@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ ट्रम्पच्या कारवाईची मोसादशी तुलना.

ट्रम्पच्या कारवाईची मोसादशी तुलना.

ट्रम्पच्या कारवाईची मोसादशी तुलना.

 

जागतिक महासत्ता असलेली अमेरिका आणि जागतिक कीर्तीची गुप्तहेर संघटना मोसादयांचं ध्येय एकच असलं तरी त्याला हाताळण्याची पद्धत वेगळी आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे इराणचा कमांडर कासीम सुलेमानी आणि इराकी दहशतवादी कमांडर अबू मेहदी अल-मूहांडीस याची गुरुवारी केलेली हत्या होय.


सीआयएला गुप्तपणे हत्या करता येत नाहीत असे मुळीच नाही. त्यांना ते चांगलेच जमते. याउलट इस्राएल बहुतांशी गुप्तपणेच हत्या करण्यास प्राधान्य देतो. इस्राएलची गुप्तचर संघटना मोसाद दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड शोधून काढून किंवा त्यांच्या शास्त्रज्ञांना हत्यार बनवून कोणताही पुरावा मागे न ठेवता एखाद्याची हत्या करते. तर अमेरिका गरज पडेल तिथे अगदी गाजावाजा करत एखाद्याचा खातमा करते.

 

तसूभरही पुरावा मागे न ठेवता अतिशय सफाईदारपणे मोसादने मलेशिया ते ट्युनिशिया पर्यंत अनेक हत्या या काही वर्षात केल्या आहेत. या हत्यांच्या मागे केवळ आणि केवळ मोसादच असल्याचे निरीक्षकांचे मत असले तरी  त्यांच्याजवळ मोसाद विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. पण मोसादच्या सामर्थ्याविषयी यांच्या मनात कोणताही किंतु नाही.

 
Qaseem soleimani and trum

' एका वेळी एकच ' ही मोसादची काम करण्याची पद्धत आहे. एखादी कमी वर्दळ असलेली जागा हेरायची आणि ज्या व्यक्तीची हत्या करायची आहे त्या व्यक्तीला त्याजागी येण्यास भाग पाडायचे. जेणेकरून कमीतकमी अडथळा येऊन आपले काम साध्य करून घेता येईल. कधी कधी अश्या जागांवर या हत्या केल्या गेल्या आहेत की त्याची माहिती माध्यमांपर्यंत पोचण्यास खूप वेळ लागला आहे. अनपेक्षितरित्या एखाद्या दहशतवाद्याचे शव सापडल्यावर त्याच्या बाबतीत काय घडले? कधी घडले? कसे घडले? याचा अंदाजच पोलिसांना करता आलेला नाही. ही हत्या मोसादने केली याबद्दल त्यांना काहीच शंका नाही पण त्यांना तसा पुरावा मात्र कधीच मिळालेला नाही.

 

याउलट लपूनछपून हत्या करण्याचं ट्रम्प प्रशासनाचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. त्यांनी सुलेमानीला जाणूनबुजून सार्वजनिक ठिकाणी मारले. फक्त त्यालाच नाही तर त्याच्या सैन्याचीही त्यावेळी मोठ्या प्रमाणात कशी हानी होईल याची देखील दक्षता घेतली. म्हणजे थोडक्यात अगदी गाजावाजा करूनच सुलेमानीला मारायचे त्यांनी ठरविले होते.

 

मोसादने केलेल्या कामगिरीबाबत इस्रायली ऑफिसर्स मौन पाळून असतात. तर ट्रम्पनी अमेरिकेच्या ध्वजाचा ट्विट करून या हल्ल्याचे श्रेय घेतले आहे.

 

अमेरिकाच महासत्ता आहे हे अमेरिकेला इराणला या हल्ल्यातून दाखवून द्यायचे होते. आणि त्यासाठी हा हल्ला सार्वजनिक ठिकाणी घडवून आणण्यात आला. इस्लामिक रिपब्लीक आणि त्यांचे सहाय्यक यांनी कितीही धडपड केली तरी अमेरिकाच सर्वश्रेष्ठ आहे याची जाणीव इराण ला होण्यासाठी त्यांना मोठा धक्का पोचणे आवश्यक होते.

 

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वांसमक्ष सुलेमानीला उडविण्याच्या निर्णयामुळे अमेरिकेच्या इराकमधील उपस्थितीवर  मोठा परिणाम होऊ शकतो.   इराकमधील अमेरिकन तळांवर जर इराण ने हल्ला केला तर अमेरिका प्रत्युत्तरादाखल जोरदार हल्ला करेल. इराकमध्ये अमेरिकन सैन्य तैनात ठेवण्याबाबत ट्रम्प आग्रही आहेत.

 

इस्लामिक रिपब्लिक चा न्यूक्लियर प्रोग्रॅम थांबविण्यासाठी अमेरिका आपल्या शक्तीचा वापर करेल असे नाही. इराण इतर मार्गानी अमेरिकेविरुद्ध जाऊ शकतो. ट्रम्पना इराण कोणत्याही क्षणी भारी पडू शकतो. असे असले तरी गुरुवारी रात्री अमेरिकेने इराणला दिलेला संदेश उघडउघड आणि स्पष्ट होता- "माझी परीक्षा घेऊ नका."

 

 कदाचित निवडणुकीच्या धामधुमीत असल्यामुळे ट्रम्प सध्या मध्य-पूर्वेतील युद्धात उतरू इच्छित नाहीत. परंतु इराणने जर अमेरिकन सैन्यावर हल्ला केला तर इराणला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल असे मात्र त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

 

सुलेमानीसंबंधी अमेरिकेला मोसादने मदत केली असेलही. परंतु ते उघड केले गेले नाही. परंतु अश्या तऱ्हेने त्याला संपविण्याचा निर्णय मात्र ट्रम्प यांचाच होता हे ट्रम्प स्वतःच सांगत आहेत.

 

व्हिएतनामनंतरच्या युद्ध-विरोधी सिंड्रोममुळे अमेरिकेला कमकुवत समजण्याची चूक ओसामा बिन लादेन आणि सद्दाम हुसेन या दोघांनी यापूर्वी केलेली आहे. आणि त्याचे परिणाम त्यांना भोगायलाही लागले आहेत.

 

ट्रम्प यांचे प्राधान्य युद्ध टाळण्याचेच आहे यात काही शंका नाही. पण त्याच बरोबर इराणला  त्याची जागा दाखवून देण्यासाठी एक जोरदार फटका देणे तितकेच गरजेचे होते. जेणेकरून अमेरिका हीच जगातील महासत्ता आहे याची जाणीव इराण ठेवेल.

 

- प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source :  THE JERUSALEM POST

 

Comparing Mossad’s subtlety to Trump’s bang.