तब्लिघी जमात - जागतिक धोका
         Date: 05-Apr-2020

तब्लिघी जमात - जागतिक धोका

 
तब्लिघी जमातीच्या रूपाने भारताच्या उंबरठ्यावर एक नवीन संकट येऊन ठेपलंय. तब्लिघी जमातीची पाळेमुळे भारतात घट्ट रुजलेली आहेत.ही जमात अतिशय कट्टरतावादी आहे. त्यांना संपूर्ण जगाचे इस्लामीकरण करायचे आहे. मिशनऱ्यांप्रमाणेच यांनी सुद्धा इस्लाम जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी चळवळ उभी केलीय. अरबस्तानात मध्ययुगात ज्या प्रकारे इस्लामिक जीवनशैली होती तशीच जीवनशैली पुन्हा आचरणात आणण्यासाठी यांची ही चळवळ आहे. तब्लिघी हे अतिशय कट्टर अश्या देवबंदी संप्रदायाचे पुरस्कर्ते आहेत. ते फक्त इस्लाम धर्म मानतात. ही देवबंदी जमात बाह्य जगापासून स्वतःला अलिप्त ठेवते आणि त्यामुळेच या सांप्रदायाच्या लोकांमध्ये  "इतरांसाठी" अतिशय द्वेषाची भावना निर्माण होते.

 

९/११ चा हल्ला, लंडन बॉम्बस्फोट ते श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांची मालिका या सगळ्यामध्ये तब्लिघी जमातीचा सक्रिय सहभाग होता हे धडधडीत सत्य आहे. तब्लिघी जमात ही दहशतवादाचं प्रवेशद्वार आहे. आणि त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. "इस्लामचा संदेश देण्यासाठी युती" अश्याप्रकारे ते स्वतःची ओळख करून देतात. मुहम्मद पैगंबराशिवाय दुसरा कोणी प्रेषित नाही आणि अल्ला शिवाय दुसरा देव नाही असे ते मानतात. इतर धर्म अथवा त्यांचे देव यांचे अस्तित्वच ते नाकारतात. या अश्याच प्रकारच्या मनोवृत्तीने नाझींचा विनाश झाला.

 

हे लोक फक्त शरियाचा कायदा जाणतात. त्यांना इतर कोणाचे कायदे लागू होत नाहीत अगदी लोकशाहीचे किंवा राज्यघटनेचे सुद्धा. दिल्ली मधील मार्कझचे ताजे ताजे उदाहरण घ्या. दिल्ली सरकारने ३१ मार्च पर्यंत सामूहिक मेळाव्यावर बंदी घातलेली असतानाही त्यांचा आदेश धुडकावून देऊन येथे हजारोंच्या संख्येने लोक एकत्र आले. एवढेच नाही तर भारतातील त्यांच्या व्हिसाच्या मानदंडाचे उल्लंघनही त्यांनी केले.


jamaat_1  H x W

 

भारतामध्ये अल्पसंख्यांक आणि एकांगी धर्मनिरपेक्षता या दोन गोष्टीमुळे अश्या धोक्यांवर भारत कोणतेही ठोस पाऊल उचलायला असमर्थ ठरतो. जस जशी मार्कझ बद्दलची सत्यपरिस्थिती आपल्या समोर येतेय तस तशी आपल्यातल्या धर्मनिरपेक्षतेची डोळ्यावरची पट्टी उघडतेय. भारतीय जनता प्रत्येकाला एकाच तराजूत तोलते. त्यामुळे हे तब्लिघी अल्पसंख्यांकांच्या बुरख्याआडून धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा दुरुपयोग करून आपला घटनाविरोधी अजेंडा राबवत आहेत.

 

अत्ता देश चायना व्हायरसच्या संकटाला तोंड द्यायला एकजुटीने उभा राहिला असताना हे तब्लिघी मुद्दामहून या व्हायरसचे संक्रमण करीत आहेत. समाजात चायना व्हायरसचा फैलाव व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या घटनेने त्यांचा हा भयंकर हेतू उघडकीस आला. मार्कझ येथील मेळाव्याला हजेरी लावलेल्या काही जणांना चायना  व्हायरसची लागण झाली असल्याच्या संशयावरून क्वारंटाईन करण्यात आले होते. डॉक्टरांना, नर्सेसना आणि पर्यायाने समाजाला व्हायरसची लागण व्हावी या उद्देशाने या तब्लिघीनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांवरच थुंकी ठाकली. त्यांच्याशी गैरवर्तन केले. अखेरीस त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

 
गाझियाबाद मध्ये सुद्धा अश्याच प्रकारची घटना घडली. तेथे वैद्यकीय कर्मचार्‍यांवर दगडफेककरण्यात आली. त्यांना धमकावण्यात आले. महिला आरोग्य सेविकांशी अनैतिक वर्तन करण्यात आले. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. युपी सरकारने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती अश्या रुग्णांसाठी न करण्याचे ठरविले आहे. 

