दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकार बुरख्यावर बंदी घालण्याच्या विचारात.
         Date: 26-Apr-2019

दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकार बुरख्यावर बंदी घालण्याच्या विचारात.

 

श्रीलंकन चर्च आणि हॉटेल्सवर झालेल्या अतिशय भयंकर अश्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंका सरकार देशात बुरख्यावर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. बुरख्यावर बंदी आणण्याविषयी श्रीलंकन सरकार मुस्लिम समाजातील नेत्यांशी सल्लामसलत करण्याचा विचार करीत आहे असे विश्वसनीय सूत्रांकडून स्थानिक वृत्तपत्र डेली मिररला कळविण्यात आले. या विषयी राष्ट्रपती मैथ्रिपाला सिरीसेना यांच्याशी देखील चर्चा झाली आहे.

 

 

देमातागोडा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग असल्याचे आणि बुरख्यामुळे त्या तेथून सहीसलामत निसटल्याचे श्रीलंकन डिफेन्स सोर्सनी वृत्तपत्रांना सांगितल्याचा दावा वृत्तपत्रे करीत आहेत.

 

कोलाम्बोचे उपनगर असलेल्या देमातागोडा येथे रविवारच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक शस्त्रे सापडली आहेत.

 

दरम्यान, सत्ताधारी युनायटेड नॅशनल पार्टी ( यूएनपी) चे संसदीय सदस्य आशु मरसिंघे यांनी बुरख्यावर बंदी आणण्यासाठीच्या कारवाईकरिता या निर्णयाच्या बाजूने असलेल्या लोकांची जमवाजमव सुरु केली.

 

आशु मरसिंघे यांनी या बंदी विषयी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की," देशाच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी बुरखा वापरण्यावर बंदी घालण्यात यावी. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. इस्लाम मध्ये बुरखा वापरण्याची सक्ती नाही. खरंतर बुरखा हा मुस्लिमांचा पारंपारिक पोशाख नाही. सुदैवाने आमच्या या निर्णयाला मुस्लिम तत्त्ववेत्त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत."

 

यूएनपीचे खासदार मुजीबूर रहमान यांनी प्रस्तावित बंदीला पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले,"माझी पत्नी बुरखा वापरत नाही आणि मी माझ्या मुलींनाही ते वापरण्याची सक्ती करणार नाही. लवकरच मुस्लिम धार्मिक गट यावर एक निवेदन देतील."

 

या बॉम्बस्फोटात किमान ३५९ लोक मृत्युमुखी पडले. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: WION

 

Sri Lanka government considering burqa ban after terror attacks.