श्रीलंकेने निलंबित पोलीस प्रमुख आणि माजी संरक्षण सचिवांना केले अटक.
         Date: 04-Jul-2019

श्रीलंकेने निलंबित पोलीस प्रमुख आणि माजी संरक्षण सचिवांना केले अटक.

 

२६० लोकांचे प्राण घेणारा ईस्टर संडेचा बॉम्बहल्ला थोपवू शकण्यात अपयशी ठरल्यामुळे निलंबित केलेल्या पोलीस प्रमुख आणि माजी संरक्षण सचिवांना मंगळवारी गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली.

 

"मानवतेला काळिमा फासणारा गुन्हा" रोखण्याच्या कामी अपयशी ठरल्याप्रकरणी ऍटर्नी जनरल यांनी इन्स्पेक्टर जनरल पूजीत जयसुंदरा आणि माजी सुरक्षा सचिव हेमसिरी फर्नांडो यांच्यावर सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा दाखविल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

 

याआधी, सरकारी वकिलांनी नऊ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संशयित आरोपी ठरविले होते. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमध्ये या नऊ जणांची नक्की काय भूमिका आहे हे जाणून घेणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

 

या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी जयसुंदरा यांनी न दर्शविल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. फर्नांडो यांनी राजीनामा देणे स्वीकारले. 

 

पोलीस या दोघांना अटक करायला गेले तेव्हा हे दोघे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते असे रुवात गुणसेकेरा या पोलीस प्रवक्त्याने सांगितले.

 

या स्फोटाची चौकशी करणाऱ्या संसदेच्या मंडळासमोर जूनमध्ये जयसुंदारा आणि फर्नांडो यांनी साक्ष दिली. आणि हल्ल्याची पूर्वकल्पना असतानाही त्या संदर्भात कारवाई करण्यात दिरंगाई केल्याबद्दल त्यांची कानउघाडणी करण्यात आली. या हल्ल्याची माहिती गुप्तहेर खात्याने ९ एप्रिल पासून दिली होती. तसेच हल्ल्याच्या दिवशी सकाळी सुद्धा हल्ल्याची चेतावणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि संरक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली होती.

 

दरम्यान, नॅशनल ड्रग प्रिव्हेंशन आठवडा चालू असल्याने त्याला अधोरेखित करताना सिरीसेना म्हणाले की," आंतरराष्ट्रीय ड्रग डिलर्सचा हात इस्टर रविवारी झालेल्या हल्ल्यांच्या मागे आहे."

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

source: THE HINDU

 

Sri Lanka’s suspended police chief, ex-Defence Secretary arrested.