अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा वुहान व्हायरसच्या उगमस्थानाबद्दलचा तपास सुरु.
         Date: 22-Apr-2020

अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा वुहान व्हायरसच्या उगमस्थानाबद्दलचा तपास सुरु.

 

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने वुहान लॅब आणि त्याचा व्हायरसच्या संक्रमणातील हात यावर तपासकार्य सुरु केले आहे.

 

अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेसंबंधी तपासकार्य सुरु केले आहे. अमेरिकेचे असे म्हणणे आहे की येथील शास्त्रज्ञांनी नोवेल कोरोनाव्हायरसच्या विषाणूंची अतिशय निष्काळजीपणे हाताळणी केली ज्यामुळे जागतिक महामारी पसरली.

 

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेत या रोगाच्या विष्णूंनी जन्म घेतल्याचे चीनने नाकारले आहे. यासंबंधीचे तपासकार्य लवकरच पूर्ण होऊन सगळे अहवाल ट्रम्पना सादर केले जातील. मग ट्रम्प चीनवर कश्याप्रकारे आणि कोणता दावा ठोकायचा हे आपल्या मित्र राष्ट्रांशी संगनमत करून ठरवतील.

 

कोरोनाव्हायरसाचा वापर बायोवेपन म्हणून चीनने केला या विधानाला वॉशिंग्टनने पुष्टी दिली नाही. अमेरिकन गुप्तचर सूत्रांनी सांगितले की चीनने हे बायोवेपन म्हणून वापरले नाही.

 

कोरोनाव्हायरसाचे जीनोम मॅपिंग असे दर्शविते की त्यामध्ये कोणतेही अनुवांशिक बदल केले गेले नव्हते असे शास्त्रज्ञांनी सांगितले. 'पेशंट झिरो' ला कोरोनाव्हायरसाची लागण ही लॅबमध्ये काम करतानाच झाली यावर मात्र शास्त्रज्ञ ठाम आहेत. आणि त्यानंतर या पेशंटने संपूर्ण जगभर हा विषाणू पसरवला. कोरोनाव्हायरसच्या शृंखलेतील सार्स- सीओव्ही -२ हे रोग नक्कीच वटवाघळामुळे पसरतात यावर शास्त्रज्ञांचे एकमत आहे. पण कोविद-१९ मात्र माणसापासूनच पसरला आहे.

 

वुहान लॅब ही चीनची एकमेव बायो सेफ्टी लेव्हल फोर (बीएसएल -4) लॅब आहे. म्हणजेच ती सुरक्षेचे सर्व निकष काटेकोरपणे पाळते असे दिसते तरी. त्यामुळेच हा व्हायरस लॅब च्या बाहेर कसा केला याविषयी संशय घेण्यास वाव आहे. परंतु कम्युनिस्ट सरकार मात्र हा व्हायरस लॅबमधून पसरला या आरोपाला " कॉन्स्पिरसी थियरी " म्हणून मोडीत काढत आहे. त्यांचे अजूनही हेच म्हणणे आहे की हा व्हायरस प्राण्यांच्या बाजारपेठेतूनच पसरला आहे.

 

अगदी सुरुवातीला या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीचा हुनान होलसेल सीफूड मार्केटशी कोणताही संबंध आलेला नव्हता. पण या गोष्टीला चीनने दडपले आणि आपले प्राण्यांच्या मार्केटचे तुणतुणे वाजवत राहिले. जागतिक आरोग्य संघटनेने ते अजून जोरात वाजवले. या व्हायरसच्या प्रादुर्भावाचा निश्चित स्रोत काय आहे याची शहानिशा न करता जागतिक आरोग्य संघटनेने चीनने दिलेल्या सी फूड मार्केट च्या कहाणीलाच खरे मानले.

 

प्रारंभी जे रुग्ण सापडले ते एकतर स्टॉल मालक, मार्केट कर्मचारी किंवा या बाजारात नियमित भेट देणारे होते. डिसेंबर २०१९ मध्ये जेव्हा या मार्केट मधील नमुन्यांची चाचणी घेतली तेव्हा सार्स-सीओव्ही-२ चे पॉझिटिव्ह रुग्ण दिसून आले. त्यामुळे डब्ल्यूएचओचे म्हणणे असे आहे की या व्हायरसची व्युत्पत्ती येथीलच प्राण्यांपासून झाली.

