आयएनएस विक्रांत (निवृत्ती ३१-०१-१९९७)
         Date: 31-Jan-2021


Vikrant_1  H x
 
 
१९७१ चे युद्ध सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने गाझीला गाजावाजा न करता अगदी शांतपणे बंगालच्या उपसागराकडे पाठवले. गाझी पाणबुडी पाकिस्तानने अमेरिकेकडून भाड्याने घेतली होती. त्यावेळी या पाणबुडीला दक्षिण आशियातील कोणत्याही देशाकडे उत्तर नव्हते. ती ७५ दिवस पाण्याखाली राहू शकत होती आणि २० हजार किलोमीटरचा प्रवास करू शकत होती. इतकेच नाही तर गाझी शत्रूच्या नजरेतून शिताफीने सुटू शकत होती.
 
 
सध्याची पाकिस्तानची पंजाबी संस्कृती आणि आजच्या बांगलादेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंगाली संस्कृतीत खूप फरक होता त्यामुळे पूर्व पाकिस्तानमधील संघर्षाचा उगम झाला ज्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. मार्च १९७१ मध्ये, पूर्व पाकिस्तानमधील बंगाली लोकांमध्ये संताप आधिक तीव्र झाला होता. स्थानिक पोलिस आणि बंगाली सैन्य अधिकार्यांच्या पाठींब्यासह लोक पूर्व पाकिस्तानात रस्त्यावर उतरले. पाकिस्तानचे अध्यक्ष असलेले जनरल याह्या खान यांनी सैन्याला लष्करी कारवाईचे आदेश दिले जे पुढे ऑपरेशन सर्चलाइट म्हणून ओळखले गेले.
 
 
नागरी लोकसंख्येच्या क्रौर कारवाईमुळे १०० दशलक्षाहून अधिक निर्वासित भारताच्या पूर्वेकडील भागात आले आणि त्यामुळे भारतावर मोठे नागरी व आर्थिक संकट ओढवले. भारत आता या संघर्षात ओढला गेला होता.भारतावर दबाव होता, कारण त्याला निर्वासित हल्ल्याचा त्रास सहन करावा लागला होता.पाकिस्तान हवाई दलाने डिसेंबर १९७१ रोजी संध्याकाळी पूर्वेकडील भारतीय हवाई तळांवर -हवाई हल्ले सुरू केले. पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश या तीन राष्ट्रांच्या इतिहासातील हा निर्णायक क्षण होता.आता युद्धाची अधिकृत घोषणा झाल्याने भारतीय नौदलाला तेथील समुद्री प्रवेश तोडून पूर्व पाकिस्तानवर नौदलास सुरू करण्यास सांगितले. अंदमान निकोबार नौदल तळावर दुरुस्तीसाठी बसलेल्या आयएनएस विक्रांतला पाकिस्तानी नौदलाचा थेट धोका होता. गुप्तचर यंत्रणांनी सुचवले होते की पाकिस्तान आयएनएस विक्रांतवर व्यापारी जहाजांची नक्कल करून जवळ जाण्यासाठी योजना आखत आहे. तिचा बचाव करण्यासाठी आयएनएस ब्रह्मपुत्र आणि आयएनएस बियास या दोन फ्रिगेट्स तैनात करण्यात आल्या. ४ डिसेंबर १९७१ रोजी सुमारे १०० कि.मी. (किंवा नॉटिकल मैल) च्या अंतरावरुन आय.एन.एस. विक्रांतने आपल्या आठ हॉकर सी हॉक्स चालवून चटगांव व कॉक्स बाजार येथे बॉम्बस्फोट केले. बांगलादेशच्या मुक्तीच्या लढाईतला एक महत्त्वाचा टप्पा होता. भारतीय नौदलाने या दोन्ही बंदरातील बहुतांश सैन्य आणि नागरी मालमत्ता नष्ट केल्या आहेत.पूर्व पाकिस्तान आता पश्चिम पाकिस्तानपासून वेगळा झाला होता.
 
