इराणचा विजय: भारत चाबहार पूर्ण करण्याच्या मार्गावर
         Date: 02-Apr-2021

chabahar_1  H x 
 
चाबहार बंदर आणि ते विकसित करण्याच्या कामात असणारा भारताचा सहभाग हा फक्त भारतासाठीच महत्वाचा नाही तर इराणसाठी त्यांच्या विजया समान आहे यावरून चाबहार इराणसाठी किती महत्वाचे आहे हे लक्षात येते.
 
 
भारत पुरवित असलेल्या उपकरणांची दुसरी बॅच चाबहारला पोहोचली आहे. इराणी आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बंदरात विकसित होणाऱ्या दोन टर्मिनलचे कामकाज जवळजवळ पूर्ण झाले आहे. इराण, अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई देशांशी व्यापार वाढवण्यासाठी भारत ओमानच्या आखाती किनारपट्टीसह इराणच्या आग्नेय किनार्‍यावरील चाबहारचा एक भाग विकसित करीत आहे.
 
 
 
दोन १४० टनांचे मोबाईल हार्बर क्रेन (एमएचसी) पुरावल्यानंतर जवळजवळ एका महिन्यापेक्षा जास्त काळानंतर प्रत्येकी १०० टन वजनाच्या दोन मोबाईल हार्बर क्रेन (एमएचसी)चे रविवारी बंदरात आगमन झाले. "चाबहार बंदर विकसित करण्याच्या आमच्या बांधिलकीच्या अनुषंगाने उपकरणांची दुसरी बॅच शाहीद बेहश्ती टर्मिनलपर्यंत पोहोचली आहे" असे भारताचे जहाजबांधणी व जलवाहतूक मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी ट्विट करून सांगितले.
 
 
 
पुढील काही आठवड्यांत आणखी दोन रेल्वे-आरोहित क्रेन वितरित केल्या जातील. इटालियन कंपनी इटलग्रू ने गेल्या वर्षी स्वाक्षरी केलेल्या २ दशलक्ष डॉलर कराराच्या अंतर्गत सहा क्रेन तयार केल्या गेल्या आहेत. सुरुवातीला भारताने हा करार शंघाई झेन्हुआ हेवी इंडस्ट्रीजशी केला होता, परंतु २०१७ मध्ये ऑर्डर केलेल्या उपकरणांचा पुरवठा करण्यास चिनी कंपनीने दिरंगाई केल्यामुळे देशाने मागील वर्षी तो करार रद्द केला.
 
 
 
मे २०१६ मध्ये इराण आणि अफगाणिस्तानासमवेत झालेल्या त्रिपक्षीय करारा अंतर्गत भारत चाबहार बंदरावर शाहीद बेहश्ती येथे दोन धक्क्यांचा विकास करीत आहे. एकूण भांडवली गुंतवणूक ८५ दशलक्ष डॉलर्स असून ते दहा वर्षांच्या भाडेपट्टीवर घेणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस टर्मिनलवर पूर्णपणे कामकाज सुरू करण्याची भारतीय अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. मांडविया म्हणाले की, उद्घाटनासाठी ते एप्रिल किंवा मे मध्ये इराणला भेट देतील.
 
 
 
डिसेंबर २०१७ मध्ये बंदरांचे मर्यादित प्रमाणात ( partially operative ) काम सुरू झाले. मागील वर्षी भारताने चाबहारचा वापर अफगाणिस्तानला ७५,००० टन गहू आणि टोळधाडीला रोखण्यासाठी इराणला २५ टन मॅलॅथिऑन कीटकनाशक पाठवण्यासाठी केला.
 
 
 
भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बंदरात फेब्रुवारी २०१९ पासून १२३ जहाजं आणि १.८ दशलक्ष टन इतक्या मोठ्या प्रमाणात मालवाहतूक झाली. हे अपेक्षेपेक्षा खूपच जास्त होते. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर किती प्रमाणात ऑपरेशन्स आणि फ्रेट सेव्हिंग होऊ शकते याची कल्पना यावरून करता येऊ शकते.
 
 
 
हे भारतासाठी इतके महत्त्वाचे का आहे?
प्रादेशिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि अफगाणिस्तान आणि इतर मध्य आशियाई राज्यांसह तसेच त्यापलीकडच्या क्षेत्राशी व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने चाबहार हे भारताचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
 
 
 
चाबहारच्या सभोवताली मुक्त व्यापार क्षेत्र (एफटीझेड) विकसित करण्यासाठी आणखी ५०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे तसेच दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानाच्या सीमेजवळील इराण मधील शहर झाेशानला जोडणारा ६०० किमी दूर १.६ अब्ज डॉलर्सचा रेल्वे मार्ग तयार करणार आहे.
 
 
 
इराणमार्गे मुंबई मॉस्कोला जोडणार्‍या चाबहारला इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्पोर्ट कॉरिडोर (आयएनएसटीसी) मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव नवी दिल्लीने नुकताच दिला आहे.
 
