अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व कमी करणे ही आता काळाची गरज आहे.
         Date: 24-Apr-2020

अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व कमी करणे ही आता काळाची गरज आहे.

 

सुरुवातीला चीन कोरोनाव्हायरसच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरला. एवढेच नाही तर जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय समुदायांना त्यांनी आधी याविषयी सूचित केले नाही. चीनने आधीच कारवाई केली असती तर हा रोग जगभर न पसरता केवळ हुबेई प्रांतापुरता मर्यादित राहिला असता. चीन कितीही बलाढ्य असला तरी तो एक जबाबदार देश नाही. 

 

गेली तीन दशके अमेरिका आर्थिकदृष्ट्या चीनवर अवलंबून आहे. चीनमध्ये त्यांनी सर्वात आधी मोठमोठे कारखाने उभे केले. संपूर्ण जगात यासाठी त्यांना चीनची भूमी अधिक उपयुक्त वाटली. आणि नंतर चीन जगाची बँक म्हणून कधी ओळखला जाऊ लागला ते त्यांना कळलंच नाही. गेल्या दोन वर्षात अमेरिका  तंत्रज्ञानावर देखील चीनवर अवलंबून राहू लागला आहे. ५जी वायरलेस तंत्रज्ञान हे त्याचे मुख्य उदाहरण आहे. पश्चिमेकडील कंपन्या तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचा उपयोग यासाठी चीनवर विसंबून आहेत. याव्यतिरिक्त, युरोपियन देश ज्यांना नवीन नेटवर्क वापरात आणायचे आहे अश्या कंपन्यांनी त्यासंबंधी आवश्यक उपकरणांसाठी चीनला पसंती दिली आहे. अमेरिका यात चीनच्या मागेच आहे.

 

ही केवळ सुरुवातच आहे. चीन अगोदरपासूनच स्थायी उर्जा, क्वांटम कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामध्ये आघाडीवर आहे. आणि लवकरच तो बायो-सायन्स, उर्जा संचय, भौतिक विज्ञान यामध्ये देखील बाजी मारेल. भविष्यात अमेरिका आणि इतर लोकशाही देशांना नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता भासली तर त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या हुकूमशाही असलेल्या देशाकडे धाव घ्यावी लागेल. सध्या ज्याप्रमाणे विकसनशील देश कर्जासाठी आणि गुंतवणुकीसाठी चीनकडे ओढले जात आहेत.

 
US,china_1  H x

 

सध्या बीजिंगवर शी जिनपिंग या कट्टर राष्ट्रवादी माणसाची सत्ता आहे. ती कायम राहणार नाहीये. खरं तर २००० च्या पहिल्या दशकात चीनचे नेतृत्व जरासे मवाळ होते. पण त्यांची सत्ता जास्त काळ चालू शकली नाही. त्याचप्रमाणे शी जिनपिंग यांचे होईल. आणि अमेरिकेचे चीनवर अवलंबित्व आवश्यक अथवा अपरिहार्य नाही. तरीसुद्धा अमेरिकेने स्वतःला वेळीच सावरले नाही तर त्यांना लवकरच शी जीनपिंगचे हुकुम पाळावे लागतील.

 

जर अमेरिकेच्या पुढाऱ्यांना पुढच्या काही वर्षात मानहानीला सामोरे जायचे नसेल तर त्यांना आत्ताच स्वतःला वेगळे करावे लागेल. अमेरिकेला समजून घ्यावे लागेल की मुक्त बाजारपेठेवर जादूने तांत्रिक वर्चस्व मिळणार नाही किंवा तांत्रिक स्वायतत्ता आपणहून चालत त्यांच्याकडे येणार नाही. या गोष्टी साध्य कराव्या लागतील. अमेरिकेने पूर्वी ज्याप्रमाणे अपोलो प्रोग्रॅम आणि डीएआरपीए मूलभूत सुविधांद्वारे साध्य केले होते तश्याप्रकारे ते पुन्हा साध्य करावे लागेल. याचाच अर्थ, पाश्चात्यांनी आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घातली पाहिजे.

 

मुक्त व्यापाराच्या संकल्पनेमुळे पाश्चात्य देशांनी आपल्या कंपन्या चीनसारख्या देशात हलवल्या आहेत. दक्षिण चिनी समुद्र, पाकिस्तान, श्रीलंका, दिबाऊटी आणि इतर ठिकाणच्या जमिनी चीनने हडप केल्याप्रकरणी त्यांना कोणी जाब विचारला नाही. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय मुक्त बाजारात स्पर्धेची एक यंत्राना बनवली आहे. ज्यामध्ये वॉशिंग्टन अपयशी ठरत आहे. कारण अमेरिकेने स्वतःच्याच कल्पना राबवायला सुरुवात केली तर बीजिंग आणि मॉस्कोसारख्या देशांनी जागतिक स्तरावर मालकी हक्क हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. त्यांना हा खेळ कोणत्या प्रकारे खेळायचा माहित आहे.

 

अजून उशीर झालेला नाही. विज्ञान किंवा तंत्रज्ञान यामधील क्षेत्रात चीनने अजूनतरी संपूर्णपणे वर्चस्व मिळवलेले नाही. यातील बहुतेक भागात अमेरिका वरचढ आहे. परंतु या क्षेत्रात पश्चिमेला आपले वर्चस्व कायम ठेवायचे असेल तर धोरणकर्त्यांनी त्याप्रमाणे आपले धोरण आखणे गरजेचे आहे.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source : THE NATIONAL INTEREST

 

Reducing America's Dependence on China Is Now a Strategic Necessity