ग्रेट ब्रिटन अटळ विभाजनाच्या दिशेने- स्वतंत्र स्कॉटलंड देशाची मागणी करणारा हमजा युसूफ नवा फर्स्ट मिनिस्टर
         Date: 28-Mar-2023
ग्रेट ब्रिटन अटळ विभाजनाच्या दिशेने- स्वतंत्र स्कॉटलंड देशाची मागणी करणारा हमजा युसूफ नवा फर्स्ट मिनिस्टर
(ICRR- Other Conflicts)
 
 
७५ वर्षांपूर्वी भारताच्या धार्मिक फाळणीला खतपाणी घालणाऱ्या ग्रेट ब्रिटनला नियतीची भेट!
 

Scottish Nationalist Party Humza Yousuf 
स्वातंत्र्यवादी स्कॉटिश नॅशनल पार्टीचा नवा नेता म्हणून पाकिस्तानी वंशाचा हमजा युसूफ याची आज निवड झाली. हि पार्टी स्कॉटलंडला ग्रेट ब्रिटन पासून वेगळं होऊन स्वतंत्र देश घोषित करण्याच्या अजेंड्यावर काम करते. ज्या ब्रिटिश साम्राज्याने विशाल भारतात आपल्या कुटील धोरणांच्या आधारे हिंदू- मुस्लिम आधारावर फाळणी करून दोन देश निर्माण केले त्या ब्रिटनवर आता नियती वेगळ्या मार्गाने सूद उगवत आहे. ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे भारतीय वंशाचे आहेत आणि आता स्कॉटलंडच्या नवा पंतप्रधान हमजा युसूफ पाकिस्तानी वंशाचा!
ग्रेट ब्रिटनमध्ये भारत- पाकिस्तान आणि बांगलादेशी मुस्लिमांनी आपली लोकसंख्या कल्पेनेच्या बाहेर वाढवली आहे आणि या देशातील हिंदूही तिथे मोठ्या संख्येने आहेत. ब्रिटनमध्ये मुस्लिमांनी अनेक भागातून गोऱ्यांना हद्दपार करून घोषित-अघोषित शरिया पॉकेट्स निर्माण केली आहेत. आता या बदलत्या लोकसंख्येचा राजकीय परिणाम या देशांच्या नव्या राजकीय नेतृत्वात दिसत आहे.
२०१४ चा स्कॉटिश स्वातंत्र्याचा रेफरंडम..
आयर्लन्ड मध्ये आयरिश रिपब्लिकन आर्मी आणि तिची राजकीय शाखा सिन्न फेन यांचा कित्येक वर्ष आयरिश स्वातंत्र्यासाठी लढा चालू होता. कॅथॉलिक आयर्लंड विरूद्ध प्रोटेस्टंट (बाप्टिस्ट) ब्रिटन असा हा संघर्ष होता. २०२२ ला परत एकदा सिंन फेन ला आयर्लंड च्या निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर आयर्लंडची आयरिश ओळख आणि स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आला होता.
 

Sinn Fein Ireland 
२०१४ ला स्कॉटलंडला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळावा का याबाबत एक रेफरंडम झाला पण त्यात ५३.३% लोकांनी स्वातंत्र्याच्या विरोधात आणि ४४.७% लोकांनी स्वातंत्र्याच्या बाजूने मतदान केलं यामुळे स्कॉटिश स्वातंत्र्याचा मुद्दा मागे पडला. परंतु आता परत एकदा स्वातंत्र्यवादी स्कॉटिश नॅशनल पार्टीचा पाकिस्तानी नेता स्कॉटलंडचा पंतप्रधान होत असल्याने हि चळवळ परत एकदा जोर धरेल अशी शक्यता आहे.
आयर्लंड मध्येही हिंसक आयरिश रिपब्लिकन आर्मीची राजकीय शाखा सिन्न फेन पुन्हा एकदा मध्यवर्ती भूमिकेत आल्यामुळे कॅथॉलिक आयर्लंड आणि प्रोटेस्टंट ब्रिटन यांच्यात स्कॉटलंड कडून प्रेरणा घेऊन काय काय राजकीय गणिते नव्याने निर्माण होतात हा औत्सुक्याचा विषय आहे.
 

Irish Republican Army 
स्कॉटलंड आणि खलिस्तानी रेफरंडम...
कॅनडा आणि ब्रिटन हे खलिस्तानी रेफरंडम च्या नावाने भारतातील विभाजनवादी तत्वांना खुलेआम पाठबळ देतात. रेफरंडम २०२० हा कोरोनामुळे बारगळलेला उपदव्याप सुद्धा पाकिस्तानी गुप्तचर संस्थांचा समन्वयातून ब्रिटनमधूनच सुरु होता आणि आताही सुरु आहे.
नागा फुटीरतावादी गटांचे सगळे प्रोपागंडा प्रकल्प बॅप्टिस्ट चर्चच्या माध्यमातून खुद्द ब्रिटनच्या जमिनीवरून अव्याहतपणे गेली ७५ वर्षे सुरु आहेतच.
"कापं गेली आणि भोकं राहिली" म्हणतात तीच अवस्था सध्याच्या ब्रिटनची आहे. एकेकाळी अख्ख्या जगावर साम्राज्य गाजवणारं ब्रिटन आज आपलं "ग्रेट ब्रिटन" हे नाव सुद्धा शाबूत ठेवायला धडपडत आहे आणि हळूहळू एकेक देश जात फक्त इंग्लंड शिल्लक राहील अशी चिन्हे आहेत.
ज्या ज्या देशातून ब्रिटिशांनी पन्नासच्या दशकात आपला पाय काढून घेतला त्या त्या देशात धार्मिक, भाषिक, वांशिक, प्रादेशिक आधारावर विभाजनवादी, फुटीरतावादी चळवळी आणि गटांना निर्माण करून आजपर्यंत ब्रिटिश त्यांना पोसत आहेत.
येणाऱ्या काळात नियती ग्रेट ब्रिटनची शकले उडवून आणि ब्रिटिश राष्ट्राची "गोऱ्या लोकांचं प्रोटेस्टंट ख्रिस्ती राष्ट्र" हि ओळख पुसून "काळ्या आशियाई मुस्लिमांचं मुस्लिम राष्ट्रं" हि नवीन ओळख देऊनच थांबेल अशी पुरेपूर शक्यता आहे.
---विनय जोशी