वुहान लॅबमधून विषाणू चुकून बाहेर लिक झालाय हे खरं आहे ?
         Date: 11-Jun-2021

वुहान लॅबमधून विषाणू चुकून बाहेर लिक झालाय हे खरं आहे ?

 

२००३ मध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात सार्सचा उद्रेक झाला होता तेव्हा हा कोरोनाव्हायरस शब्द आपण  ऐकला. कोरोनाव्हायरसमुळे कोविड-१९ आणि सार्स हे रोग होतात. आत्ता जी परिसस्थिती उद्भवलीय त्याला कारणीभूत असणारा विषाणू म्हणून आपण कोरोना व्हायरसला ओळखतो. पण आत्ताच्या या महामारीचं वैज्ञानिक नाव सार्स-सीओव्ही-२ (SARS-CoV-2 )असे आहे.

 

युनान मधील तांब्याच्या खाणीतून वटवाघळांचे नमुने गोळा करताना बॅट वूमन 'शी झेन्गलीला' बॅट कोरोनाव्हायरस सापडला आणि त्यापासून पुढे माणसाला लागण झाली ही चीनने सांगितलेली वटवाघळांची कहाणी हे एक मिथक असल्याचे चिनी व्हायरॉलॉजिस्ट डॉ. ली-मेंग यांचे म्हणणे आहे. आपले हे म्हणणे स्पष्ट करताना त्यांनी म्हटलंय की युनान हे पश्चिमेस आहे आणि खरा विषाणू पूर्वेकडून  झोशानकडे आला आहे. चिनी लष्कराचा याच्यात हात असल्याचा कुणाला संशय येऊ नये म्हणून युनानचं प्रकरण घुसडण्यात आलंय. युनानमधील तांब्याच्या खाणीत अनेक लोकांना साथीच्या रोगाची लागण झाली होती आणि त्यात काही मेले सुद्धा होते. पण त्या रोगाचा व्हायरस हा कोविड-१९ शी मिळताजुळता असल्याचे केवळ भासवण्यात आले आहे. त्याच्यासारखीच लक्षणं असलेला एक खोटा व्हायरस येथे पसरवण्यात आला. खाणीतील मृत्यू पावलेल्या आणि लागण झालेल्या लोकांच्या तपासणीचे रिपोर्ट डॉ ली-मेंग यान यांनी पाहिले असता त्यात नॉवेल कोरोनाव्हायरसमुळे ते लोक गेल्याचा कोणताही पुरावा नाही. रिपोर्ट बरोबर असल्याचे परंतु त्यांनी केलेले विश्लेषण आणि निष्कर्ष चुकीचे असल्याचे डॉ. ली-मेंग यान यांनी म्हटले आहे. हे रिपोर्ट नंतर इंग्लिशमध्ये अनुवादीत केले गेले आणि तेच ग्राह्य धरले गेले. ही केवळ जगाची दिशाभूल करण्याची युक्ती होती.

 

चिनी लष्कराला २०१७ मध्ये झोशान बॅट कोरोनाव्हायरस झेडसी ४५ आणि झेडएक्ससी २१ हे सार्स-सीओव्ही -२ च्या जवळ जाणारे व्हायरस सापडले होते. त्यांनी ते व्हायरस संग्रहित करून जिवंत ठेवले. हे व्हायरस उंदराच्या मेंदूला संक्रमित करू शकतात असे २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्याच एका पेपरमध्ये आलं आहे.

 
WIV_1  H x W: 0

 

सार्स-सीओव्ही -२ जर नैसर्गिक असता तर इ प्रोटीनमुळे ( इन्व्हलप प्रोटीन ) जीनोममध्ये निश्चितपणे काही बदल झाला असता. पण तसे झाले नाही. तथापि, सार्स-सीओव्ही -२ मध्ये झेडसी ४५ / झेडएक्ससी २१  व्हायरससारखी समान इ प्रोटीन दिसून आली आहेत. याचाच अर्थ नक्की कुठे तरी पाणी मुरतंय.

 

२००३ मध्ये सार्सच्या झालेल्या उद्रेकानंतर कोरोनाव्हायरसाचा जैविक शस्त्र (बायो वेपन) म्हणून उपयोग करता येऊ शकतो हे चीनला समजले. चीनच्या रोग नियंत्रण केंद्राचे प्रमुख, जॉर्ज गाओ आणि यूएस नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सच्या एका सदस्यांनी मिळून २०१० ते २०१७ या कालावधीत नॉवेल ऍनिमल व्हायरसवर एक प्रकल्प हाती घेतला होता. डब्ल्यूआयव्ही लॅब आणि चायनीज मिलिटरी लॅब हे या प्रकल्पाचा एक हिस्सा होते. या प्रकल्पात त्यांनी डेंग्यू विषाणू, झिका विषाणू, उंदीर विषाणू आणि वटवाघूळ विषाणू यांचा अभ्यास करून त्यापैकी मेंदूतील रक्तस्त्राव आणि ताप यावर संशोधन केले. विशेष म्हणजे कोविड-१९ झालेल्या कोट्यवधी लोकांना मज्जातंतूतील आजारालाला सामोरे जावे लागलेय.  हे काय सुचवतेय?

 

व्हायरॉलॉजिस्ट लॅबमध्ये कधीही एकच व्हायरस तयार करत नाही. चीनमधील वैज्ञानिक जैविक शस्त्रे तयार करण्यावर काम करीत आहेत, त्यामुळे कोविड झाला की सुटलो असं म्हणणं चुकीचं आहे. हा झाला की दुसरा व्हायरस ते बायो वेपन म्हणून वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कोविड-१९ चा तपास घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून जैविक युद्ध टाळता येईल.

 

हा व्हायरस एकाच छत्राखाली बनवला गेला नाहीये. संपूर्ण चीनमधील अनेक टीम यावर काम करीत होत्या आणि नंतर तो डब्ल्यूआयव्हीमध्ये एकत्रित केला गेला. या सगळ्या षडयंत्राच्या मागे चिनी लष्कर आणि संपूर्ण मेडिकल सायन्स उभं आहे. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संशोधन करून ते वुहान लॅबमध्ये आणून एकत्रित करून पद्धतशीरपणे त्याचा फैलाव केला गेला असल्याचे डॉ ली-मेंग यान यांनी म्हटले आहे.

 

सार्स १ च्या अनुभवावरून असे निरीक्षणास आले की नॉवेल कोरोनाव्हायरसचा वापर जेनेटिक बायो वेपन म्हणून करता येऊ शकतो असे स्पष्टपणे २०१५ मध्ये मिलिटरी मेडिकल प्रेसने प्रकाशित केलेल्या अधिकृत लष्करी पाठ्यपुस्तकात एका चिनी जैविक शस्त्र तज्ञाने पीएलए जनरलसोबत मिळून लिहिलेल्या एका धड्यात म्हटले आहे. नॉवेल कोरोनाव्हायरसचा जैविक शस्त्र म्हणून वापर केल्यास त्यापासून होणाऱ्या मृत्यूचा दर हा १० टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. कारण मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडले तर सगळ्यांना ताबडतोब हे जैविक शस्त्र असल्याचे लक्षात येईल. हे प्रमाण जर २ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर अश्या प्रकारचे शस्त्र हे गौण तरीही भयानक उलथापालथ घडवून आणेल. म्हणजेच त्याच्यामुळे अनेक देशांची आरोग्य यंत्रणा मोडून पडेल. असे झाले की अर्थव्यवस्था खिळखिळीत होईल आणि जनजीवन विस्कळीत होईल. असेही त्या धड्यात म्हटले आहे. आणि अत्ता याच परिस्थितीतून चीन सोडून संपूर्ण जग जातंय. अमेरिकेने या पाठ्यपुस्तकाच्या सत्यतेची शहानिशा केली आहे.

 

या विषाणूच्या जीनोममध्ये अजून काय काय दडवून ठेवलंय हे अद्याप आपल्याला माहित नाही. इतर कोरोनाव्हायरसपेक्षा हा नॉवेल कोरोनाव्हायरस अधिक प्राणघातक कशामुळे ठरला? शरीरातील एकेक अवयव कसे निकामी होत गेले? त्यांच्यावर काय काय परिणाम झाले? मरण्यापूर्वी नेमक्या कोणत्या अवयवावर या विषाणूने हल्ला केला आहे हे कसे समजून येत नाही? याचं उत्तर त्यांनी विस्तृतपणे दिलंय. त्या म्हणतात, एरवी आम्ही मुलगा कसा असेल ते त्याच्या वडिलांकडे बघून ठरवतो. म्हणजे त्याचं चालणं, त्याचे इतर अवयव यामध्ये आपण बापाला शोधतो. इथे मुलगा कोविड - १९ आहे. पण वुहान लॅबमध्ये बॅट वुमनने मुलगा खरा ठेवला आणि त्याचा बाप मात्र दत्तक घेतला. तिने त्याचे नाक आणि चालणे मुलासारखे बनवले. आता मुलाला केंद्रबिंदू ठेवून त्याचे खोटे कुटुंब बनवले. त्याच्या भोवती एक कहाणी रचली आणि ती नेचर मासिकात छापून आणली. आता शास्त्रज्ञांच्या वर्तुळातील शी झेन्गलीचं स्थान बघता  तिने केलेल्या दाव्यांचं खंडन करण्याचा विचार कोण करणार. चीनने एक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक गट देखील बनविला जो नेचर मासिकातील सिद्धांताला पाठिंबा देईल.

 

डॉ. ली-मेंग यांनी 'द वीक' ला दिलेल्या मुलाखतीतील काही भाग मी इथे देण्याचा प्रयत्न केलाय. डॉ. ली-मेंग यान या एक चिनी विषाणूतज्ञ आहेत. एप्रिल २०२० मध्येच त्यांनी आपला देश सोडून अमेरिकेत आश्रय घेतला आहे. कोविड-१९ हे जैविक शस्त्र असल्याचे अनेक पुरावे डॉ ली-मेंग यान यांनी दिले असल्यामुळे आणि त्या देशाविरुद्ध बोलत असल्याने चीनने त्यांच्यावर इतर देशांना विकले गेले असल्याचा आरोप केला आहे. सायबर मिलिटरी आणि चिनी सरकारकडून त्यांना सतत धमक्या मिळतायत. नेचर मासिकातील थियरीला इतर शास्त्रज्ञ आणि प्रसारमाध्यमे उचलून धरतायत आणि त्याच वेळी डॉ. ली-मेंग यांचे अहवाल आणि मुलाखती फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरून उडविण्यात येत आहेत. 

 

पूजा जयस्वाल यांनी घेतलेला डॉ.ली-मेंग यान यांच्या मुलाखतीचा काही भाग.

 

Source: Theweek, google, Wikipedia