चीन-म्यानमार सीमा व्यापाराला लागली उतरती कळा.
         Date: 21-Jan-2019

चीन-म्यानमार सीमा व्यापाराला लागली उतरती कळा.

 

ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमार वृत्तपत्रानुसार २०१८ च्या उत्तरार्धात चीन आणि म्यानमारमधील व्यापार ६२ मिलियन डॉलरनी घसरला.

 

म्यानमारमधील काही शेती उत्पादनांवर चीनने लादलेले निलंबन आणि म्यानमारच्या उत्तरेकडील शान राज्यातील म्युसे येथून केल्या जाणाऱ्या सीमेवरील व्यापारावरील घातलेली बंदी यासारख्या काही कडक निर्बंधामुळे या दोघांमधील व्यापार कमी झाला असल्याचा अंदाज या वृत्तपत्रांनी वर्तविला.

 

चीन मध्ये आलेल्या आर्थिक मंदीचा या व्यापाराला फटका बसला की अजून काही कारण आहे हे स्पष्ट झालेले नाही. परंतु एक मात्र नक्की की चीन वेगवेगळ्या आर्थिक क्षेत्रांमध्ये नवनवीन निर्बंध लादत आहे. किंवा असे पण असू शकते की म्यानमारला नवीन व्यावसायिक सवलतींमध्ये अडकविण्याचे चीनचे धोरण आहे. कदाचित चीनच्या पाठिंब्यावर बांधण्यात येणार असलेले ३.६ बिलियनचे मायट्सॉन धरणाचे बंद पडलेले काम पुन्हा सुरु करावयाचे असेल.


 

 

बंगालच्या उपसमुद्रात उघडणाऱ्या आणि म्यानमारची प्रमुख शहरे मंडाले आणि यांगॉन आणि चीनचा युनान प्रांत यांना जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम यांच्यावर या सीमा व्यापाराचा दुष्परिणाम होऊ शकतो. हा रस्ता चीनच्या अविकसित भागांना जोडला जाणार असल्याने तिथून व्यापार करण्यासाठी चीनसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
 

ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमार च्या वृत्तानुसार सीमा व्यापार चालू असणारी काही ठिकाणे आणि तेथे झालेला २०१८च्या उत्तरार्धातील एकूण व्यापार -

उत्तर कोचीन मधील म्युसे मध्ये एकूण १ बिलियन डॉलर, लोइजे ४३.४ मिलियन डॉलर, कम्पाइती २८ मिलियन डॉलर, उत्तरेच्या बाजूकडील शान राज्यातील कोकान्ग क्षेत्रातील चिंश्ववा मध्ये १६३.६ मिलियन dollar आणि पूर्व शान राज्याच्या उत्तरेकडील केंगटुंग मधिल मोंग ला मध्ये १ मिलियन डॉलर.

 

म्यानमार चीनला प्रामुख्याने तांदूळ, साखर, डाळी, तीळ, मका, वाळलेली चहाची पाने, मत्स्य उत्पादने, खनिजे आणि प्राणीज पदार्थांची निर्यात करतो. तर चीन म्यानमारला शेतकी यंत्रे, विद्युत उपकरणे, लोह आणि स्टील संबंधित साहित्य, औद्योगिक कच्चा माल यांचा पुरवठा करीत असे.

 

१९९० पासून चीन आणि म्यानमार एकमेकांचे व्यापारी भागीदार आहेत. म्यानमार हा चीनचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे. त्यामुळे हा व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने १९९० च्या सुरुवातीला त्यांनी चायना-म्यानमार इकॉनॉमिक कॉरीडॉर (सीएमईसी) बांधण्यास सुरुवात केली. साऊथ ईस्ट आशिया साठी असणाऱ्या चीनच्या १ ट्रिलियन डॉलरच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पातील सीएमईसी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे.

 

-प्राची चितळे जोशी

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

This article is based on Bertil Lintner's article published in ASIA TIMES.

 

China-Myanmar border trade dips dramatically.