कासिम सुलेमानीला नमविणारा माणूस-
         Date: 19-Jan-2019

कासिम सुलेमानीला नमविणारा माणूस-

 

"आम्ही कसल्याही श्रेयाची अपेक्षा न करता हजारोंना ठार केले आहे." न संपणाऱ्या आणि कोणत्याही अधिकृत युद्धाची घोषणा झालेली नसताना सुद्धा इराणच्या सीरिया आणि लेबनाॅन मधील प्रॉक्सिच्या विरुद्ध लष्करी कारवाई केल्याचे गदी एझेनकोट यांनी सांगितले. निवृत्त होण्याच्या एक आठवडा आधी इस्राएल डिफेन्स फोर्सेसचे सर्वोच्च अधिकारी असलेल्या गदी यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले असताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांना त्यांच्या या कामगिरीबद्दल थोडेसे श्रेय मिळण्याची अपेक्षा आहे.



 
 

"युध्दांमधील मोहीम" अशी संकल्पना एझेनकोट यांनी या युद्धाच्या वेळी वापरली. युक्तीने शत्रूचे सामर्थ्य कमी करायचे. युद्धाचा काळ होईल तितका वाढवायचा आणि शांत राहून शत्रूची परीक्षा बघायची आणि जिंकायची संधी प्राप्त करायची. अश्याप्रकारे फक्त मैदानावर लढूनच नाही तर डोक्याने लढून युद्ध जिंकण्याचे धोरण एझेनकोट यांनी वापरले.

 

गाझा मधील हमास सोबत लढण्यामध्ये आपली सर्व शक्ती पणाला लावण्यापेक्षा इस्राएलने जास्त करून इराण या आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. "जेव्हा तुम्ही अनेक वर्ष आपल्यापेक्षा दुबळ्या शत्रूशी लढत राहता तेव्हा तुम्ही स्वतःच दुबळे होता," असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळेच इराणशी समोरासमोर लढणारे आणि इराणच्या प्रॉक्सि लेबनॉन शी लढणारे ते पहिलेच इराणचे जनरल बनले. त्यांच्या धोरणात्मक खेळीमुळे इराणच्या बलाढ्य कुडस फोर्सचा धूर्त कमांडर कासीम सुलेमानी याला नमविले. हा तोच सुलेमानी ज्याने तेहरानचे सत्ता गाजविण्याचे स्वप्न धुळीस मिळविले.

 

"लेबनॉन च्या हिझबुल्लाला डोळ्यासमोर ठेऊन शस्त्रास्त्रांच्या शिपमेन्टवर मुख्यत्वे लक्ष पुरविण्याकडे इस्राएलचा कल होता. त्यामुळे आम्ही सुद्धा साधारण अडीच वर्ष इस्राएलच्या या पॉलिसीलाच महत्त्व दिले. परंतु अचानक आम्ही इराणच्या धोरणात झालेला लक्षणीय बदल पाहिला. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराक मधून त्यांनी जवळजवळ १,००,००० शिया फायटर्स ना सीरियामध्ये आणून वसविले. त्यांनी सीरियाच्या प्रत्येक विमानतळामध्ये गुप्तहेर आणि वायुसेना तळ तयार केले. सीरियन नागरिकांना बहकविण्यासाठी त्यांनी शिया लोकांना बोलाविले." एझेनकोट यांनी सांगितले.

 

२०१६ पर्यंत सुलेमानी ने सीरियामध्ये ८,००० हिझबुल्ला फायटर्स, ११,००० इतर देशातून मागवलेले शिया सैनिक आणि ३,००० स्वतःचे सैनिक तैनात केले होते. सात वर्षात इराणने यासाठी १६ बिलियन डॉलर्सचा निधी पुरविला. आपल्या सीमेवर इराणची उपस्थिती खपवून घेतली जाणार नसल्याची चेतावणी इस्राईलने फार पूर्वीच दिली होती परंतु असे असूनही सीरियामध्ये घुसखोरी चालूच राहिली.

 

जानेवारी २०१७ मध्ये एझेनकोट यांनी आपले धोरण बदलण्याची विनंती सरकारला केली. इस्रायली हल्ले ही बाब नित्याचीच झाली होती. २०१८ मध्ये वायुसेनेने २,००० बॉम्बस्फोट केले. मे मध्ये सुलेमानीने प्रत्युत्तरादाखल ३० च्या वर रॉकेट्स इस्राएलवर सोडली. परंतु त्यातील एकही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकले नाही. इस्राएलने सीरियामधील इराणच्या मिलिटरी आणि असद सरकारला लक्ष्य करण्याच्या हेतूने ८० वेळा हल्ले केले.

 

सुलेमानी सारख्या धूर्त माणसाचा इराक, येमेन,गाझा आणि लेबनॉन मध्ये हळूहळू प्रभाव कमी का झाला? त्याचे अंदाज चुकले म्हणून? असद सरकार पडण्यापासून वाचवताना आलेला फाजील आत्मविश्वास आणि इस्राएल आपल्याला थांबवू शकत नसल्याचा गर्व या दोन्ही कारणामुळे सुलेमानीचा प्रभाव कमी झाल्याचा अंदाज एझेनकोट यांनी वर्तविला.
 

"त्याची पहिली चूक म्हणजे त्याने अशी जागा निवडली जिथे तो तुलनेने कमकुवत होता." ते म्हणाले. तसेच ," आमच्याकडे या क्षेत्राची संपूर्ण माहिती आहे. आम्ही या प्रदेशाचा हवाई आराखडा मिळविला आहे. आमच्याकडे प्रतिकार करणारी टीम आहे. आम्ही ज्या लोकांचा गेली दोन वर्ष प्रतिकार करत होतो तिच्यात ताकद होती पण इतकी सुद्धा नाही की आम्हाला ते हरवू शकतील." असेही ते म्हणाले.

 

हिझबुल्ला आणि त्यांचा पुढारी हसन नसराला च्या बाबतीतही त्यांचे हेच मत आहे. या ग्रुपने इस्राएलचा उत्तरेकडील भाग जिंकून घेण्यासाठी ३ प्रकारच्या योजना आखल्या होत्या. मिसाईल तयार करण्याचे कारखाने लेबनॉन मध्ये उभारणे, इस्राएलवर आक्रमण करण्यासाठी खंदक खणणे आणि गोलान हाईट्स च्या सीरियाकडील भागात एक तुकडी तैनात करणे.

 

परंतु त्यांचा हा बेत यशस्वी झाला नाही. त्यांचे कारखाने उडविण्यात आले आणि खंदक नष्ट केले गेले. इस्राएलने सतत हिझबुल्ला वर गोलानकडून हल्ले केले. हिझबुल्लाकडे मध्य आणि दूरवर मारा करू शकतील अशी १०० च्या वर मिसाईल्स आहेत. ते केव्हाही इस्रायलशी युद्ध छेडू शकतात.

 

सुलेमानीने इस्राएल बॉर्डरवरून आपले सैन्य मागे घेतले आहे. युएसने घातलेल्या निर्बंधांमुळे इराण आता ह्या अश्या कारवायांना पैसे पुरविण्यास असमर्थ आहे. आमच्या निर्बंधामुळे इराण आपले लक्ष कदाचित दुसरीकडे वळवेल.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

This article is based on opinion columnist Bret Stephens article in The New York Times.

The Man Who Humbled Qassim Suleimani.