सुखोई-३० चं कौशल्य अमेरिका आणि नाटोसाठी डोकेदुखी.
         Date: 09-Mar-2019

सुखोई-३० चं कौशल्य अमेरिका आणि नाटोसाठी डोकेदुखी.

 

 एआयएम-१२० सी -५ बीव्हीआरएएम्स ला हुलकावणी देण्यात सुखोई-३० यशस्वी. यूएसएएफ आणि नाटोसाठी वाईट बातमी.

 

पळून जाणाऱ्या एफ-१६ या विमानातून अमेरिकेची बियाँड-व्हिज्युअल-रेंज एअर-टू-एअर मिसाईल (बीव्हीआरएएएम) यांचा मारा भारतीय सुखोई-३० या एकट्या विमानावर ४-५ वेळा करण्यात आला. ज्यामुळे ते फक्त पळून जाऊ शकले नाहीत तर त्यामुळे त्यांचेच रडार लॉक झाले आणि त्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोचता आले नाही. त्यांचे मिसाईल आणि रॉकेट लक्ष्याचा वेध न घेताच कोसळले. नुकतीच आयएएफने या गोष्टीला पुष्टी दिली आहे.

 


एआयएम-१२० सी -५ मिसाईल ही अजूनही फ्रंट लाईन एअर टू एअर मिसाईल प्रणाली आहे जी अमेरिकेच्या संरक्षण तज्ज्ञांनी तयार केली असून अनेक फायटर विमानांमध्ये तैनात करण्यात येते. आणि अमेरिकेच्या वायूसेनेबरोबरच जवळपास नाटोच्या सर्वच वायूसेनेमध्ये वापरण्यात येते. भारतीय एसयू -३० एमकेआय मध्ये शत्रूच्या मिसाईल्सना तोंड देण्यासाठी जॅमर्स, फ्लेअर्स आणि व्यवस्थित प्रशिक्षण या सर्वांचे उत्तम प्रकारे संयोजन केले आहे. अश्याप्रकारे काही सेकंदामध्येच एफ-१६ वर हल्ला करण्यात आला.

 

रशियन बनावटीच्या सुखोई -३० फायटर जेटने मिसाईल कुचकामीच केले नाही तर हवेमध्ये जॅमिंगद्वारे त्यांचे रॉकेट यशस्वीरीत्या निकामी केले. यामुळे पेंटागॉन, नाटो आणि इतर अनेक आशियायी देशांच्या मनात धोक्याची घंटा नक्कीच वाजली असेल. आता अश्या मिसाईल्सवर अवलंबून असणाऱ्या देशांना सुखोई-३० च्या तोडीस तोड काहीतरी शोधणे क्रमप्राप्त आहे. 

 

युएसएफ आणि इतर नाटो देशांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण पीएलएएएफ कडे सुखोई -३० चा तांडाच्या तांडा आहे आणि ते त्याचा वापर अवैध कामाकरिता करतात. जसे की साऊथ चायना सी मध्ये किंवा त्या भागातील इतर भागांमध्ये अवैध रित्या आपला जम बसविण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात सुखोई-३० तैनात केले आहेत.

 

चिनी सु-३० हे तांत्रिक दृष्ट्या भारताच्या सु -३० एमकेआय पेक्षा प्रगतीशील नसले तरी काही वर्षातच रशियाकडून आपल्याला अधिक विकसित सु-३५ मिळेपर्यंत चीनकडे बीव्हीआरएएम्सला शाह देईल असे तंत्रज्ञान असेल.

 

यूएस एअर फोर्सच्या जुन्या अहवालानुसार अमेरिकेच्या फायटर जेट मधून हल्ला केले गेलेले एक किंवा दोन बीव्हीआरएएम्स ना जुन्या सु-२७एसेम३ ने हुलकावणी दिली आहे. परंतु हे अगदीच खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. सिम्युलेशनमध्ये, सु-२७एसएम३ ने अमेरिकेच्या बीव्हीआरएएम्सला मात दिली नाही तर त्याच्या पायलटला परतून हल्ला करण्याची संधी सुद्धा दिली. थ्रस्ट व्हेक्टरिंग कंट्रोल (टीव्हीसी) इंजिन आणि उत्कृष्ट अश्या भारतीय आणि इस्रायली जॅमर्स ने युक्त असे भारतीय सु -३० एमकेआय असून त्याने यूएसएएफच्या सिम्युलेशनच्या अंदाजाला यशस्वीपणे पार केले आहे. तसेच जगभरातील लष्कराला ही नवीन डोकेदुखीच होऊन बसली असेल.

 

अभय रॉय यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media MOnitoring Desk)

 

Source: IDRW

 

Single Sukhoi-30 successfully dodging 4-5 AIM-120C-5 BVRAAMs is bad news for USAF and NATO