 

जागतिक धोका

 

तब्लिघी जमातीच्या या दुष्कृत्यांमुळे २१ दिवसाचा राष्ट्रीय लॉकडाउन सफल होणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. संपूर्ण भारतीयांची २१ दिवसाची तपस्या धुळीस मिळण्याची भीती निर्माण झालीय. तब्लिघी जमातीचा हा नीचपणा भारतापर्यंत मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे. तब्लिघी जमात चायना व्हायरस चे वाहक म्हणूनच काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

मलेशियामध्ये सुद्धा या तब्लिघी जमातीने श्री पेटलिंग मशिदीत अश्याच प्रकारचा मेळावा घेऊन जगावर संकट आणले आहे. येथील तब्लिघी 'इज्तिमा' मेळाव्याला जवळजवळ १६००० लोक उपस्थित होते. मलेशियन सरकारच्या निर्बंधांना जोरदार विरोध करून लोकांनी येथे उपस्थिती लावली होती. मलेशियातील दोन तृतीयांश लोकांना चायना व्हायरसची देणगी मिळालेली असू शकते असा रिपोर्ट सरकारने दिला. मलय एजन्सीने देशभर या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्यांचा शोध घेतला. या १६००० पैकी ४००० लोकांचा अद्याप शोध लागला नाहीये. संपूर्ण मलेशिया मोठ्या संकटाच्या छायेत आहे.

 

तब्लिघी मेळाव्याला जाऊन आलेल्यांपैकी जवळपास ६२० पेक्षा जास्त रुग्ण मलेशियात आहेत. ब्रुनेई मध्ये ७३, कंबोडिया मध्ये २२, सिंगापूर मध्ये ५ आणि थायलंड मध्ये १० लोक आढळले आहेत.  व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि इंडोनेशिया देखील संभाव्य प्रकरणांची तपासणी करीत आहेत कारण या देशातील ७०० लोकांनी तब्लिघी मेळाव्याला भेट दिली आहे. मलेशियातील हे प्रकरण उघडकीस आले तरी तब्लिघीनी इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर आणखी एक अनेक दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेथील जनतेने कडाडून विरोध केल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही.

 

गेल्या शतकापासून तब्लिघीनी संपूर्ण आशियात आणि पश्चिमेत आपली मुळे घट्ट रोवली आहेत. जगभरात त्यांचे अनेक अनुयायी आहेत. अनेक राजकीय नेते यांच्या प्रभावाखाली आहेत. मुस्लिम जगत याना पाठीशी घालत आहे. जगभरातून मलेशियातील मेळाव्याविषयी तीव्र नापसंती व्यक्त होत असताना मलेशियाच्या महिला आणि कौटुंबिक विकास उपमंत्री सीती झाइला मोहम्मद युसूफ यांनी तब्लिघीचे समर्थन केले. " कोरोना व्हायरसमुळे मारण्याची शक्यता केवळ १% आहे. माणसाला कोणत्याही क्षणी मृत्यू येण्याची शक्यता १००% आहे," असे ट्विट त्यांनी केले. त्यांच्या या ट्विट वरून तब्लिघीना वाचवण्यासाठीची धडपड दिसून येते. यावरून मलेशियाच्या राजकीय उच्च वर्तुळात तब्लिघींचा किती प्रभाव आहे हे दिसून येते.

 

तब्लिघीच्या या तर्क विसंगत कृतीमुळे समाज आज खूप मोठ्या संकटात सापडला आहे. हा एक प्रकारचा जिहादच आहे. अश्या प्रकारचे वर्तन केवळ वैर भावनेला जन्म देते. माणसाच्या धर्मनिरपेक्ष वृत्तीला हे कृत्य आव्हान देते. चायना व्हायरस विरोधात लढण्यासाठी संपूर्ण जगाने आपापसातले मतभेद विसरून एकजुटीने सामोरे जावे. एकदा चायना व्हायरसचे संकट नाहीसे झाले की अश्या वाईट प्रवृत्तींविरोधात लढण्यासाठी एकत्र यावे.

 

मूळ लेख - श्रुतिकार अभिजीत.

अनुवाद - प्राची चितळे जोशी. 

 

(ICRR Media Monitoring Desk)