चीनला शह देण्यासाठी भारतीय नौदलाने आपल्या रणनीतीक बेटांवर तिसरा लष्करी विमानतळ सुरु केला.
         Date: 24-Jan-2019

चीनला शह देण्यासाठी भारतीय नौदलाने आपल्या रणनीतीक बेटांवर तिसरा लष्करी विमानतळ सुरु केला.

 

अंदमान निकोबार बेटांवर गेल्या गुरुवारी भारतीय नौदलाने तिसरा विमानतळ सुरु केला आहे. मलाक्का वरून हिंद महासागरात येणाऱ्या चीनच्या जहाजांवर आणि त्यांच्या पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हा एअर बेस सुरु केल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

श्रीलंका आणि पाकिस्तान या भारताच्या शेजारील देशांमध्ये चीन ज्या प्रमाणात व्यावसायिक बंदरे उभारण्याचे काम करीत आहे ते पाहता उद्या या बंदरांचा उपयोग भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी केला जाईल यात भारताला तिळमात्रही शंका वाटत नाही. या कामांच्या आड राहून चीनच्या वाढत्या नौदलाची या बंदरात असणारी उपस्थिती भारताच्या चिंतेत भर घालत आहे.

 

बंदरांकडील आपली बाजू भक्कम करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये भारताची सूत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर चीनच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मलाक्काच्या प्रवेशद्वारावरच अंदमान बेटांवर युद्धनौका आणि लढाऊ विमाने तसेच आपले सैन्य अगदी तैनात ठेवले आहे.

 

पोर्ट ब्लेअरच्या उत्तरेकडे साधारण ३०० किलोमीटरवर (१८० मैल) असलेल्या आयएनएस कोहासा या नवीन तळाचे अनावरण नौदलप्रमुख सुनील लांबा करतील असे एका अधिकाऱ्याने सांगितले.


 

 

या एअरबेसवर हेलिकॉप्टरसाठी सध्या १००० मीटरची धावपट्टी आणि डॉर्निअर सर्व्हिलियन्स एअर क्राफ्ट आहेत. परंतु या धावपट्टीची लांबी ३००० मीटर वाढविण्याची आमची योजना आहे. जेणेकरून यावर लष्करी विमाने आणि लांब पल्ल्याची टेहळणी विमाने दोन्ही धावू शकतील. अशी माहिती नौदलाचे प्रवक्ता कॅप्टन डी.के.शर्मा यांनी दिली.
 

वर्षाला जवळपास १,२०,००० जहाजे हिंदमहासागरातून प्रवास करतात आणि त्यातील ७०,००० व्हाया मलाक्का प्रवास करतात.

 

"सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चीनचा वाढता वावर. आपल्याला जर खरोखर चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवायचे आहे तर आपण अंदमान बेटावर संपूर्ण तयारीनिशी सुसज्ज राहणे गरजेचे आहे. सुसज्ज एअरबेस असतील तर तुम्ही दूरवर नजर ठेवू शकता. सुरक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त जहाजे कायमस्वरूपी या दोन्ही बेटांवर तैनात करावीत," असे मत माजी नौसेना अधिकारी अनिल जयसिंग यांनी व्यक्त केले.

 

२०१४ मध्ये चीनच्या पाणबुडीने श्रीलंकेच्या कोलंबो बंदरात प्रवेश केला. यासंबंधी मोदी सरकारने श्रीलंकेला जाब विचारला होता. भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारत आणि चीन मध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. नवी दिल्ली बीजिंगच्या या प्रांतातील उपस्थितीला जोरदार विरोध करीत आहे.

 

गेल्या वर्षीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भारत पुन्हा मालदिव शी आपले संबंध सुधारायचा प्रयत्न करीत आहे. या आठवड्यात, भारतीय संरक्षण अधिकारी मालदीवचे संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

This article is based on the article of The Economic Times.

India navy set to open third base in strategic islands to counter China.