आपल्यातील "भोळसट " लोकांना अखेर बालाकोटनेच नमविले.
         Date: 16-Mar-2019

आपल्यातील "भोळसट " लोकांना अखेर बालाकोटनेच नमविले.

 

गेल्या आठवड्यात लंडन मधील द डेली टेलिग्राफ या दैनिकातील एक लेख वाचनात आला. माझ्या शब्दसंग्रहात एक नवीन शब्दाची भर पडल्याने मी आनंदित झालो... "भोळसट" हाच तो शब्द.  अँड्र्यू डॉयले यांच्या म्हणण्यानुसार, " भोळसट हा शब्द सर्वसमावेशक आणि अतिशय सालस अश्या अर्थी वापरण्यात येईल. म्हणजेच इतर लोकांच्या भावनांविषयी अतिजागरुक असणारे लोक असा अर्थ जास्त योग्य ठरेल."

 

ही तथाकथित सामाजिक चळवळ घमेंडी, आत्मकेंद्रित आणि फक्त स्वतःचा उदो उदो करून घेणाऱ्या लोकांनी भरलेली आहे. अत्यंत निंदनीय गोष्ट सुद्धा त्यांच्या मनाला पाझर फोडू शकत नाही." असे म्हणणे वावगे ठरणार नाही की मी मला कळू लागल्यापासून बहुतेक या भोळसटपणाच्या विरुद्धच आहे. असे असले तरीही एखाद्याचा उगीचच केलेला अपमान आणि त्याच्याशी केलेले गैरवर्तन मला अनुचित वाटते.


 

तरीही, 'राजकीय दृष्ट्या बरोबर' (politically correct) असा सर्वसामान्य शब्द या लोकांसाठी वापरण्यापेक्षा "भोळसट" या एका लहानश्या शब्दात जास्त अर्थ सामावलेला आहे असे मला वाटते.

 

भारतातील तळागाळातील लोकांमध्ये आणि पश्चिमेकडे या "भोळसट" लोकांनी आपले हातपाय खूप मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रभावात अनेक लोकांना ओढले आहे. मी "भोळसट " हा शब्द सध्याच्या भारत-पाकिस्तान संदर्भात वापरतोय. जे भारताचा तिरंगा मोठ्या दिमाखात फडकावतायत आणि जे रेडक्लिफ लाइनच्या दोन्ही बाजूंनी समन्वय साधायचा प्रयत्न करतायत त्यांच्या विरुद्ध कारवाया करणाऱ्या लोकांसाठी हा "भोळसट" शब्द योग्य आहे.

 

भारतातील ह्या "भोळसट" पणाचे प्रस्थ किती फोफावलेय ते आपल्याला आपल्या एअरफोर्स ने बालाकोटवर केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या विवादांवरून दिसून आलेच. पूर्वी याच "भोळसट" लोकांच्या एका गटाने नॉट इन माय नेम नावाचे एक कॅम्पेन चालवले होते. जे गोमांस हत्येसंदर्भात होते. त्या कॅम्पेन मध्ये असे लोक सामील झाले होते जे जमावाने केलेल्या हिंसेच्या विरोधात होते किंवा जे अन्नस्वातंत्र्याच्या बाजूने होते. 

 

बालाकोटचे ध्रुवीकरण हे पूर्णपणे वेगळे आहे. प्रथम, सॉफ्ट लिबरल्स अतिशय हुशारीने लष्कराला कमकुवत करण्यासाठी एखादे कॅम्पेन सुरु करतात किंवा जिहादींचे आयुष्य हे सैनिकांच्या आयुष्याएवढेच मोलाचे आहे असे भासवतात. जिहादींचे बलिदानही सैनिकांपेक्षा कमी नाही असे मत प्रदर्शित करतात. आज या "भोळसट" असलेल्या लोकांनी असे उठवायला सुरुवात केली की आयएएफने जो बालाकोटवर बॉम्बहल्ला केला ते ठिकाण हे पाकिस्तानच्या अंतर्गत भागातील नसून नियंत्रण रेषेच्या आसपासच आहे.

 

जेव्हा त्यांचा हा दावा हास्यास्पद ठरला तेव्हा त्यांनी पुन्हा पाकिस्तानच्या नादाला लागून नवीन दावा केला की आयएएफने उजाड रानावर बॉम्ब हल्ला केला आणि काही झाडे आणि कावळ्यांशिवाय काहीच मेले नाही.

 

"भारतीयांना पुन्हा एकदा गंडविण्यासाठी केलेला नरेंद्र मोदी यांचा हा निष्फळ प्रयत्न" अश्या आशयाची ओरड या "भोळसट" ब्रिगेडने सोशल मीडियावर सुरु केली. उपग्रहांद्वारे घेतलेल्या काही फसव्या छायाचित्रांचा आणि राऊटर्सच्या काही वादग्रस्त अहवालांचा आधार घेऊन मोदी कसे ब्लफमास्टर आहेत असे लोकांच्या मनावर बिंबविण्यात आले. आणि आम्ही सांगतोय ते कसे खरे आहे हे ओरडून ओरडून सांगितले गेले.