 
या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्याला हादरे बसले आणि त्यांनी आयएनएस विक्रांतचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांचा नाश करण्यासाठी त्यांची पाणबुडी पीएनएस गाझी पाठवून त्याचा प्रतिकार केला. आयएनएस विक्रांतला शोधून त्यांचा नाश करण्याचा हाच गाझीचा मुख्य हेतू होता. अरबी समुद्र पार करून गाझी बंगालच्या उपसागरात पोहोचले.अ‍ॅडमिरल एन. कृष्णन यांनी अशी काही खेळी खेळली की गाजी आपल्या ईप्सित कार्यात यशस्वी होण्यापूर्वी गाझीलाच समुद्रात समाधी घ्यावी लागली. पाणबुडीविरोधी क्षमता असलेले सुसज्ज आयएनएस राजपूत यालाच आयएनएस विक्रांत असल्याचे भासण्यात आले. आयएनएस राजपूत कडून भारी वायरलेस संदेश पाठविण्यात आले. त्यांच्याकडे एक मोठे युद्धनौका येणार असल्याचे मद्रास नेवल बेसला सांगण्यात आले. हे सर्व गाझींना दिशाभूल करण्यासाठी केले जात होते आणि तेच घडले. पाकिस्तानला असे वाटले की आयएनएस विक्रांत विशाखापट्टणममध्ये आहे आणि गाझी त्या दिशेने जाऊ लागले.भारतीय नौदल सतर्क झाले होते. गाझी निर्भयतेने विशाखापट्टणमला पोहोचले होते. विशाखापट्टणमच्या किनार्यावर, आयएनएस राजपूतचे कॅप्टन लेफ्टनंट कमांडर इंदर यांनी पाण्यात जोरदार हालचाल दिसली. पाणबुडीची हालचाल जाणवल्याने त त्यांनी ताबडतोब समुद्रात दोन डेफ्थ चार्जर लावण्याचा आदेश दिला गेला आणि आयएनएस विक्रांतला संपवायला आलेली गाझी कायमची समुद्रतळाशी समाधिस्थ झाली.
 
 
भारतीय नौदलाने आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून पाकिस्तानवर मानसिक दबाव निर्माण केला होता. ब्रिटनमधील विकर्स-आर्मस्ट्राँग शिपयार्ड येथे हे जहाज तयार करण्यात आले होते. सुरुवातीला त्याचे नाव एचएमएस हरक्यूलिस होते. हे एक ब्रिटीश मॅजेस्टिक वर्गाचे जहाज होते ज्याला १९४५ साली ब्रिटीश नेव्ही सेवेत समाविष्ट केले गेले. ते १९५७ मध्ये भारतीय नौदलाला विकले गेले. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार आयरिश हॅरलँड आणि वोल्फे शिपयार्डमध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले आणि ४ मार्च १९६१ रोजी ते भारतीय नौदलात दाखल झाले. भारताचा सागरी इतिहास समृद्ध आणि अभिमानाने भरलेला आहे. देशाच्या सागरी आणि सैनिकी इतिहासाचा अभिमान वाढविण्यात नौदलाच्या जहाजांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जेव्हा भारतीय नौदलाच्या जहाजांचे योगदान आठवते तेव्हा त्यापैकी एक आयएनएस (इंडियन नेव्हल शिप) विक्रांत नाव आठवल्याशिवाय रहात नाही. विक्रांतमुळे समुद्रावरील भारताचे वर्चस्व वाढले. जरी या जहाजातील एका बॉयलर पूर्णपणे कार्यरत नसला आणि त्यास मर्यादित वेगाने काम करावे लागले तरी १९७१ च्या भारत-पाक युद्धात या विमान वाहकामुळे पाकिस्तानचा घाम सुटला होता. त्याला १९७१ च्या युद्धातील कामगिरीसाठी दोन महावीर चक्र आणि बारा वीर चक्र मिळाले आहेत.
 
 
युद्धानंतर शरीर थकले होते. सगळे अवयव साथ देत नव्हते.आयएनएस विक्रांतची इंजिन, बॉयलर आणि इतर तांत्रिक उपकरणे दुरुस्त करून या जहाजाचे नूतनीकरण करण्यात आले. परंतु काही वर्षे सेवेत राहिल्यानंतरही त्याची कामगिरी समाधानकारक नव्हती. १९६१ ते १९९७ सेवा दिल्यानंतर ३१ जानेवारी १९९७ मध्ये त्याला कायमचा आराम मिळाला.
 
आयएनएस विक्रांत (आर 11) च्या सन्मानार्थ नौदलाने आपल्या पहिल्या गृह-निर्मित एअरक्राफ्ट कॅरियरला आयएनएस विक्रांत नाव दिले.
 
 
अक्षता बापट