अमेरिकेने रेसिप्रोकल ऍक्सेस कायदा संमत केल्यावर लगेचच चीनने तिबेटमध्ये सैन्याची उभारणी केली आहे.
         Date: 15-Jan-2019

अमेरिकेने रेसिप्रोकल ऍक्सेस कायदा संमत केल्यावर लगेचच चीनने तिबेटमध्ये सैन्याची उभारणी केली आहे.

 

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वुहान येथे झालेल्या सौहार्दपूर्ण भेटीनंतर सुद्धा चीनने तिबेट मध्ये लष्कर तैनात करायला सुरुवात केली आहे. ही युद्धासाठीची तयारीच आहे.

 

सर्वप्रथम, २०१५ मध्ये जेव्हा सशस्त्र दलाची (पीएलए) पुनर्रचना करण्याचे निश्चित झाले तेव्हा चेंगदू मिलिटरी रिजन (जे भारताच्या जवळपास सर्व सीमेवर कायदेशीरपणे कार्यरत आहे) आणि लाँझो मिलिटरी रिजन (जे कायदेशीरपणे अक्साई चिन मध्ये कार्यरत आहे) या दोघांचे विलीनीकरण करून एकच वेस्टर्न थिएटर कमांड करण्यात आले.

 

 

 

सर्व रिजनल मिलिटरी कमांड्स सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या नॅशनल डिफेन्स मोबिलायझेशन या विभागाअंतर्गत एकत्रित केल्या गेल्या. यातून तिबेट मिलिटरी कमांड ला वगळण्यात आले कारण हे पीएलएच्या अधिकार क्षेत्राखाली येते. नागरिक सेना किंवा सक्तीच्या लष्करी सेवा यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तिबेट मिलिटरी कमांडला अशी वागणूक देणे म्हणजे जाणूनबुजून संघर्षांला खतपाणी घालणे आणि भारताच्या कुरापती काढणे आहे. तसेच या कमांड साठी जास्तीतजास्त संसाधने पुरवून भारताच्या सीमांचे उल्लंघन करण्यास उत्तेजन देण्याचे काम करणे हे चीनचे उद्दिष्ट दिसून येते.
 

दुसरे म्हणजे, गेल्या काही दिवसात तिबेटमध्ये अनेक प्रकारची लष्करी उपकरणे चीनने तैनात केली आहेत. भारताशी कोणत्याही प्रकारचा संघर्ष उद्भवल्यास चीनला तिथे कसलीही लष्करी कमतरता जाणवू नये यासाठी ही तयारी असल्याचे चीनच्या अधिकृत प्रेसने विशेषकरून प्रसिद्ध केले आहे. अधिकृत माहितीनुसार चीनने तिबेटमधील डोंगरांवर सिक्कीम आणि भारताच्या इतर भागाकडे तोंड करून सीमेपासून ५० किलोमीटरच्या अंतरावर लेसर आणि सॅटेलाईट गाईडेड पीएलसी-१८१ हॉवित्झर तैनात केली आहे. चिनी वृत्तपत्रानुसार याशिवाय इतरही अनेक शस्त्रास्त्रे सुद्धा तिबेट मध्ये तैनात करण्यात येणार आहेत. यामध्ये ३२ टन, १०५ मिलीमीटर गन टी -१५ अशी वजनाला हलकी आणि वाहून नेता येण्यासारखी शस्त्रास्त्र प्रणाली, नवीन एलडब्लू -30 लेसर डिफेन्स शस्त्र प्रणाली यांचा समावेश आहे.

