ग्वादर येथील जिन्नाचा पुतळा बलूच क्रांतिकारकांनी बॉम्बस्फोटात उध्वस्त केला.
          Date: 27-Sep-2021
  
ग्वादर येथील जिन्नाचा पुतळा बलूच क्रांतिकारकांनी बॉम्बस्फोटात उध्वस्त केला.

भारताच्या फाळणीला जबाबदार मोहम्मद अली जिन्नाह चा पुतळा बलूच क्रांतिकारकांनी बॉम्बस्फोट करून उध्वस्त केला. बलुचिस्तानच्या ग्वादर शहराच्या प्रतिष्ठित आणि सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मरीन ड्राइव्ह परिसरात याच वर्षी जूनमध्ये उभारण्यात आलेला हा पुतळा बलूच क्रांतिकारकांनी त्याच्या मुळाशी बॉम्ब लावून उध्वस्त केला.
 
 
Jinnah Gwadar statue blas
चीनची पाकिस्तानातील प्रचंड आर्थिक गुंतवणूक सर्वाधिक बलुचिस्तानमध्ये आहे आणि त्यातही ग्वादार शहरातून ग्वादरचे भूमिपुत्र असलेल्या बलूचांना मोठ्या प्रमाणात विस्थापित करून पाकिस्तान सरकार पंजाबी पाकिस्तानी लोकांच्या हितासाठी बलूच भूमीचा चीनसोबत सौदा करत असल्याची भावना बलूचांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानी पंजाबी समाज आणि पाकिस्तानी समाजाचा मानबिंदू असलेला जिन्नाह यांच्याबद्दल बलूच, पश्तुन (पठाण) आणि सिंधी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे.
 
 
Jinnah Residency Ziarat b
२०१३ मध्ये बलूच क्रांतिकारकांनी जिन्नांच्या आयुष्याचा अंतिम काळ व्यतीत केलेली १२१ वर्षे जुनी जिन्नाह रेसिडेन्सी हि झियारत भागातील वास्तू बॉम्बस्फोटात उडवून दिली होती आणि उरलेल्या वास्तूवर गोळीबार करून तिची चाळण उडवली होती. यावेळी लागलेली आग ४ तास सुरु होती आणि त्यात या वास्तूत ठेवलेल्या जिन्नाच्या आयुष्याशी संबंधित सर्व वस्तू उध्वस्त झाल्या होत्या.