Other Conflicts

चिन्यांकडून मोठ्या प्रमाणात घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यास केनियाला त्यांचे महत्त्वाचे मोम्बासा बंदर गमवावे लागणार.

केनियाच्या मोक्याच्या मालमत्ता कश्याप्रकारे चीनच्या घश्यात जाऊ शकतात यासंबंधी आफ्रिकन स्टॅन्डने नोव्हेंबर मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर काही महिन्यातच आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी चीन कारवाई करण्याच्या विचारात आहे. हे कर्ज केनियाने चीनकडून स्टॅंडर्ड गेज रेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात घेतले आहे. ..

अँग्लो- अमेरिकन ऑपरेशन - भारताविरुद्ध चाल

काश्मीर मुद्द्यांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्वाला खतपाणी घालून आणि युनायटेड नेशनच्या पंखांखाली अँग्लो-अमेरिकन या प्रदेशावर आपली साम्राज्य गाजवण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. नव्हे त्यांनी सुरक्षिततेच्या नावाखाली आपले सैन्यबळ पुरवून पुन्हा एकदा हा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेण्याचा निर्धार केला आहे. ..

रोहिंग्या - नवीन संकट

म्यानमार मध्ये मुस्लिम दहशतवादी गट कमी प्रमाणात आहेत आणि जे आहेत ते अगदीच दुबळे आणि कसलेही नियोजन नसलेले असे आहेत. त्यातील काहींचे थोड्याप्रमाणात दक्षिण आशियातील मुस्लिम गटांशी संबंध होते. पण या संबंधांमुळे त्यांना कोणताही फायदा झाला नाही. ..

काश्मिरी फुटीरतावादी आणि पाकिस्तानी अतिरेकी संघटनांच्या बदलत्या भूमिका- भारत सरकारच्या आक्रमक रणनीतीचे फलित?

१९८९ मध्ये दहशतवादी कृत्यांमुळे जीवाच्या भीतीने हजारोंच्या संख्येने काश्मिरी पंडित काश्मीर सोडून इतरत्र गेले होते. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये झालेल्या अचानक बदलामुळे हुर्रियत या फुटीरतावादी गटाचे नेते मिरवाईझ उमर फारूक यांनी आपल्या पॉलिसीमध्ये बदल घडवून आणला आहे. त्यांनी आता काश्मिरी पंडितांना परत त्यांच्या जन्मक्षेत्री बोलावण्यात पुढाकार घेतला आहे. ..

ब्रिटीश तेल टॅंकर ताब्यात घेण्याची इराणच्या अधिकाऱ्याची धमकी.

जर इराणचे जप्त केलेले जहाज सोडण्यात आले नाही तर ब्रिटिश तेल टँकर ताब्यात घेण्यात येईल असे एका इराणी अधिकाऱ्याने म्हटले आहे. ..

हुर्रियत तीन कारणास्तव चर्चेसाठी झाली तयार.

१५ वर्षानंतर प्रथमच जम्मू आणि काश्मीर मुद्द्यावर हुर्रियतचे नेते केन्द्राशी चर्चा करण्यास तयार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर सत्य पाल मलिक यांनी शनिवारी हुर्रियत नेते बोलणी करण्यासाठी तयार असल्याची बातमी दिली. ..

बांगलादेशने १९७१ च्या जनसंहाराला संपूर्ण जगात "जिनोसाईड" म्हणून नोंदण्याची मागणी संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली आहे.

फाळणीआधीच्या पाकिस्तानने २५ मार्च १९७१ रोजी पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेल्या ईस्ट पाकिस्तानी नागरिकांच्या अतिशय क्रूर अश्या नरसंहाराबद्दल (ऑपरेशन सर्चलाइट) पाकिस्तानी लष्कराविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघाकडे दाद मागितली आहे. जगातील सर्वात वाईट असा हा नरसंहार त्या वेळच्या पाकिस्तानी सैन्याने घडवून आणला होता. ..

