पाकिस्तानी राजदूत दहशतवाद आणि इतर दुष्कृत्यांमध्ये सामील.
          Date: 21-May-2020

पाकिस्तानी राजदूत दहशतवाद आणि इतर दुष्कृत्यांमध्ये सामील.

 

पाकिस्तान सरकारच्या पुढे आता नवीन पेच निर्माण झालाय. इतर देशांमधील पाकिस्तानी राजदूत हे कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात, घोटाळ्यात नाहीतर त्यांना मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करताना सापडत आहेत.

 

नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, किव मधील पहिले सेक्रेटरी आणि पाकिस्तानचे परराष्ट्र अधिकारी  वकार अहमद याना युक्रेनियन कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयाने यावर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की त्यांच्यावर गैरवर्तणूक, अनुचित प्रकारे अधिकाऱ्यांशी बोलणे, पूर्वग्रहदूषित वागणे आणि कार्यालयीन कामकाजात शिस्त न बाळगणे असे आरोप आहेत.

 

योगायोगाची बाब अशी की संयुक्त राष्ट्रसंघातील सध्याचे पाकिस्तानचे प्रतिनिधी मुनीर अक्रम ( त्यांच्या भारत विरोधी वक्तव्यांमुळे प्रसिद्ध असलेले) यांच्यावरही अमेरिकेत घरगुती हिंसाचाराचा खटला चालविला गेला आहे. आणि त्या खटल्यातून आपले राजकीय वजन वापरून ते सुटले आहेत. डिसेंबर २००२ मध्ये अक्रम यांच्यावर त्यांच्यासोबत लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या त्यांच्या पार्टनरने घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली कोर्टात खेचले होते.

 

पाकिस्तानी राजदूत नियुक्त केलेल्या देशाचा वापर भारतात अराजकता माजविण्यासाठी करतात हे आता सर्वश्रुत आहे. खासकरुन बनावट भारतीय चलन नोटा (एफआयसीएन) आणि दहशतवाद्यांना पाठविण्यासाठी यजमान देशांचा वापर केला जातो. जानेवारी २०१५ मध्ये बांगलादेशातील सहाय्यक व्हिसा अधिकारी मोहम्मद मजर खान याला बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी बनावट चलनी नोटांच्या प्रकरणी अटक केली होती. बंदी घातलेल्या हिज्ब-उत-तहरीर या दहशतवादी संघटनेच्या तो संपर्कात असल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

 
pakistan flag_1 &nbs

 

पाकिस्तान उच्च आयोगातील दुसरी सचिव फारिन अर्शद हिला सुद्धा २०१५ मध्ये जमात-उल-मुजाहिद्दीन (जेएमबी) या दहशतवादी संघटनेच्या इदरीस शेख याच्याशी संबंध असल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात आले होते.

 

२००९ ते २०१६ श्रीलंकेत असणाऱ्या पाकिस्तान उच्च आयोगाचा समुपदेशक (व्हिसा) अमीर जुबैर सिद्दीकी याच्यावर अणुभट्ट्या, संरक्षण आस्थापन, चेन्नई मधील अमेरिकन दूतावास, बेंगळुरू मधील इस्रायली दूतावास आणि इतर भारतीय बंदरांवर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळमधील पाकिस्तान दूतावासातील पहिला सचिव मोहम्मद अर्शद चीमा याला एप्रिल २००१ मध्ये काठमांडू पोलिसांनी १ किलो आरडीएक्ससह अटक केली होती. डिसेंबर १९९९ च्या इंडियन एअरलाइन्सच्या आयसी 814 च्या विमान अपहरणात त्याचा हात असल्याचेही बोलले जाते.

 

मी २०१८ ते २०१९ दरम्यान अमेरिकेने पाकिस्तानी राजदूताने वॉशिंग्टन डी.सी. च्या आसपासच्या २५  मैलाच्या परिसरात पूर्वपरवानगीशिवाय पाय टाकण्यास मज्जाव केला होता.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source : economictimes

 

Pakistani diplomats across continents face charges of terror promotion and scandals