अल कायदा या दहशतवादी गटाच्या तुर्कस्तानस्थित गटाने भारत- नेपाळ सीमेलगत आपले हातपाय पसरले आहेत.
         Date: 01-Mar-2021

अल कायदा या दहशतवादी गटाच्या तुर्कस्तानस्थित गटाने भारत- नेपाळ सीमेलगत आपले हातपाय पसरले आहेत.

 

- प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk)

 

तुर्की गुप्तचर संस्था एमआयटीचाच एक भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएचएचवर तुर्कस्तानचे इस्लामी अध्यक्ष रासप तैय्यप एर्दोगन यांच्या सरकारचा वरदहस्त आहे. या सरकारने आयएचएचला निधी उभारण्यासाठी विशेष अधिकार दिले आहेत.

 

दहशतवाद्यांना संरक्षण पुरविण्याच्या आरोपामुळे भारतीय गुप्तचर संस्थांची नजर असलेला आणि तुर्कस्तानातील अल कायदाशी संबंधित असलेला हा धर्मादाय गट इस्लामी संघ नेपाळ (आयएसएन) यांच्यासोबत काम करतो. नॉर्डिक मॉनिटरच्या निरीक्षणानुसार हा गट दहशतवाद्यांसाठी जिहादी नेटवर्क विणण्यासाठी हक्काचं ठिकाण बनवण्यासाठी कार्यरत आहे. 

 

ही संस्था मानवाधिकार आणि स्वातंत्र्य, मानवतावादी संस्था किंवा आयएचएच या नावाने नेपाळमध्ये विशेषतः भारतीय सीमेलगत अनेक प्रकल्प राबविते. देशातील अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायाला भक्कम आधार देण्याचे काम ही संस्था करते. जागतिक जिहादी नेटवर्क वाढविण्यासाठी या भागात लॉजिस्टिकल ऑपरेशन्स देखील ही संस्था करते.

 

हिमालयात आपले पाय रोवण्यासाठी या आयएचएचला आयएसएनने खूप मोठी मदत केली. आयएसएनला विविध प्रकल्प राबविण्यासाठी थेट तुर्कीकडून निधी मिळतो. या संस्थेचे नाव संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या लिस्टमध्ये गेले आहे. सीरियामधील सशस्त्र दहशतवादी गटांना मदत केल्याप्रकरणी यांची यूएनकडून चौकशी करण्यात आली आहे.

 

iHH_1  H x W: 0
 

आयएचएच नेपाळच्या महत्त्वाच्या सर्व शहरात आपले जाळे पसरतोय.  विशेषतः प्रांत क्रमांक 1, प्रांत क्रमांक 2 आणि लुंबिनी प्रांतात मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. नेपाळची राजधानी काठमांडूसह इतर अनेक शहरात मशिदी, मदरसे, अनाथालये आणि इस्लामिक केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय सीमेजवळील सुनसरी येथे तर आयएचएचने विशेष रस घेतलेला दिसतोय.

 

इस्लामिक संघ नेपाळ (आयएसएन) ही काठमांडू स्थित संस्था असून २०१८ मध्ये भारतीय दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या लिस्टमध्ये आली आहे.

 

आयएसएनचे तुर्कीच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांशी जोडलेले संबंध केवळ आयएचएच पर्यंत मर्यादित नाहीत. युनियन ऑफ इस्लामिक वर्ल्डच्या एनजीओ (इस्लाम दुन्यासी सिव्हिल टोपलम कुरुलुस्लारी बिर्लीगी, किंवा आयडीएसबी) नावाच्या संस्थेचेही सदस्य आहेत. ही संस्था तुर्कीच्या सादत या पॅरामिलिटरी गटाचा प्रमुख भाग आहे.

 

तुर्की सरकारची डेव्हलपमेंट एजन्सी " टीका " ही सुद्धा नेपाळच्या आयएसएनला दहशतवादी कृत्यांसाठी निधी पुरवते.

 

जगभरात पसरलेल्या दहशतवादी गटांना मदत पुरविण्यासाठी, त्यांना वैद्यकीय सहाय्य, निधी, लॉजिस्टिक्स आणि मानवी रसद  पुरविण्यासाठी आयएचएचची स्थापना केली गेली आहे अशी साक्ष विविध कट्टरपंथी गटांमध्ये लोकप्रिय असलेल्या तुर्की पोलीस गुप्तचर विभागाचा माजी प्रमुख अली फुआत इल्मझेर याने १६ ऑगस्ट २०१६ रोजी न्यायालयात दिली.

 

Source : youtube, google, hindustan times.