हिवाळ्यात हिमनग फुटी ? केवळ अशक्य. - संरक्षण विषयातील शास्त्रज्ञ
         Date: 11-Feb-2021

 

हिवाळ्यात हिमनग कोसळणं ? केवळ अशक्य. - संरक्षण विषयातील शास्त्रज्ञ

 

- प्राची चितळे जोशी.

 

(ICRR Media Monitoring Desk)

 

रविवारी उत्तराखंड मधील जोशीमठ येथे झालेल्या हिमनग फुटी आणि त्यामुळे आलेल्या पुराच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी डीआरडीओच्या डिफेन्स जिओईनफॉरमॅटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (डीजीआरई) चे एक पथक रवाना झाले आहे. हे पथक आयएएफच्या हेलिकॉप्टरने पाहणी करेल.

 

भारत - चीन सीमेजवळील तपोवन येथे नंदादेवी हिमनदीचा काही भाग तुटल्याने आलेल्या पुरामध्ये अतोनात नुकसान झाले. एक जलविद्युत प्रकल्प आणि आजूबाजूचा प्रदेश यांची हानी झाली. तसेच १५० च्या आसपास लोक मृत्युमुखी पडले. तपोवन बोगद्यामध्ये अनेक जण अडकल्याची भीती आहे. बचावकार्य जोरात सुरु आहे.

 

परंतु, हिवाळ्यात हिमनग फुटी होत नसल्याने त्या प्रदेशातील हिमनदी आणि हिमस्खलन यांचे निरीक्षण करणाऱ्या शास्त्रज्ञांना या घटनेचे आश्चर्य वाटतेय.

 

हिमनदीमध्ये झालेल्या उद्रेकामुळे आलेला पूर हा नदीमध्ये हिमस्खलन झाल्यामुळे येतो. परंतु आताचे तापमान पाहता हे शक्य नाही. हा प्रदेश बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेला आहे आणि येथील तापमान हे उणे २० अंश सेल्सियस इतके आहे असे संरक्षण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

 
glacier bursts_1 &nb

हिवाळ्यात उणे तापमानामुळे बर्फ वितळत नाही. त्यामुळे त्याला नदीसारखा प्रवाह नसतो. या हंगामात नदी तयार होणे आणि ती फुटणे केवळ अशक्य गोष्ट आहे. गेल्या पन्नास वर्षात मी अशी घटना पाहिलेली नाही. या घटनेचे नेमके काय कारण आहे ते उपग्रहावरून आलेल्या प्रतिमांचा अभ्यास केल्यानंतरच समजेल. घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. शत्रूच्या प्रदेशावर हल्ला करण्यासाठी जगातील अनेक देश पर्वतीय संसाधनांचा शस्त्र म्हणून वापर करतात. असे एका संरक्षण शास्त्रज्ञाने सांगितले.

 

उत्तराखंड मधील रैना गावाजवळील ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचे खूप नुकसान झाले. तसेच तपोवन जवळील धौली गंगा नदीवरील एनटीपीसीच्या निर्माणाधीन प्रकल्पाचेही नुकसान झाले. संरक्षण शास्त्रज्ञांच्या मते हा हिमनदीमधील स्फोट जरी मुख्य ऊर्जा प्रकल्पापासून काही अंतरावर असला तरी याचा उद्देश मुख्य ऊर्जा प्रकल्पाला हानी पोचवण्याचा असू शकतो.

 

डीआरडीओची चंडीगढस्थित हिमवर्षाव आणि हिमस्खलन अभ्यास संस्था (एसएएसई) ही हिमस्खलनाचा अंदाज, कृत्रिम घटना आणि बर्फाच्छादित प्रदेशातील स्ट्रक्चरल कंट्रोल यासाठी काम करते. अलीकडील डीआरडीओच्या पुनर्रचनेनंतर डिफेन्स टेरिन रिसर्च लॅबोरेटरीमध्ये हे विलीन करण्यात आले आणि आता याला डिफेन्स जिओईनफॉरमॅटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट असे म्हणतात.

   

Source : youtube, google, theweek