रशियन एस - ४०० ट्रायम्फ एअर डिफेन्स सिस्टीम्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतीय हवाईदलाचे तज्ञ मॉस्कोमध्ये रवाना.
         Date: 21-Jan-2021

रशियन एस - ४०० ट्रायम्फ एअर डिफेन्स सिस्टीम्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतीय हवाईदलाचे तज्ञ मॉस्कोमध्ये रवाना.

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

भारत आणि रशिया एकमेकांचे तंत्रज्ञान वाटून घेत आहेत आणि रशियाने विक्रीनंतरची सेवा प्रणाली सुधारण्यासाठी कायद्यात सुधारणा घडवून आणली आहे.

 

एस -४०० ट्रायम्फ एसए -२१ ग्रोलरहवाई संरक्षण प्रणालीचे प्रशिक्षण घेण्यासाठी लष्करी तज्ञांची टीम १९ जाने २०२१ रोजी मॉस्कोला रवाना झाली आहे. या तज्ञांच्या टीमला संबोधित करतांना भारतातील रशियाचे राजदूत निकोलय आर. कुदाशेव यांनी नमूद केले की," एस -४०० च्या पुरवठ्यावरील करार हा द्विपक्षीय लष्कर आणि तांत्रिक लष्करी सहकार्याचा प्रमुख उपक्रम आहे. भारत आणि रशिया यांच्यातील विशेषाधिकारात्मक आणि धोरणात्मक भागीदारीचा हा मुख्य आधारस्तंभ आहे. आज दोन्ही देश एकमेकांच्या विकासातच नव्हे तर लष्करी उपकरणे, लष्करी साहित्य आणि त्याच्या सुट्या भागांच्या उत्पादनातही सहभागी आहेत.

 

भारत-रशिया लष्करी आणि लष्करी-तांत्रिक संबंध.

 

एस-४०० प्रणाली प्रकल्पाबरोबरच एके-२०३ कलाश्निकोव्ह कराराची लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. (जेव्ही इंडो-रशियन रायफल्स अंतर्गत भारतात ७ लाखाहून अधिक उत्पादन केले जाणार आहे). तसेच, हे दोन्ही देश २०० केए -२२६ हेलिकॉप्टरचे भारतात उत्पादन घेण्याचे काम करत आहेत. एवढेच नाही तर लढाऊ विमानचालन क्षेत्रात ( त्यामध्ये एसयू -३० एमकेआय प्रोग्राम सुद्धा आहे ) कार्यरत आहेत. मुख्य लढाऊ रणगाडे (टी-९० ), फ्रीगेट्स, पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रे तसेच ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे संयुक्त उत्पादन यावरही दोन्ही देश काम करीत आहेत.

 

भारत सरकारच्या ' मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांच्या अंतर्गत दोन्ही देश सुट्या भागांच्या संयुक्त उत्पादन कराराच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत.

 

हिंद महासागरासह सागरी सहकार्य बळकट करण्यासाठी Logistics Exchange Memorandum of Agreement (LEMOA) करारावरही जोरात काम सुरु आहे.

 

भारत-रशिया द्विपक्षीय संबंध.

 

" आमचे संबंध परस्पर विश्वासावर आधारित आहेत आणि आमचे द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संबंध हे आमच्यातील निष्ठा प्रतिबिंबित करतात. आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदांवर आधारित चौकटीत बसतील असेच न्याय्य आणि समान संबंध ठेवण्याचा आमचा दृष्टिकोन आहे." असे रशियन राजदूताने सांगितले.


S-400_1  H x W: 

 
एरो-इंडिया २०२१ मध्ये उपस्थिती.
 

रशिया सर्वात मोठ्या प्रदर्शकांपैकी एक असण्याची अपेक्षा आहे आणि एसयू -५७ , एसयू -३५ आणि मिग -३५ लढाऊ विमानांचे प्रदर्शन करण्याची त्यांची योजना आहे. केए-५२, केए-२२६,एमआय-१७ बी -५, एमआय -२६ तसेच एस -४०० प्रणाली आणि इतर अनेक उपकरणे तेथे असतील.

 

एस -४०० ट्रायम्फ एसए -२१ ग्रोलरएअर डिफेन्स सिस्टम-

 

ऑगस्ट २०२० मध्ये, त्या देशातील लष्कर -२०२० आंतरराष्ट्रीय सैन्य आणि तांत्रिक मंचाच्या बाजूने घोषणा केली गेली की एस -४०० ट्रायम्फचा पहिला रेजिमेंटल संच २०२१ च्या अखेरीस वितरित केला जाण्याची शक्यता आहे.

 

भारत-रशिया यांच्यात एस -४०० ट्रायम्फ एसए -२१ ग्रोलरकरिता ५.४३ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे. एस -४०० ही लांब पल्ल्याची पृष्ठभाग ते हवाई क्षेपणास्त्र (सरफेस टू एअर मिसाईल ) प्रणाली आहे. भारतीय हवाई दलासाठीच ही प्रणाली आहे. रशियाकडून पाच ट्रायम्फ रेजिमेंटल किट्स देण्यात येतील असा हा करार आहे.

 

फायनान्शियल एक्सप्रेस ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार रशियन अधिकाऱ्यांनी २०१९ मध्येच हे स्पष्ट केले आहे की देयकाची बोलणी झालेली आहेत आणि ती यूएस डॉलर मध्ये होणार नाहीत. बहुधा पेमेंट रुपी-रुबल चलनातून होणार आहे.

 

याच्या वितरणास विलंब होईल आणि ती २०२५ पर्यंत पूर्ण होईल. मुंबई-बडोदा औद्योगिक कॉरिडोर आणि दिल्ली येथे हे तैनात केले जाण्याची शक्यता आहे.

 

एसए -२१ ग्रोलरकडे ४० किमी, १०० किमी, २०० -किमी आणि ४०० किमी अश्या ४ टप्प्यांच्या मारा करू शकतील अशी चार प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. यामुळे भारतीय हवाई मजबूत होणार आहे.

 

लष्करी तज्ञाच्या मते हे तैनात होण्यास मोजकीच मिनिटे लागत असल्याने क्षेपणास्त्रांचे एक अभेद्य इंटरलॉकिंग ग्रीड तयार करण्यास मदत करेल. कमी आणि जास्त उंचीवरील लक्ष्य शोधण्याची आणि ती नष्ट करण्याची प्रणाली यांच्यात आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक जामिंगला प्रतिरोधक आहे.

 

फोटो स्रोत - गुगल

 

Source : youtube, google, wikipedia, Financial Express etc.