ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा खरंच मारला गेलाय?
         Date: 03-Aug-2019

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा खरंच मारला गेलाय?

 

एका अमेरिकन अधिकाऱ्याने या बातमीला दुजोरा देताना म्हटले आहे की हमजा याच्या मृत्यूला अमेरिका कारणीभूत ठरलीय. परंतु त्याने कुठलेही तपशील मात्र दिले नाहीत. अमेरिकन सरकारकडे तो मेल्याचे भक्कम पुरावे असल्याचेही त्याने सांगितले. अमेरिकेचा हमजाच्या मृत्यूत नक्कीच हात होता. परंतु नेमका कश्याप्रकारे हे सांगता येणार नाही असे अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

अमेरिकेने हमजाची माहिती देणाऱ्यास दहा लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते.

 

हमजा हा ३० वर्षाचा तरुण असून तो अल कायदाचा "उदयोन्मुख" पुढारी होता. नवीन पिढीचा तो रोल मॉडेल होता. अगदी लहान वयात तो अल कायदाच्या प्रचार व्हिडिओमध्ये दिसत असे. अलीकडे त्याने अल कायदाचा नेता म्हणून जाहीरपणे बोलायला सुरुवात केली होती. तो अल कायदाचा प्रमुख असल्यासारखी विधाने करू लागला होता. उदाहरणार्थ २०१६ मध्ये त्याने एका ऑडिओ द्वारे सीरियामधील जिहादी लोकांमध्ये ऐक्य असावे अशी इच्छा बोलून दाखविली होती.

 

दोन दिवसापूर्वी इस्लामाबाद वरून सुटलेल्या आणि रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयावरून उड्डाण करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या विमानातून हमजा याला सुरक्षित ठिकाणी हलविले जात असताना अपेक्षित जागेवर पोचण्याआधीच अपघात झाला. असे खात्रीशीरपणे परंतु पुरावा नसलेल्या सूत्रांकडून समजले. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानसोबत संगनमत करून हे विमान पाडल्याचे या सूत्रांनी म्हटले. दहशतवादाचा नवा चेहरा असलेल्या अल कायदाच्या प्रमुखाला म्हणजेच ओसामा बिन लादेनच्या मुलाला हे विमान घेऊन जात असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

 

ही अफवा जर खरी असेल तर अल कायदा पासून जगाला असलेला धोका संपविण्याच्या दृष्टीने अमेरिकेला मिळालेले हे सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे यश म्हणावे लागेल.

 

हमजाचा नक्की ठावठिकाणा काय आहे हे कोणालाच माहित नव्हते. तो कुठे लपला आहे याचे फक्त अंदाजच बांधले जात होते. ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर तो आणि अल कायदाचे इतर दहशतवादी इराणमध्ये पळून गेले होते. तिथे त्यांना पकडण्यात आले. इराण सोडण्याच्या अटीवर त्याच्या कुटुंबाला इराणने सोडून दिले. तिथून तो कुटुंबासह पाकिस्तानात गेला. नंतर तो सिरीयात गेल्याचे गुप्तचर संस्थांनी सांगितले. तो त्याचे राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत असे.

 

जर हमजा खरोखरच मेला असेल तर अल कायदाला तो फार मोठा धक्का आहे. त्यामुळे त्यांना आता वाली कोण असा प्रश्न उभा राहतोय. हमजा सगळ्या दहशतवादी संघटनांना एकत्र बांधून ठेवणारा महत्त्वाचा दुवा होता. जर पाकिस्तान एव्हिएशन क्रॅशमध्ये त्याचा मृत्यू झाला असेल तर पृथ्वीवरून दहशतवादाचे उच्चाटन करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल.

 

एफएटीएफ ग्रे लिस्टेड असलेला पाकिस्तान हमजाला का लपवत होता?  यापूर्वी पाकिस्तान लष्कर आणि इंटेलिजन्स एजन्सीजनी ९/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला सुद्धा अबोटाबादमधील लष्करी तळाजवळ का लपविला होता? जगातील सगळ्या दहशतवाद्यांचे आश्रयस्थान पाकिस्तान का असते?

 

पाकिस्तानने आर्थिक लाभाकडे पाहून, आपली दिवाळखोरी नाहीशी करण्यासाठी काही आर्थिक मदत स्वीकारून हमजाला अमेरिकेच्या स्वाधीन तर नाही ना केले? अपघात असल्याचे नाटक करून पाकिस्तानच्याच मदतीने अमेरिकेने हमजाला संपविले तर नाही ना? की पाकिस्तान अजूनही हमजा पाकिस्तानात असल्याचे नाकबूल करणार आहे?

 

जर हमजा पाकिस्तान लष्कराच्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याचे सिद्ध झाले तर पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हे सिद्ध होऊन एफएटीएफ त्याला ब्लॅक लिस्ट करेल का?

 

३० जुलै २०१९ रोजी रोजच्या सरावासाठी निघालेल्या पाकिस्तानच्या आर्मी एव्हिएशन एअरक्राफ्टचा मंगळवारी पहाटे पहाटे मोरा कालू, रब्बी प्लाझा येथे रावळपिंडीमध्ये अपघात झाला. या अपघातात विमानातील पाचही जण मृत्युमुखी पडले. यामध्ये २ पायलट आणि ३ क्रू मेंबर होते. अचानक नागरी वस्तीत उतरवलेल्या या विमानाचा उतरवताक्षणी स्फोट झाला आणि या स्फोटात पाच घरे जळून खाक झाली. १३ नागरिकांचा या घटनेत मृत्यू झाला आणि १८ जखमी झाले.

 

हे विमान अमेरिकन कंपनीने बनविले होते. याचा उपयोग गस्त घालणे आणि महत्त्वाच्या व्यक्तींची ने-आण करणे यासाठी केला जात असे. खाली येत असताना विमानाने अचानक उतरताच जोरदार वळण घेतले आणि लँड होतानाच त्याचा स्फोट झाला.

 

या विमान अपघाताविषयी पाकिस्तान सरकारने एक शब्दही काढला नाहीये. कारण विमानात कोण होता हे त्यांना सांगावे लागेल. या विमानांत नक्कीच कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती असली पाहिजे. मेजर जनरल असिफ गफूर ट्विटरवर एकही संधी सोडत नाही त्यांनी या बाबतीत तोंडात मिठाची गुळणी घेतलीय.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: news communique

 

Did Osama Bin Laden’s Son Hamza Die in Pakistan Army Aviation flight crash?