युद्धाचे बदलते स्वरूप.
         Date: 20-Feb-2019

युद्धाचे बदलते स्वरूप.

आज युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. परंपरावादी युद्धाची जागा आता मिश्र युद्धांनी घेतली आहे. जर भारत पाकिस्तानला पराभूत करू इच्छितो तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक्स टाळून त्याऐवजी पाकिस्तानचे तुकडे करण्याचे धोरण राबविणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी बलोच स्वातंत्र्य चळवळीला पूर्णपणे राजनैतिक पाठिंबा देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर बलोच लोकांचा आवाज बनावा आणि पाकिस्तानच्या कमजोरीवर घाला घालावा जश्याप्रकारे पाकिस्तान भारताच्या कमजोरीवर घालतो. पाकिस्तानचे तुकडे तुकडे करण्याची उत्तम संधी भारताकडे आता चालून आली आहे. कारण आपल्या सर्वाना माहित आहे की चीनला कोंडीत पकडण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला वेगळे पाडू इच्छित आहे.

 
 

 

अमेरिका जरी पाकिस्तानला दहशतवादाचा पुरस्कर्ता देश म्हणून घोषित करण्याचे ठरवीत असली तरी भारत-चीन यांच्यात झालेल्या वुहान कॉन्फरन्सने अमेरिकेच्या या बेतावर पाणी फिरविले. वाटाघाटींच्या नावाखाली चीन आणि पाकिस्तानने भारताला फसविले आणि त्यामुळे अमेरिका थोडीशी भारताच्या विरोधात गेली. २०१७ मध्ये झालेल्या वुहान कॉन्फरन्स मध्ये चीनने भारताला पाकिस्तानशी वाटाघाटी करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याविषयी सुचविले असावे असे वाटते.

 

 

परंतु बलोच नेत्यांना त्या वेळी हे माहित होते की पाकिस्तान भारताशी वाटाघाटी करीत असल्याचे नाटक करून त्यात वेळ घालवित आहे आणि जेणेकरून या वेळात तो भारत आणि अमेरिकेमध्ये अविश्वास निर्माण करेल. त्याचवेळी पाकिस्तान अमेरिकेला साऊथ एशिया आणि अती पूर्वेकडील देश यांच्यापासून लांब ठेवण्याचा देखील प्रयत्न करीत होता. कारण अमेरिकेचे हे पूर्वापार सहयोगी आहेत. याशिवाय, पाकिस्तान, चीन आणि टर्की हे या प्रदेशात अनेक वर्षांपासून एकमेकांचे भागीदार आहेत. म्हणूनच पाकिस्तान अथवा इतर कुठल्याही देशाला भारत आणि अमेरिकेमध्ये अविश्वास निर्माण करण्याची संधी भारत देत नाही.

 

 

पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आला आहे. जर त्यांच्यात पारंपरिक युद्ध सुरु झाले तर ते भारताच्या हिताचे होणार नाही आणि एकसंध पाकिस्तानला अफगाणिस्तान, भारत, बलुचिस्तान आणि अमेरिका यांच्याशी असे युद्ध करण्यात स्वारस्य नाही. यामुळे भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर युगोस्लावियासारखे वेगळे करण्याची आणि त्याला तुकड्या तुकड्यामध्ये विभाजित करण्याची गरज आहे.

 

 

सगळ्यांना माहित आहे की बलुचिस्तान हे पाकिस्तानचे वर्मस्थान आहे. भारताने पाकिस्तान नियंत्रित काश्मीरवर हजारो सर्जिकल स्ट्राईक्स जरी केले तरी त्यामुळे पाकिस्तानचे काहीही नुकसान होणार नाही. पाकिस्तान ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीरचा मुद्दा नेत आहे त्याचप्रमाणे जर भारताने बलुचिस्तानचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणला तरच भारताच्या हाताला काही लागेल. पाकिस्तानला नामोहरम करण्याचा हा एक मार्ग आहे. बलुचिस्तानच्या मुद्यावर प्रकाश टाकण्यात भारताने कां-कू करू नये. कारण आपल्या शेजारील देशातील लोकांवर होणारे देशांतर्गत अत्याचार आणि बलूच लोकांवर होणारे दहशतवादी हल्ले याविषयी आवाज उठविणे ही अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भारत यासारख्या शक्तिशाली देशांची नैतिक जबाबदारी आहे.

 

 

१९८७ ते २००० या काळात पाकिस्तानने भारतातील काश्मीरमध्ये दहशतवादी पाठविण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळे भारतात खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्या. बलोच लीडर हरब्याईर मारी याने १९९६मध्ये  बलोच स्वातंत्र्य चळवळ सुरु केली आणि त्याला २००० मध्ये व्यवस्थित आकार आला. तेव्हापासून २०१७ पर्यंत या चळवळीने जोर धरला. आणि पाकिस्तानने बलोच लोकांच्या विरोधात रक्तरंजित युद्ध पुकारले आणि त्यांचे लक्ष काश्मीर वरून थोडे कमी झाले. हे पाहिल्यावर काश्मिरी लीडर गिलानी याने पाकिस्तानचा हुकूमशहा मुशर्रफ याला लवकरात लवकर बलोच प्रश्न मार्गी लावायचा सल्ला दिला. अन्यथा काश्मीर कडे दुर्लक्ष होईल. जेव्हा मुशर्रफ बलुचिस्तान मध्ये नवाब अकबर खान बुगटी यांच्याशी लढण्यात व्यस्त होते तेव्हा गिलानी यांनी हा सल्ला दिला होता.

 

 

त्याचमुळे बलोच चळवळ ही भारतासाठी निरोधक ठरली. परंतु ही चळवळ वुहान कॉन्फरन्सच्या वेळी मात्र कमी आली नाही. चीनने भारताला पद्धतशीरपणे त्याच्या सहयोगी देशांपासून वेगळे करून पाकिस्तान आणि भारताची बैठक आयोजित केली आणि काश्मीर आणि खलिस्तान चळवळीच्या दिशेने पाकिस्तानच्या बाजूने विचार करावयास भाग पाडले.

 

 

अद्याप उशीर झालेला नाही. जर भारताला दहशतवाद आणि काश्मीर समस्येवर दीर्घकालीन उपाय हवे आहेत तर त्यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत विभाजनाकडे लक्ष  द्यायला हवे. ज्यायोगे पाकिस्तानमुळे पसरलेला दहशतवाद कायमचा नाहीसा होईल.

 

 

थोडक्यात, देशाच्या शांततेसाठी आणि स्थैर्यासाठी बलुच स्वातंत्र्यचळवळीला समर्थन आणि स्वतंत्र बलुचिस्तानची स्थापना आवश्यक आहे. तसेच भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या बलुचिस्तान पासून चीनला लांब ठेवण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे.

 

 

हॅरिस बलोच यांच्या लेखाचा भावानुवाद.

 

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: BLOCHWRNA NEWS

 

Changing natures of Wars.