पाकिस्तानला काश्मीर कसे मिळवता येईल?

कामरान युसुफ म्हणतात पाकिस्तान आर्थिक दृष्ट्या सबळ झाला तरच तो काश्मीर जिंकू शकेल. एखाद्याने सकारात्मक विचार करावा पण तो किती? दिवास्वप्नच नाही का हे? यांच्या वाट्याला आलेला पाकिस्तान सुद्धा यांना नीट सांभाळता येत नाही आणि निघाले काश्मीर घ्यायला. ते ही आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या स्थिर होऊन. मग इतकी वर्ष यांना आर्थिक दृष्ट्या सबळ होण्यास कोणी अडविले होते? ..

चीनच्या जागतिक विस्ताराच्या मार्गात अडथळा निर्माण करणे गरजेचे.

२०१८ च्या राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस ला संरक्षण सचिवांबरोबरच राज्याच्या सचिवांशी सल्लामसलत करून काही गोष्टी ठरविणे भाग होते. "चीनचे परदेशातील लष्कर किंवा बिना लष्करी परंतु राजनैतिक उपक्रम हे त्या त्या प्रदेशातील आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने चांगले नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात "चीनच्या वाढत्या जागतिकीकरणाला आळा घालण्यासाठी अमेरिकेचे सुरक्षाविषयक मूल्यांकन" प्रसिद्ध झाले. मुक्त जगाचा यात संबंध येत असल्याने या मूल्यांकनाची शहानिशा होणे गरजेचे ..

चीनने माजी सैनिकांना केले अटक.

गेल्या वर्षी लष्कराच्या सैनिकांविरुद्ध उठाव केल्याच्या आरोपाखाली चीन सरकारने १९ माजी सैनिकांना अटक केल्याचा हुकूम शुक्रवारी काढला...

आता चर्चा नाही तर कृती करणार- शी जिनपिंग.

कधी शांततेकडून युद्धाकडे तर कधी युद्धाकडून शांततेकडे अशी सततची तळ्यात मळ्यात परिस्थिती गेल्या ४० वर्षांपासून तैवान आणि चीन मध्ये आहे. शांतता प्रस्थापित करण्याऐवजी आता युद्धास तोंड फुटतेय की काय अशी मोठी भीती निर्माण झाली आहे...

२०१९ मध्ये चीनच्या लष्करापुढील पहिले लक्ष्य- युद्धासाठी केव्हाही सज्ज रहाणे.

येणाऱ्या नवीन वर्षात युध्द प्रशिक्षणावर जोर देणे आणि युद्धासाठी संपूर्ण तयारीनिशी सज्ज रहाणे या दोन गोष्टींना प्राधान्य देणे हे उद्धिष्ट चीन लष्करापुढे असेल असे एका अधिकृत वृत्तपत्राने म्हटले आहे...

गिलगिट बाल्टिस्तान…पाकिस्तान पुढील पेच.

जम्मू आणि काश्मीर प्रश्नाइतकाच पाकिस्तान मधील गिलगिट बाल्टिस्तानचा त्यांच्या संविधानिक हक्कांसाठीचा लढा सुद्धा जुनाच आहे. १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तान मध्ये प्रभुत्व मिळविले. काश्मीरच्या शासकांबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन पाकिस्तानने केल्यामुळे या युद्धाला तोंड फुटले. पाकिस्तानने कराराचा भंग करून हल्ला चढविल्यामुळे काश्मीरच्या शासकांना भारताकडे धाव घ्यावी लागली होती...

रशियाकडून जहाजांवर दारूगोळ्याचा वापर झाल्यामुळे मार्शल लॉ घोषित करण्याचा युक्रेनचा निर्णय.

काही दिवसांपूर्वी काळ्या समुद्रात रशियन लष्कराकडून समुद्री हद्दीचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली युक्रेनी जहाजे ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्थ 'मार्शल लॉ'ची घोषणा करण्याची इच्छा युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे...