Afghanistan

पाकिस्तानचा पाठिंबा असलेले दहशतवादी गट भारतावर आणि अफगाणिस्तानवर हल्ला करतच राहतील : अमेरिकन गुप्तहेर.

नॅशनल इंटलिजन्सचे संचालक डॅन कोट्स म्हणतात, " दहशतवादाच्या विरोधात सहकार्य करण्यात दाखविलेली अरुची, काही दहशतवादी गटांचा आपल्या फायद्यासाठी पाकिस्तानने केलेला धोरणात्मक वापर आणि तालिबान विरुद्ध न लढता फक्त पाकिस्तानलाच त्रास देणाऱ्या दहशतवादी गटांविरुद्ध लढण्याची पाकिस्तानची इच्छा हेच अमेरिकेला नाऊमेद करीत आहे. पाकिस्तानचा पाठिंबा असलेले दहशतवादी गट पाकिस्तानचा आश्रय घेऊन भारत आणि अफगाणिस्तानवर हल्ला करायचा कट करतात आणि तो यशस्वीरित्या राबवतात ते ही अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता."

Read More

अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याचा अमेरिकेचा निर्णय अफगाणिस्तानबरोबर भारतासाठीदेखील चिंतेचे कारण?

आजच्या घडीला अफगाणिस्तानात सुमारे १५,००० यूएस सैनिक तैनात आहेत. त्यापैकी जवळपास निम्मे सैनिक मायदेशी बोलाविण्याचा निर्णय यूएस अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय. तश्या प्रकारचा अध्यक्षीय आदेश पेंटागॉनला पाठविण्यातही आला आहे. या निर्णयामुळे तालिबान तसेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना परतून येण्यासाठी मुक्तद्वार मिळणार असल्यामुळे अफगाणिस्तान तर चिंतेत पडलेच आहे पण त्याचबरोबर त्या देशामधील आपली गुंतवणूक, विविध क्षेत्रात असलेला आपला संचार इत्यादी गोष्टींचा विचार करता त्याचे सावट आपल्यावरही नक्कीच पडणार आहे.

Read More

तालिबान संघटनेत हजारोंच्या संख्येने परदेशी लोक सुद्धा सामील असल्याची तालिबानी कमांडरची कबुली.

नुकतेच हजारोंनी परदेशी लढवय्ये आमच्या संघटनेत भरती झाले असल्याची माहिती अफगाण तालिबान मधील एका वरिष्ठ नेत्याने एनबीसी न्यूजला दिली. तालिबानने अल्-कायदा बरोबरचे आपले संबंध कमी केल्यानंतर होणारी ही भरतीची संख्या बुचकळ्यात टाकणारी आहे. अमेरिकेच्या लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेने तालिबानमध्ये कार्यरत असलेल्या अल-कायदाच्या लोकांची संख्या ५० ते १०० अशी वर्तविली होती. परंतु नंतर ती बदलून २०० केली गेली असे वृत्त गेल्या आठ वर्षांपासून अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या एफडीडीच्या लाँग वॉर जर्नलने दिले.

Read More

अफगाणिस्तानमधील नद्या हे भारताचे पाकिस्तानविरोधातील नवे अस्त्र असू शकेल? भाग- ०१

संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सध्या ६० टक्क्यांपर्यंत कमी झालीय. त्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. काबूलची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, संपूर्ण देशभरात पसरलेला अतितीव्र दुष्काळ आणि सतत बदलते वातावरण या तीन प्रमुख कारणांमुळे अफगाणिस्तानात पाण्यावर आधारित सोयीसुविधा उभारणे गरजेचे झालेले आहे. परंतु अश्या प्रकारच्या गोष्टी उभारणे हे तेथे राजकीयदृष्ट्या कठीण आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर दोन्ही देशांतून वाहणाऱ्या नद्यांचे जाळे आहे आणि या नद्यांच्या पाणीवापराबद्दल

Read More