 

चीनने अलीकडेच नवीन १० टन Z-20 मिडीयम लिफ्ट हेलिकॉप्टर तिबेट मध्ये तैनात केले. चेतावणी देण्यासाठी म्हणून सीमेवरील समोरच्याच भागात Y-9 प्रकारची वाहतूक आणि देखरेख ठेवणारी विमाने तसेच Y-20 वाहतूक विमाने (यांची ६६ टनची अधिकतम क्षमता आणि ३,७०० किलोमीटर ची रेंज ) २०१६ मध्ये तैनात केली गेली. तसेच स्टील्थ फायटर J-20 ची तिबेटच्या सर्वोच्च उंचीवरील ठिकाणी नेऊन चाचणी करून ती यशस्वी झाल्यानंतर ती सुद्धा तेथे तैनात करण्यात आली. सगळ्यात धोकादायक बातमी म्हणजे १० जानेवारी २०१९ ला चीनच्या दूरदर्शनने प्रसारित केलेली एक बातमी. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की DF-26 ही सहज हलविता येण्याजोगी मिसाईल प्रणाली प्रशिक्षणाच्या निमित्ताने वायव्येस तैनात करण्यात आली आहे. ही प्रणाली ४००० किलोमीटरच्या परिसरात मारा करू शकते. म्हणजेच युएसच्या तैवान मधील विमानावर अथवा दक्षिण चीन समुद्रात मारा करू शकते पण खरं सांगायचं तर याचा उद्देश भारताची लढाऊ विमाने नष्ट करणे हा आहे.

 

तिसरे म्हणजे, लष्करी उपकरणे वाहून नेण्यासाठी हवाईअड्डे, रस्ते आणि रेल्वेची गरज आहे. तिबेटमध्ये ५ हवाईअड्डे आहेत, ४ महामार्ग आणि एक रेल्वेमार्ग आहे. चीनने २०१८ मध्ये ९६,००० किलोमीटर चे रस्ते तिबेटमध्ये बांधले आहेत.

 

५.८ डॉलर खर्च करून बांधलेला ४०९ कोलोमीटर लांबीचा ल्हासा-नाईंगची महामार्ग (अरुणाचल प्रदेशच्या उत्तरेकडील) २०१७ मध्ये वापरात आणला गेला. ३.३ बिलियन डॉलर खर्चून सिचुआन पासून तिबेटला जोडणारा १३५ किओमीटरचा यान-कानगडींग एक्सप्रेस नंतर ल्हासाला जोडण्यात आला. आता चीनने ४३५ किमी चा ल्हासा-नाईंगची रेल्वेमार्ग बांधण्यास सुरुवात केली आहे. याचे बांधकाम २०२१ मध्ये पूर्ण होईल. तसेच २०१९ मध्ये १,७०० किमी चा सिचुआन ते तिबेट हा रेल्वे मार्ग बांधण्याचा विचार चीनने केला आहे. यासाठी ३६ बिलीयन डॉलर्सचा खर्च येणार असून त्याचे बांधकाम २०२६ पर्यंत पूर्ण होईल. बेईड नेव्हिगेशन सिस्टीम आता संपूर्ण तिबेट मध्ये उपलब्ध असून तिचा फायदा लष्कराबरोबरच तिबेटियन नागरिकांनाही होत आहे.

 

त्याशिवाय २०१० मध्ये लडाख जवळ नगरी स्पेस ऑबझर्व्हेटरी सुद्धा बांधण्यात आली आहे. येथे सध्या आठ टेलिस्कोप असून अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात. २०१८ मध्ये या स्पेस ऑबझर्व्हेटरीला जवळपास ३० मिलियन पर्यटकांनी भेट दिली त्यामुळे ७ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त रेव्हेन्यू सरकारला मिळाला.

 

चौथे म्हणजे, अचानक तिबेट मिलिटरी कमांडने आपल्या प्रशिक्षणात वाढ करून येथे लष्करी कवायती मोठ्या जोमाने सुरु केल्या आहेत. स्वतः अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीएलए ला या सैन्याला प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. चेंगदू मधील वेस्टर्न थिएटर कमांड वर्षाला साधारण १५ लहान, माध्यम आणि मोठ्या प्रमाणात लष्करी कवायती करीत असते. परंतु या वेळची जणू काही भारतालाच लक्ष्य करून केल्यासारखी होती.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: Indian Defence News

Is India ready? China steps up military build-up in Tibet as America passes law of Reciprocal Access.