 

शेवटी, बालाकोटमधील नुकसानाचे, पाकिस्तानात अचानक केले गेलेले गूढ दफन आणि जैश-ए-मोहम्मदच्या नेत्यांची भडकलेली वक्तव्ये या सर्व गोष्टी पुरावे म्हणून समोर आल्या तेव्हा या "भोळसट" लोकांची भाषा पुन्हा एकदा बदलली. आता, बालाकोटमधील हल्ला हा मोदींच्या अनावश्यक साहसाचा भाग आहे आणि युद्ध होऊ नये यासाठी केला गेला अशी नवीन ओरड त्यांनी सुरु केली.

 

तिरंगा फडकावत पाकिस्तान मुर्दाबाद अश्या घोषणा देणाऱ्या लोकांचा अपमान, लखनौ मध्ये काश्मिरी व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्या लोकांची उघडपणे केलेली निंदा तसेच इम्रान खान यांच्या शांततेच्या प्रस्तावाची केलेली प्रशंसा ही या "भोळसट" लोकांची खासियत आहे.

 

"भोळसट" लोकांच्या कॅम्पेनचे मर्मस्थान म्हणजे पुलवामा आणि बालाकोटमुळे मोदींना पुन्हा जिंकून येण्यासाठी येत्या निवडणुकीत मोठा फायदा मिळणार आहे. आणि हेच या लोकांना नकोय. त्यांना असे वाटतेय की मोदी पुन्हा निवडणूक जिंकले तर त्यांना अपेक्षित असणाऱ्या संस्कृतीचा अंत होईल.

 

जर मोदी खरोखरच मे महिन्यात पंतप्रधान म्हणून निवडून आले आणि लोककल्याणकडे वळले तर याच "भोळसट" लोकांकडून असेही ऐकू येईल की त्यांनी चांगले आणि वाईट यात फरक करू न शकणाऱ्या या मूर्ख देशातून पंतप्रधानपद विकत घेतले आहे.

 

राष्ट्रवादाचा टोकाचा द्वेष पसरवणारे असे हे "भोळसट" लोकांचे कॅम्पेन आहे. खासकरून भारतीय राष्ट्रवाद. वंदे मातरम आणि भारत माता की जय या दोन्हीचा होणार वारंवार वापर हिंदू विचारधारेमध्ये आढळतो. आणि हेच या "भोळसट" लोकांना खटकते. ह्या द्वेषातूनच त्यांना असे वाटते की पाकिस्तानी लोकच सभ्य आहेत जे उत्तम लेखक, चांगले क्रिकेटपटू आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबंध निर्माण होण्यासाठी भारताची स्थापना आणि मोदी या दोन्ही गोष्टी नष्ट होणे आवश्यक आहे. यासाठी भारतात सतत राजकीय अस्थिरता कशी राहील आणि त्याचा पाकिस्तानला कसा फायदा होईल हे बघण्याकडेच त्यांचा कल असतो.

 

आपण अलीकडच्या काही आठवड्यात बघतो आहोत की हे जे "भोळसट" लोक आहेत ते उच्चशिक्षित आहेत आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंधही चांगले आहेत. त्यांच्या या संबंधांचा उपयोग ते राष्ट्राची एकता नष्ट करण्याच्या कामी वापरतात. हे असे लोक आहेत जे दहशतवादाच्या मुद्द्यावर युद्ध छेडले जाऊ नये म्हणून त्याची तीव्रता कमी करण्यासाठी वादविवाद घडवून आणतात. त्यांचा दृष्टिकोन राष्ट्रीय नाही. ते जिहादला मात्र खतपाणी घालतील.

 

आता प्रश्न असा आहे की: या "भोळसट" लोकांच्या कॅम्पेन ला स्वतःचा स्वार्थ साधण्याचा आसुरी आनंद आपण घेऊ द्यायचा? आणि राजकीय प्रवाहाला प्रभावित करण्याची परवानगी द्यायची? त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्याचा हेतू सफल होऊ द्यायचा? नाही... त्यांच्यापेक्षा आपला आत्मविश्वास आणि ज्ञान प्रगल्भ असले पाहिजे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अश्या "भोळसट" लोकांना भेटाल तेव्हा फक्त "बालाकोट" एवढेच म्हणा.

 

- स्वपन दासगुप्ता यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद.

 

स्वपन दासगुप्ता हे एका वरिष्ठ पत्रकार आणि संसदेचे सदस्य आहेत. आणि ते राज्यसभेत राष्ट्रपतीपदाची उमेदवार देखील आहेत.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source:  freepressjournal

 

Only Balakot can counter the ‘Wokes’ among us.