फेसबुकचा पाक सेना आणि कॉंग्रेसला मोठा दणका- खोटी माहिती पसरवणारी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स आणि काँग्रेस संबंधित शेकडो फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट्स डीलीट
         Date: 01-Apr-2019
फेसबुकचा पाक सेना आणि कॉंग्रेसला मोठा दणका
खोटी माहिती पसरवणारी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स आणि काँग्रेस संबंधित शेकडो फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट्स डीलीट करण्यात आल्याने मोठे वादळ

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार (Facebook removes accounts linked to Pakistani military employees) सोशल मिडीया साईट फेसबुकने पाकिस्तानी सैन्याचा प्रसिद्धी विभाग इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स- ISPR ने खोट्या नावाने चालवलेली एकूण १०३ फेसबुक पेजेस, अकाउंट्स गृप्स काढुन टाकले आहेत. त्याशिवाय भारतातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसशी संबंधित खोटी माहिती पसरवणारी (engaged in “coordinated inauthentic behavior”) ६८७ पेजेस आणि अकाऊंट्स फेसबुकने डिलीट केली आहेत.
फेसबुकच्या सायबर सिक्युरिटी प्रमुख नथानील ग्लेषर यांनी सांगितले की इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स- ISPR ने चालवलेली २७ पेजेस, ५७ अकाऊंट आणि ७ ग्रुप्स- ज्यांची सर्व मिळुन फॉलोअर्सची संख्या २८ लाख आहे, हे सामुहिकरित्या खोटी माहिती (coordinated inauthentic behavior on Facebook and Instagram) फेसबुक आणि इंस्टाग्राम वरून पसरवताना पकडले गेले.
पाकिस्तानी सैन्याचा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स- ISPR हा विभाग लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि पाकिस्तानातील बलुच, पश्तुन, सिंधी, मुहाजिर समुदायांपैकी सरकारविरोधी असलेले गट इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स- ISPR वर हजारो खोट्या सोशल मिडीया अकाऊंट्स द्वारे धादांत खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप करत आले आहेत.
गेल्या वर्षी पाकिस्तान डिफेन्स फोरमने धादांत खोटी माहिती पोस्ट केल्याने त्यांची सोशल मिडीया खाती डिलीट होण्याची नामुष्की ओढवली होती. अशाप्रकारे असत्य माहिती पसरवुन पाकिस्तान विरोधी लोकांमध्ये मानसिक, वैचारिक गोंधळ उत्पन्न करण्याच्या काळ्या धंद्यांना इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचा प्रमुख डीजी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स फिफत जनरेशन वॉरफेयर असं गोड नाव देत आलेला आहे.
भारतीय राजकीय पक्ष काँग्रेस सध्या राफेल फायटर जेट आणि अन्य मुद्द्यांवरून सरकारवर टीका करताना अशा अनेक खोट्या सोशल मिडीया अकाऊंट्सचा मुक्तहस्ते वापर करत असल्याचं यापुर्वीही आढळलं आहे.
एका अंदाजानुसार डीजी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स ट्विटर आणि फेसबुकवर ३०,००० च्या आसपास खोटी अकाऊंट चालवतो. गेली काही वर्ष जगात "फेक न्युज" वरून मोठी राजकीय वादळे उठत असताना आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रंप अमेरिकन मिडीयावर फेक न्युज पसरवल्याचा थेट आरोप करत असताना फेसबुकची कारवाई एका मोठ्या वादळाला जन्म देईल यात शंकाच नाही. भारतात संसदीय निवडणुका ऐन भरात असताना यामुळे एका मोठ्या चर्चेला तोंड फुटेल यात शंकाच नाही.
 
--- विनय जोशी