काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे- तालिबान
         Date: 19-May-2020

काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे-  तालिबान

 

काश्मीरमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादात तालिबान सामील होणार असल्याच्या बातम्यांचे तालिबानने सोमवारी सोशलमिडीयाद्वारे खंडन केले. तालिबानने कोणत्याही देशाच्या अंतर्गत मामल्यात हस्तक्षेप करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.

 

" तालिबान काश्मीर मधील जिहादमध्ये सामील होणार असल्याचे जे वृत्त माध्यमांनी सांगितले ते पूर्णपणे चुकीचे आहे. कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करण्याचे इस्लामिक अमिरातचे धोरण अगदी स्पष्ट आहे. " अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमीरातचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी सांगितले. इस्लामिक अमिरात ही तालिबानचीच राजकीय शाखा आहे.

 

तालिबानचा प्रवक्ता झाबीउल्लाह मुजाहिद याने " काश्मीर प्रश्न मिटल्याशिवाय भारताशी मैत्री अशक्य आहे " असे विधान केल्यानंतर लगेचच इस्लामिक अमिरातने त्यांची भूमिका स्पष्ट केली. " काबूलमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर आम्ही काफिरांपासून काश्मीर देखील हिसकावून घेऊ " असे विधानही त्याने केले होते. हे निदर्शनास आल्या आल्या इस्लामिक अमिरातने स्पष्टपणे त्यांचा असा काही उद्देश नसल्याचे सांगितले.

 
suhail shaheen_1 &nb

 

तालिबानचा भारतासंबंधी नक्की कोणता दृष्टिकोन आहे हे तपासण्यासाठी भारताने चौकशी केली असता तालिबानने आपली बाजू मांडली. जम्मू आणि काश्मीर संबंधी तालिबानची भूमिका काय आहे हे त्यांनी लगेच स्पष्ट केले. सोशल मीडियावरील ती पोस्ट बनावट असल्याचे नवी दिल्लीने सांगितले. प्रत्यक्ष चौकशीत असे काही आढळून आले नसून तालिबानने ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

 

परंतु तालिबान हे अखंड राष्ट्र नसून तेथील लोकांचे विचार एकसंध नसल्याचे विश्लेषकांनी अधोरेखित केले आहे. उदाहरणार्थ, येथील काही लोकांचे पाकिस्तानशी घनिष्ट संबंध आहेत तर काहींना ते अजिबात रुचत नाहीत. ते वेगळ्या विचारसरणीचे आहेत.

 

अफगाण तालिबानचा निर्णय घेणारी शूरा ही पाकिस्तानस्थित क्वेटा मधील तलवारीच्या पात्यावर निर्णय घेणारी संस्था आहे तसेच हक्कानी नेटवर्क सुद्धा पाकिस्तानातील पेशावर येथील आहे. दोन्ही महत्त्वाचे गट पाकिस्तानशी लागेबांधे असलेले आहेत. पाकिस्तानच्या दबावाखाली येऊन त्यांनी त्यांचा हा निर्णय बदलला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही असे अफगाण-पाकिस्तानच्या एका विश्लेषकाने म्हटले आहे.

 

अफगाणिस्तानातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. जेव्हापासून अमेरिकेने काबुलमधून माघार घ्यायचे ठरवले तेव्हापासून अनेक घडामोडींना वेग आला आहे. जिथे अनेक दशके सोव्हिएत-अफगाण युद्धाच्या वेळी इस्लामाबादने अमेरिकेच्या बाजूने प्रॉक्सी म्हणून काम केले होते तिथे आता पाकिस्तान चीन सोबत आपले संबंध अधिक दृढ करून आहे. रशिया आणि इराणशी जवळीक साधून आहे. आणि या सगळ्यांचा मिळून ' अमेरिका ' हा मोठा शत्रू आहे.

 

अशरफ गनी आणि अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी हातमिळवणी केली असल्याची खात्री अमेरिकेने केली आहे. ताजिक - पश्तून नेता कदाचित तालिबानसोबत करार करेल. यापूर्वी कोणत्याही पक्षाने अशाप्रकारचा करार केला नाहीये.

 

अफगाणिस्तानातील भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गट तालिबानशासित काबूलचा वापर भारताला लक्ष्य करण्यासाठी करतील. या सर्व खेळामध्ये पाकिस्तान अंतर्भूत आहेच. अफगाणिस्तानला याला सामोरे जावे लागत आहे.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk )

 

Source : Hindustantimes

 

Kashmir is India’s internal matter, says Taliban; denies plan to target Delhi