 
 
दहा मध्य आशियाई देशांमध्ये सामील होण्यापूर्वी
२००० मध्ये रशिया, इराण आणि भारत यांनी ७२०० कि.मी.चा मल्टिमोड रूट प्रस्तावित केला होता.ज्यामुळे वाहतुकीचा खर्च सुमारे ३०-६० टक्क्यांनी कमी होईल आणि ट्रान्झिटचा कालावधी ४० दिवसांवरून २० दिवसांपर्यंत कमी होईल. म्हणूनच, चाबहारने युरोपला मालवाहतुकीसाठी सूएझ कालव्यावरील अवलंबत्व कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे असे मानले जाते.
 
 
 
२०१७ च्या त्रिपक्षीय कराराअंतर्गत, भारताने चाबहार ते मध्य अफगाणिस्तानात हाजीगाक यांना जोड्याऱ्या मार्गासाठी किमान २१ अब्ज डॉलर्सची प्रोविजन केली आहे की जिथे लोह व स्टील खाण प्रकल्पात ११ अब्ज डॉलर गुंतवून करण्याची योजना आहे.
 
 
विकास योजना
चाबहारमध्ये सध्या शाहिद कलंतरी आणि शाहिद बेहश्ती या दोन बंदरांचा समावेश आहे. प्रत्येकाला पाच धक्के आहेत. पूर्वीचे रहदारी बंदर असल्याने शाहीद बेहश्ती हे प्रादेशिक हब बंदर म्हणून विकसित केले जात आहे. २०१७ पासून त्याची क्षमता वर्षाकाठी २ दशलक्ष टनांवरून ८ दशलक्ष टनापर्यंत वाढली आहे आणि सर्व विकासकामे पूर्ण झाल्यावर २० दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. मे २०१६ च्या करारांतर्गत, भारत शाहीद बेहश्ती येथे एका धक्क्याचे नूतनीकरण करीत असून बंदरावर कंटेनर हाताळणीची सुविधा उभारत आहे.
 
 
 
इराण सध्या आपल्या समुद्रामधील ८५% व्यापारासाठी पर्शियन खाडीवरील अब्बास बंदरावर अवलंबून आहे. अब्बास हे खोल पाण्याचे बंदर नाही आणि २५०००० टन मालवाहतूक जहाजे हाताळू शकत नाहीत, ज्यामुळे इराणला युएई बंदरांवर अवलंबून राहावे लागेल जेथे इराणला पाठविण्याकरिता मालवाहू छोट्या जहाजावर हस्तांतरित करण्यासाठी अशा जहाजांचा उपयोग केला जातो. महसूल तोटा आणि त्याच बरोबर राजकीय अडचणीच्या वेळी इराणसाठी हा एक चोकहोल्ड ठरू शकतो.
 
 
 
चाबहार हे इराणचे पहिले महासागरीय बंदर म्हणून काम करेल, जे मध्य आशियाला जोडणारे प्रवेशद्वार असेल.
आव्हाने आणि इराणचे ट्रम्प कार्ड
प्रचंड आव्हाने असूनही चाबहारचा विकास करण्याची इच्छा ही इराण आणि भारत या दोन्ही देशांना
त्यांच्या धोरणात्मक प्राथमिकतेच्या दृष्टीने किती महत्वाची आहे हे दर्शवते.
 
 
 
चीनने आपल्या ट्रिलियन-डॉलर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून संशयास्पद प्रादेशिक सीमारेषा पुन्हा उभारण्याचा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
याउलट इराणने यूरेशियाच्या ( युरोप आणि आशिया ) मध्यभागी असल्याने मध्यवर्ती वाहतुकीचे केंद्र बनण्याच्या दृष्टीकोनातून आपले पूर्ण समर्पण दर्शविले आहे.
 
 
 
तेहरान मेट्रोसह इराणमधील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्याने चीन हा इराणमधील सर्वात मोठा विदेशी गुंतवणूकदार आहे. तेहरान-मशहाद रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १.५ अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे.
 
 
२०१६ मध्ये दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार ६०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची तयारी दर्शविली आहे. इराण आणि चीन मध्ये वाढणारी निकटता भारतासाठी शुभ संकेत नक्कीच नाहीत. इराणच्या चाबहारच्या विकासात पाक आणि चीनचा सहभाग हे सुद्धा भारतापुढील आव्हान आहे. परदेशी बँकांकडून भारी उपकरणे घेण्यास भारताला तोंड द्यावे लागत असलेला आणखी एक अडथळा म्हणजे इराणमधील एखाद्या प्रकल्पासाठी LC उघडण्यास परदेशी बँकांचा नाखूषपणा.
 
 
 
बर्‍याच अडचणींवर मात करून भारत सरकारने हा प्रकल्प पूर्ण केल्यामुळे इराणचा हा एक महत्त्वपूर्ण भौगोलिक आर्थिक विजय मानला जातो, ज्यामुळे इतर गुंतवणूकदारांना आणि इस्लामिक रिपब्लिकला व्यापारामध्ये गुंतविण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते.