निशाणा बीजिंग
         Date: 11-Dec-2018

निशाणा बीजिंग

 

भारताने २०१६ मध्ये अग्नी-५ च्या केलेल्या चाचणीने चीनला युनाइटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल कडे भारताची तक्रार घेऊन जाणे भाग पाडले होते. चीनने यावर खूप थयथयाट केला होता.

 

या मिसाईलच्या चाचणीमुळे भारताची दूरवरील लक्ष्याला लक्ष्य करण्याची क्षमता ठळक झालेली दिसून येते. भारताच्या या बदललेल्या आक्रमक पवित्र्याचा गर्भित अर्थ चीनच्या लक्षात येणार नाही असे कसे होईल? भविष्यकाळातील धोका चीनच्या ताबडतोब लक्षात आला.


 
 

तथापि, या मिसाईलच्या पूर्णत्वाकडील वाटचालीस अजून पुष्कळ अवकाश होता. पाच वर्षांमध्ये अनेक यशस्वी चाचण्या होऊनही स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड (एसएफसी) मध्ये सामील होण्यास या मिसाईलला अजून थोडा वेळ लागेल. तसेच एकाच मिसाईलचे उत्पादन करून चालणार नाही तर अनेक मिसाईल्सचे उत्पादन करण्यास थोडा अवधी लागेल. असे असले तरी आजची चाचणी ही या वर्षातील तिसरी चाचणी होती आणि तीही निर्णायक.

 

एकदा का अग्नी-५ आपल्या ताफ्यात समाविष्ट झाले की डाव भारताच्या हातात आलाच म्हणून समजा.

 

५०००-८००० किमी पर्यंत मारा करू शकणारी ही अग्नी-५ चीनच्या कुठल्याही शहराला लक्ष्य करू शकते. अगदी बीजिंगला सुद्धा. त्यामुळे चीनला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. या मिसाईल मुळे चीनच्या आण्विक हल्ल्यास भारत सडेतोड उत्तर देऊ शकतो. चीनला शेरास सव्वाशेर मिळाल्यामुळे त्याच्यावर वचक राहील. हा खूप मोठा फायदा भारताला होणार आहे.

 

अग्नी-५ मध्ये घन-इंधनाचा वापर केला गेला आहे. घन-इंधन मिसाईलचा एक मोठा फायदा म्हणजे हे मिसाईल उडण्यासाठी जराही वेळ घेत नाही. ते जलद गतीने उडते आणि दुसरं म्हणजे हे इंधन दीर्घकाळ साठवून ठेवता येते. मिसाईलसाठी जर द्रव इंधन वापरले गेले असेल तर द्रव इंधनाच्या साठ्याचे पूर्वनियोजन करावे लागते आणि यासाठी खूप वेळ लागतो. तसेच जर वापरात नसेल तर सुरक्षिततेच्या कारणास्तव मिसाईलमधून द्रव-इंधन ताबडतोब काढून टाकून ते वेगळ्या ठिकाणी सुरक्षित रित्या साठवून ठेवावे लागते. त्याचमुळे केव्हाही घन-इंधन द्रव-इंधनापेक्षा वाहून नेणे आणि त्याचे संचयन करणे सोपे जाते.

 

हे मिसाईल कॅनिस्टराईज मिसाईल आहे. एप्रिल २०१२ आणि सप्टेंबर २०१३ मध्ये अग्नी-५ च्या ज्या दोन चाचण्या केल्या गेल्या त्या कॅनिस्टराईज केल्या गेल्या नव्हत्या. त्यानंतर केलेल्या चारही चाचण्या कॅनिस्टराईज होत्या. अब्दुल कलाम बेटावरून रोड मोबाईल लॉन्चर द्वारा आजचे मिसाईल प्रक्षेपित केले गेले.

 

कॅनिस्टराईझेशनने मिसाईल केव्हाही उड्डाण करण्याच्या तयारीत राहते, हल्ला करण्यास सोपे आणि जलद होते. रोड मोबाइल लाँचरवर ठेवल्याने शत्रूच्या उपग्रहांना चुकवून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येते. यामुळे ते कोणत्याही हल्ल्यापासून सुरक्षित राहण्यास मदतच होते.

 

भारताने सुरुवातीच्या काळात दुर्घटना टाळण्यासाठी मिसाइल्स आणि न्यूक्लियर वॉरहेड्स हे एकमेकांपासून लांब ठेवले होते. तथापि, अग्नी-५ ने सारी समीकरणेच बदलली. कॅनिस्टराईज्ड संरचनेत, मोबाईल लाँचरवर लोड करण्यापूर्वी मिसाईल्स आणि न्यूक्लियर वॉरहेड्स यांची जोडणी होणे आवश्यक आहे. अग्नी मालिकेतील अग्नी १ ते अग्नी ४ मध्ये मिसाईल्स आणि आणि न्यूक्लियर वॉरहेड्स यांची आवश्यकतेनुसार जोडणी करता येत होती. म्हणजे ते विलग करूनही ठेवता येत होते. परंतु अग्नी ५ ला हा पर्याय नाही. ही भारताच्या आण्विक धोरणातील महत्त्वाची बाब आहे.

 

अवकाशाला रणभूमी बनविण्याच्या विरोधात भारत असला तरी अग्नी-५ च्या यशस्वीततेमुळे अँटी-सॅटेलाईट शस्त्रे बनविण्यासाठी आणि नियोजित करण्यासाठी भारताचा विश्वास दुणावला आहे. चीन मात्र गेल्या दशकभरापासून तरी याच्या मागे लागला आहे आणि त्यांनी काही चाचण्या देखील केल्या आहेत. चीनतर्फे अवकाशात काही धोका उत्पन्न झाला तर प्रत्युत्तरादाखल भारत एएसएटी ची उभारणी करेल.

 

डीआरडीओचे माजी अध्यक्ष डॉ. सारस्वत यांनी २०१२ मध्ये मान्य केले होते की अग्नी-५ ने,"अँटी- सॅटेलाईट शस्त्रे (एएसएटी) आणि लघु / सूक्ष्म उपग्रह प्रक्षेपित करणे सुरु केले आहे."

 

"अँटी- सॅटेलाईट शस्त्रे (एएसएटी) ८०० किमी उंचीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.. अग्नी ५ तुम्हाला अधिकची क्षमता आणि शस्त्र निष्क्रिय करण्याची क्षमता देते. हे सॅटेलाईटला लक्ष्य करण्यास एकदम निष्णात असेल." असेही ते म्हणाले.

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source: SWARAJYA

Destination Beijing: Why The Agni-V Is A Game Changer For India