कोरोनामुळे जगभरात काय घडलंय?
         Date: 27-Jun-2020

कोरोनामुळे जगभरात काय घडलंय?

 

2019 च्या शेवटापासून कोरोनाचा धुमाकूळ जगभर चालू आहेच. त्याच्या विळख्यातून जगातला जवळजवळ एकही देश आज सुटलेला नाही. कोरोनाची टांगती तलवार प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकावर लटकते आहे. काय घडलंय नेमकं?

 

नोव्हेंबरडिसेंबर 2019 मध्ये या रोगाचा पहिला बळी, कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर असणाऱ्या चीनमधील वुहान या शहरात सापडला. पहिले जवळपास दोन ते तीन महिने यथेच्छ लपवाछपवी केल्यावर अखेर चीनने वुहानमधील सी-फूड मार्केट किंवा वेट मार्केटमधील वटवाघुळापासून याचा संसर्ग सुरु झाल्याचे म्हटले. सुरुवातीला फारशा गंभीर न वाटलेल्या या रोगाने पुढे एका महाभयंकर साथीचे स्वरूप घेऊन जगभर धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यावर त्याचे विविध पैलू हळूहळू समोर यायला लागले, आणि चीनने हा विषाणू मुद्दामच पसरू दिल्याचे आरोप जगभरातून चीनवर होऊ लागले. अशा नेमक्या कोणत्या गोष्टी समोर आल्या, म्हणून खुद्द चीनवरच ही संशयाची सुई वळली?

 

1)        नैसर्गिक कोरोना हा विषाणू वटवाघुळांमध्ये आढळून येतो. नैसर्गिक कोरोना विषाणूमध्ये Bat to human transmission म्हणजेच वटवाघूळ ते माणूस संक्रमणाचे गुणधर्म आढळून येत नाहीत. शिवाय आत्ता तो ज्या गतीने जगभर पसरतोय त्या गतीने त्याचे संक्रमण होण्याचेही कोणतेही गुणधर्म मूळ विषाणूमध्ये आढळून आले नाहीत. या प्रकारचे गुणधर्म मूळच्या विषाणूमध्ये काही प्रकारचे DNA घुसवून मुद्दाम तयार होऊ दिले गेले. म्हणजेच आत्ता जगभर पसरलेला विषाणू नैसर्गिक नसून synthetic म्हणजेच कृत्रिम, प्रयोगशाळेत तयार केला गेलेला विषाणू आहे. असं असताना वुहानच्या मार्केटमधून त्याचे नैसर्गिक संक्रमण होणे निव्वळ अशक्य आहे. या शिवाय या विषाणूच्या पहिल्या रुग्णाचा वुहानच्या सी-फूड मार्केटशी कोणताही संबंध आढळून आलेला नाही. म्हणजेच वुहानमधल्या कोणत्यातरी प्रयोगशाळेतूनच हा विषाणू बाहेर पसरला यात संशय नाही.

हा विषाणू पसरला आहे हे जगाला समजल्यानंतरची पहिल्या दोन महिन्यातली चीनची लपवा-छपवी अधिक संशयास्पद होती. चेर्नोबिलमधल्या अपघातानंतर रशियाने तत्काळ या अपघाताची माहिती जगाला देत मदतीसाठी हाक घातली होती. जर कोरोना विषाणू अपघाताने पसरला असं म्हटलं तर याचप्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा चीनकडून करणं अवास्तव ठरू नये. मात्र तसं घडलं नाही.

याशिवाय ज्या वुहान शहरामधून या संसर्गाला सुरुवात झाली, त्या शहरातील लोकांना चीनमध्ये अन्यत्र फिरण्याची मुभा नव्हती. मात्र तेथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तेथील लोकं जगभरात जाऊ दिली गेली, यामागे नेमका उद्देश काय असेल? त्यांना त्याच शहरात स्थानबद्ध का करून ठेवलं गेलं नाही?