 

अनुवांशिक पुराव्यांवरून असे सूचित होते की व्हायरस कृत्रिमरित्या तयार करण्यात आला नव्हता आणि त्याची व्युत्पत्ती वटवाघळामुळे झाली असावी आणि त्यांच्याकडून एखाद्या अचूक क्षणी ती माणसात संक्रमित झाली असावी असे शास्त्रज्ञांचे जरी म्हणणे असले तरी अनुवांशिक नमुन्यामध्ये व्हायरस प्रथम कोणाकडून कुठे आणि कसा गेला याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.  

 

यूएस चे डिफेन्स सेक्रेटरी मार्क एस्पेर याना ' हा व्हायरस लॅब मध्ये तयार झाला असेल का? ' असा प्रश्न   विचारला असता त्यांनी संदिग्ध उत्तर दिले. "चीनने मुद्दाम हा व्हायरस तयार केला नसेल असे मला वाटते. पण चिनी कम्युनिस्ट पार्टीकडून जी उत्तरे येतायत त्याविषयी मनात शंका असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. त्यांनी आमची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेविषयी मनात किंतु आहे. "

 
wuhan lab_1  H

 

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅब येथे वाटसवाघळावर प्रयोग करत असताना तो मानवाच्या शरीरात गेला की अन्य कारणामुळे हे शोधायचा आम्ही प्रयत्न करीत आहोत असे ट्रम्पनी सांगितले. या व्हायरसचा प्रादुर्भाव पसरल्यावर चीनने ताबडतोब याचा आळ वुहानच्या प्राणी मार्केटवर आणि वटवाघळांवर घेतला. या प्राणिमार्केटमध्ये वटवाघळांची विक्री होत नाही. त्यामुळे इथे शंकेला वाव मिळतो.

 

चीनने काहीही लपवून न ठेवता जगातल्या शास्त्रज्ञांना याविषयी माहिती दिली तर काहीतरी मार्ग सापडू शकतो.

 

२०१८ मध्ये बीजिंगमधील अमेरिकन दूतावासाने वुहान लॅबमधील अपुऱ्या सुरक्षेबाबतची चेतावणी वॉशिंग्टनला दिली होती. ज्यामध्ये कोरोनाव्हायरसच्या साखळीतील अतिशय धोकादायक अश्या व्हायरसवर वटवाघळांवर काम चालू असल्याचा अहवाल होता. आंतरराष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी यात लक्ष घालावे असेही त्यावेळी सांगण्यात आले होते.

 

या रोगाच्या उद्रेकानंतर वुहान लॅब मधील सगळे पुरावे नष्ट करण्यात आले. हा व्हायरस वुहान लॅब मधून पसरल्याचे एकही पुरावा नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 

वुहानच्या मेयर ने म्हटलेय की कम्युनिस्ट पार्टीने जानेवारी २० पर्यंत या रोगाची वाच्यता न करण्याविषयी त्यांना बजावले होते. कम्युनिस्ट सरकारने अनेकांची मुस्कटदाबी केली. आणि चीनच्या अश्या उशीर करण्यामुळे हा रोग वेगाने जगात पसरला. चीन नंतर थायलंडमध्ये या रोगाचा पहिला रोगी सापडला. आणि चीनने या रोगाविषयी थोडी थोडी माहिती जगाला द्यायला सुरुवात केली. जगभर चाचण्या सुरु झाल्या.

 

अमेरिकेच्या आर्मी जनरलने म्हटले आहे की आम्ही व्हायरसच्या व्युत्पत्तीबद्दल नक्की काहीच सांगू शकत नाही. आम्ही शोधण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. सध्या तरी ठोस असा पुरावा आमच्याकडे नाहीये.

 

चीनच्या कुठल्याच माहितीवर आता विश्वास राहिला नाहीये. जर एकट्या अमेरिकेत या रोगाचे २०,००० बळी असू शकतात तर जिथे तो तयार झाला तिथली संख्या ३००० च कशी काय? चीन नक्की खरे आकडे देतेय? चीनने दिलेल्या आकडेवारीवर खरंच कुणाचा विश्वास आहे का?

 

वुहान लॅब मधील शास्त्रज्ञांना विचारलं असता तिथे प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांचा तुटवडा असल्याचे आढळून आले. ही लॅब सुरक्षित पणे चालवू शकतील अशी टीम नसल्याचे निदर्शनास आले आहे.

 

-प्राची चितळे जोशी.

 

( ICRR Media Monitoring Desk )

 

Source : .dailymail

 

US intelligence has ALREADY started a full-scale investigation into Wuhan lab and its 'role in the virus' as the White House weighs up what punishment will be dished out to Beijing over 'cover up'