मुहम्मद मन्सूर याला २०१६ मध्ये अमेरिकन सैन्याने इराणमध्ये ठार मारल्यानंतर इराण आणि तालिबानच्या संबंधावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. मन्सूर आणि इराण यांच्यात असलेले संबंध प्रथम गंधारामध्ये छापून आले.

 

अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पश्चिम बाजूच्या इराणकडील सीमेवर आयएसला आपले जाळे पसरविण्यापासून अटकाव करण्यासाठी तालिबानने केलेल्या मदतीपासून तालिबान आणि इराणचे संबंध अधिक दृढ झाले. आयएस ला आपल्या सीमेमध्ये घुसू न देण्याचे श्रेय अफगाण सरकारऐवजी इराणने तालिबानलाच दिले. असे युसूफझाई यांनी सांगितले.

 

आता आपल्या या बदललेल्या गुप्त संबंधांविषयी समर्थन देण्यास मात्र दोन्ही बाजूंनी खूप उत्सुकता दाखविली जातेय.

 

"आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी तेहरान सोबत आता शांतता आणि मैत्री प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूने सकारात्मक पाऊले उचलली गेली पाहिजेत." असे इराण सरकारच्या इराण लेबर न्यूज एजन्सीजवळ बोलताना तालिबानचे प्रवक्ते झबिउल्ला मुजाहिद यांनी सांगितले. तालिबानला अफगाणिस्तानच्या शेजारी देशांबरोबरच इतरही देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावेत असे वाटते. आणि त्यातल्या त्यात इराण सोबत चांगले संबंध असणे अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.

 

इराणने अफगाण सरकारला आश्वासन दिले आहे की तालिबानशी शांतता चर्चेवेळी अफगाण सरकारचा विचार नक्कीच केला जाईल.

 

अमेरिका आणि तालिबान यांच्यात या महिन्यात सौदी अरेबिया मध्ये होणारी शांतता चर्चा तालिबानने रद्द करून ती कतार मध्ये घेण्याविषयी सुचविले असल्याचे राऊटर्स मध्ये छापून आले आहे. सौदी हा अफगाणिस्तानचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. सौदी अरेबिया आणि कतार मध्ये बेबनाव झाल्यामुळे कतार आणि तेहरानची जवळीक वाढली.

 

अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्कराच्या उपस्थितीविषयीचा प्रलंबित असलेला निर्णय या अश्या प्रादेशिक गुंतागुंतीला अधिक कठीण बनवितो.

 

युसूफझाईंच्या मते अफगाण शांतता वाटाघाटींमध्ये सुरुवातीच्या काळात असलेली इराणची भूमिका आता एक समस्या बनू पहातेय. १९९० ची पुनरावृत्ती होऊ नये हाच तेहरानचा मुख्य उद्देश आहे.

 

" मला खात्री आहे सौदी अरेबिया आणि यूएस ला अफगाण शांतता वार्तेमध्ये इराणचा सहभाग आवडत नाहीये. कदाचित काही प्रगती झाल्यानंतर या प्रक्रियेत सामील होण्यासाठी इराणला आमंत्रित केले जाऊ शकते." असेही मत त्यांनी व्यक्त केले.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: Gandhara

Peace Overtures Showcase Iran’s Deep Taliban Ties.