पाकिस्तान जम्मू काश्मीर मध्ये काही भयंकर करायच्या विचार करत होते का?
         Date: 05-Aug-2019


पाकिस्तान जम्मू काश्मीर मध्ये काही भयंकर करायच्या विचार करत होते का?

 

पाकिस्तान काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवून आणायच्या तयारीत आहे का? अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे आणि काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. काहीतरी मोठं घडतंय किंवा घडणार आहे असा अंदाज वर्तवला जातोय.

 

इम्रान खान च्या अमेरिका वारीनंतर पाकिस्तानने सीमेवर 300 हून अधिक दहशतवादी पाठवले आहेत. एखादा मोठा हल्ला करायचा, भारताला त्या हल्ल्याचा सूड घ्यायला भाग पाडायचे आणि या मुद्द्यावर बोंबाबोंब करून अमेरिकेकडून काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी मिळवायची असा पाकिस्तानचा डाव होता.

 

इम्रान खान अमेरिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी सगळे दहशतवादी सीमेवरून हटविण्यात आले होते हे लक्षात ठेवले पाहिजे आणि ते दौऱ्यावरून आल्यावर परिस्थिती अगदी बरोबर विरुद्ध आहे. गेल्या २-३ दिवसापासून अचानक सीमेवर दहशतवाद्यांची संख्या वाढली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले.

 

या दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करता यावी म्हणून पाकिस्तानने गेल्या आठवड्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. आयबीच्या अहवालानुसार अत्ता किमान ३०० दहशतवादी सीमेवर घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर २५० दहशतवाद्यांची तुकडी त्यांच्या मागोमाग जाण्यासाठी सज्ज आहे. तर अनेक दहशतवादी पुढील आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत.

 

अमरनाथ यात्रेच्या वाटेवर पाकिस्तानी बनावटीचे सुरुंग आणि शस्त्रास्त्रे पेरली गेली असल्याचे आर्मी ने शुक्रवारी सांगितले. सुरक्षा दलाच्या संयुक्त बैठकीत लेफ्टनंट जनरल सरबजितसिंग धिल्लन यांनी सांगितले की, पाकिस्तानी दहशतवादी सुधारित स्फोटक यंत्रांचा (आयईडी) वापर करून यात्रेकरूंवर हल्ला करतील अशी माहिती मिळाल्यानंतर तीर्थयात्रेच्या मार्गाचा कसून शोध घेण्यात आला. या शोधकार्यात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आणि पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरी च्या स्टॅम्पचे सुरुंग सुद्धा सापडले. यामध्ये स्निपर रायफल एम-२४ ही अमेरिकन बनावटीची रायफल सुद्धा आहे.

 

अजूनही शोधकार्य सुरु असल्याने हा शस्त्रसाठा सापडल्याचे ठिकाण सांगण्यास धिल्लन यांनी नकार दिला. ते म्हणाले की, नियंत्रण रेषेवरील परिस्थिती नियंत्रणात असली तरी खोऱ्यामधील दुर्गम भागाला दहशतवाद्यांपासून फार मोठा धोका आहे. दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न चालूच आहेत परंतु आमचे सैनिक त्यांचे प्रयत्न वेळोवेळी हाणून पाडत आहेत.

 

 

दहशतवाद्यांच्या वाढत्या धोक्याला काबूत ठेवण्यासाठी गुप्तहेरांचे जाळे अधिक मजबूत करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

 

-प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

Source: oneindia

 

Is Pakistan planning a mis-adventure, so that US intervenes in Kashmir?