 

2)        Wuhan p4 प्रयोगशाळेमध्ये या विषाणूचे नमुने होते. याच्याशी संबंधित काही नावांचा इथे निर्देश करणे आवश्यक ठरेल. Wuhan Institute of Virology चा भाग असणारी ही प्रयोगशाळा व संस्था दोन्ही China Academy of science च्या अंतर्गत येतात. डॉ. जिआंग मेआनहेंग(1999-2011) हा या संस्थेचा पूर्वीचा संचालक होता. Wuhan P4 प्रयोगशाळेचा प्रमुख आणि China Academy of science सध्याचा संचालक डॉ. युआन झिमिंग आहे. China Academy of science चा पूर्वीचा एक संचालक चेन झू (2000) हा सध्या चायनीज रेड क्रॉस संघटनेचा अध्यक्ष आहे.  या तिन्ही व्यक्ती चीनचे पूर्व राष्ट्राध्यक्ष आणि ccp चे ज्येष्ठ नेते जिआंग झेमिंग यांच्याशी सबंधित आहेत, डॉ. जिआंग मेआनहेंग हा जिआंग झेमिंग यांचा ज्येष्ठ पुत्र आहे. डॉ. जिआंग यांचा मुलगा जिआंग झिचेंग हा चीनमधील वूक्सी(WUXI) आणि फोसन(FOSUN) या आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपनीमधील महत्त्वाचा भागधारक आहे.

 

आज चीनमध्ये जैविकशास्त्र संशोधनाच्या जवळजवळ सर्व क्षेत्रावर या 3-4 व्यक्तींचा मोठा प्रभाव आहे. जिआंग जेमिंग यांनी asymmetric warfareचा सतत प्रसार केला. याप्रकारच्या युद्धतंत्रात कोणत्याही प्रकारचे विधी-निषेध पाळले जात नाहीत. जैविक, आण्विक, छुपं, उघड कोणत्याही प्रकारची शस्त्रे आणि तंत्रे वापरून कधीही केव्हाही शत्रूवर हल्ला करून फक्त त्याचा नायनाट करणे इतकेच महत्त्वाचे असते. चीनने जगात महासत्ता बनण्यासाठी या युद्धतंत्राचा वापर करण्यात काहीही गैर नाही असं मानणारे ते एक प्रमुख शक्तिमान नेते आहेत हे विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच करोनो विषाणूचा प्रसार हा या युद्धतंत्राचा एक भाग असू शकेल का अशी शंका मनात आल्यावाचून रहात नाही.

 
chiana n virus_1 &nb

 
एकूणच या सगळ्या साथीला आणि तिच्यामुळे होणाऱ्या नुकसानासाठी चीन आणि चिनी सरकारला जबाबदार धरले जावे अशा भावनेची आणि संतापाची लाट उसळलेली आहे. पुढील काही देशांनी चीनवर कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आहे:-

 

1)        अमेरिका- टेक्सास येथील एक वकील लॅरी क्लेमान यांनी टेक्सास फेडरल कोर्टामध्ये 24 मार्च 2020 रोजी चीनविरोधात केस दाखल केली असून झालेल्या आर्थिक, सामाजिक नुकसानापोटी 20 ट्रिलियन डॉलर्स ची नुकसानभरपाई मागितली आहे.

2)        इंग्लंड- हेन्री जॅक्सन सोसायटी या ब्रिटीश संस्थेने 4 एप्रिल 2020 रोजी असाच 35 बिलियन पाउंड्सच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे.

3)        भारत- ऑल इंडिया बार असोसिएशनने 4 एप्रिल 2020 रोजीच युनायटेड नेशन्स ह्यूमन राईट्स कौन्सिल मध्ये केस दाखल केली आहे.

4)        जर्मनी- जर्मनीने तर कोरोना साथ आणि लॉकडाउनमुळे झालेल्या नुकसानाचं, 130 बिलियन पाउंड्सचं बिलच चीनकडे अधिकृतपणे पाठवून दिले आहे! 

   

आणखीही कोणी अशाच केसेस भविष्यात दाखल करतीलही, पण त्यामुळे झालेली जीवितहानी भरून येईल का? जर चीनला खरोखर हादरा द्यायचा असेल तर जगभरात पसरलेल्या त्यांच्या व्यवसायक्षेत्राला हादरा देणं अत्यावश्यक आहेच. कारण चीन नावाच्या राक्षसाचा प्राण त्याच्या व्यवसायात आणि त्यातून मिळणाऱ्या आर्थिक ताकदीत दडलेला आहे!

 

- मैत्रेयी जोशी.

 

(ICRR Content Generation )