पाकिस्तान आणि चीनच्या सीमापार होणाऱ्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स उभारले.
         Date: 27-Jun-2019

पाकिस्तान आणि चीनच्या सीमापार होणाऱ्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स उभारले.

 

लष्कराच्या वॉर फायटिंग मशीनरी मध्ये अधिक चांगले बदल घडवून आणणे आणि "कोल्ड स्टार्ट" ची संज्ञा अधिक रुंदावण्यासाठी, झटपट अॅक्शन घेऊ शकतील आणि पाकिस्तान ,चीन सीमापार जोरदार तडाखा देऊ शकतील अश्या  इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स (आयबीजीज) ग्रुपची उभारणी भारतीय लष्कर लवकरच करेल.

 

गेल्याच महिन्यात "प्राणघातक आणि चपळ" अश्या आयबीजीजचा युद्धसराव आणि युद्धाभ्यास घेण्यात आला. चांदीमंदिर येथे वेस्टर्न कमांड हेडक्वार्टरच्या अंतर्गत "स्ट्राईक (ऑफेन्सिव्ह) कॉर्प्स" आणि "होल्डिंग (डिफेन्सिव्ह) कॉर्प्स" यांनी एकत्रितपणे हा सराव केल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.

 

जम्मू, पंजाब आणि राजस्थान येथील सीमावर्ती भागात येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर पर्यंत दोन ते तीन आयबीजीज तैनात करण्याची योजना आहे. त्यानंतर चीनच्या सीमेलगत पन्नागढ (वेस्ट बंगाल) येथे नवीन १७ माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स च्या अंतर्गत एक आयबीजी उभारण्यात येईल.

 

ही नवीन आयबीजीज संपूर्णपणे सक्षम असेल. त्यात मोठ्या प्रमाणात T- 90S मेन बॅटल टँक्स बरोबरच इन्फंट्री, तोफखाना, एअर डिफेन्स, सिग्नल्स आणि इंजिनिअर्स, हल्ला करणारी हेलिकॉप्टर्स यांचा समावेश असेल. या नवीन आयबीजीचे प्रमुख मेजर जनरल असतील.

 

"सरकारकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर, दोन्ही म्हणजेच आक्रमक आणि संरक्षणात्मक अश्या आयबीजीज ना क्रमाक्रमाने तैनात केले जाईल. सर्वात पुढे आक्रमणाच्या तयारीत असलेले शस्त्रास्त्रांनी सज्ज असे टँक्स असतील त्यानंतर इन्फ्रंट्री असेल," असे सूत्रांनी सांगितले.

 

पुलवामाचा भ्याड हल्ला आणि त्याला दिलेले बालाकोटचे प्रत्युत्तर यामुळे भारत पाकिस्तान संबंध अतिशय बिघडलेले असल्याने लवकरच आयबीजीज ना सीमेवर तैनात करण्यात येऊन त्यांच्याकडून युद्धसराव सुद्धा करून घेतला जाईल असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले.


 

फक्त युद्ध सरावाच्या वेळी एकत्र येणाऱ्या युनिट्सना एकाच ठिकाणी एकत्रित करून ठेवून त्यांचं एकच युनिट बनवायचं आर्मीचं उद्दिष्ट आहे. एखाद्या लढाईच्याच वेळी अथवा युद्धसरावादरम्यान एकत्र येणारी इन्फ्रंट्री, शस्त्रे, तोफखाना, इंजिनीअर्स, लॉजिस्टिक्स आणि सपोर्ट युनिट्स आयबीजीज अंतर्गत एकाच छताखाली आणण्यात येतील. त्यामुळे जर शत्रूने हल्ला केला तर अतिशय चपळाईने आणि वेगाने हालचाल करून आपल्याला प्रत्युत्तर देता येईल. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने असे प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे.

 

डिसेंबर मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एक महिन्याने आर्मीने ऑपरेशन पराक्रम अंतर्गत बॉर्डरवरील लाँच पॅड वर जमवाजमव सुरु केली होती. आर्मीने "प्रो-ऍक्टिव्ह कॉन्व्हेंशनल वॉर स्ट्रॅटेजी' योजना आखली ज्याला अनौपचारिकपणे कोल्ड स्टार्ट डॉक्टराईन म्हणतात. त्यावेळी पाकिस्ताननेही आपले संरक्षण खाते अधिक बळकट केले. आणि त्यांच्या मदतीसाठी यूएस पुढे आले. यूएस ने भारतावर पाकिस्तानवर हल्ला न करण्यासाठी दबाव टाकला. 

 

आर्मीच्या पुनर्रचनेतील आयबीजीज हे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे अंग आहे.  टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार २०२२-२०२६ पर्यंत भारतीय लष्करात १३,४४८ कोटीची ४६४ रशियन बनावटीची टी-९० "भीष्म" ही मेन बॅटल टँक असेल. सध्या लष्कराकडे १,०७० टी-९० टँक्स आणि १२४ अर्जुन आणि २,४०० टी-७२ टँक्स आहेत.

 

 

-प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

Source- timesofindia

Army moves to raise integrated battle groups for greater punch across Pakistan, China borders