बदलता भारत - भारताचा अमेरिकेला प्रशिक्षण लढाऊ विमान विकण्याचा प्रस्ताव.
         Date: 18-Dec-2020

बदलता भारत - भारताचा अमेरिकेला प्रशिक्षण लढाऊ विमान विकण्याचा प्रस्ताव.

- प्राची चितळे जोशी.

(ICRR Media Monitoring Desk)

नवी दिल्लीने प्रथमच आपल्या पहिल्या वेपन्स सेल्स पीचवर वॉशिंग्टन ची वर्णी लावली. विमानवाहू नौकांवरील लढाऊ जेट विमानांच्या पायलट प्रशिक्षणासाठी भारतीय जेट प्रशिक्षक पाठविण्याचा प्रस्ताव भारताने अमेरिकेला दिला आहे. अमेरिकन नेव्हीने अंडरग्रॅज्युएट जेट ट्रेनिंग सिस्टिम (यूजेटीएस) साठी जागतिक शोधमोहीम सुरु केली आहे.

इंडिजिनियस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या लीड इन फाइटर ट्रेनर (LIFT) या आवृत्तीसाठी आलेल्या अधिकृत माहितीच्या विनंतीला (आरएफआय) भारताने उत्तर पाठविले असल्याची माहिती इकॉनॉमिक टाइम्स ला मिळाली आहे. भारतीय लोकांना विमानवाहू नौकांवरून उडविण्यात येणाऱ्या जेट विमानांच्या एलसीएच्या नेव्हल आवृत्तीतून मिळालेला अनुभव दांडगा असल्याने हा प्रस्ताव पाठविण्यात आला.

अमेरिका या प्रस्तावाचे अद्याप मूल्यमापन करीत आहे. भारताने अमेरिकेला विस्तृत प्रकल्प आराखडा पाठवून दिला आहे ज्यामध्ये LIFT LCA मध्ये सर्व प्रकारच्या लढाऊ विमानांची नक्कल करू शकणारे असे प्रगत विज्ञान आहे.

 
fighter jet LCA_1 &n

 

" आम्ही सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास केला आहे. एका प्लॅटफॉर्मचा वापर दुसऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्मची नक्कल करण्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणजे काही ठराविक गोष्टी उड्डाण करणाऱ्या विमानात बसवू शकतो. जागा बदलली तरी त्याचा जो परिणाम व्हायला हवा आहे तो तिथेही घडू शकेल. उदाहरणार्थ, पायलटने जर राफेलची वैशिष्ट्ये पहिली असतील तर त्या गोष्टीमुळे त्याला आपण राफेल उडवत असल्यासारखेच वाटेल." असे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चे अध्यक्ष आर माधवन यांनी ईटीला सांगितले.

उत्कृष्ट प्रशिक्षक पुरवण्याचा मक्ता असलेल्या जागतिक उत्पादकांच्या विरोधात भारत जात असतानाच कोणत्या प्रकारची विमाने हवी आहेत हे अमेरिकेने अजूनही उघड केले नसल्याने या उत्पादकांना आशेचा एक किरण दिसतोय. एलसीए हे जगातील अशा काही जेट्स पैकी आहे की जे विमानाच्या वैमानिकाकडून ऑपरेट होऊ शकते.

यूएस नेव्ही आरएफआयनुसार, आवश्यक ते सर्व निकष एलसीए पूर्ण करतो. ज्यात फील्ड कॅरियर लँडिंग प्रॅक्टिस आणि कॅरियर टच अँड गो इव्हेंट याचा समावेश आहे. गोव्यातील किनारा आणि आयएनएस विक्रमादित्य या दोन्ही ठिकाणी एलसीएच्या नेव्हल आवृत्तीची विस्तृत चाचणी घेण्यात आली.

LCA ची LIFT आवृत्ती देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरील मागण्या पूर्ण करेल अशी आशा आहे. सध्या आगामी एलसीए एमके 1 च्या आगामी ऑर्डरसह निदर्शक विमानाची निर्मिती चालू आहे. हवाईदलाच्या या विमानाच्या मागणीवर यावर्षी स्वाक्षरी होईल.

वाहतूक विमानापासून ते तोफखाना आणि हल्ले करणार्‍या हेलिकॉप्टर्सपर्यंत सर्व लष्करी उत्पादने अमेरिका भारताला निर्यात करतो. भारतीय लष्करी बाजारपेठेतील मोठा हिस्सा हा अमेरिकेने व्यापला आहे. अशावेळी भारताचा अमेरिकेला प्रशिक्षण लढाऊ विमान विकण्याचा प्रस्ताव हा भारत बदलतोय याचा मोठा संकेत आहे.

Source: google, ET times, youtube etc.

India offers US fighter jet trainer in 1st major defence sales pitch.